Maharashtra Politics : गणेश उत्सवानिमित्त मुंबईतून कोकणात जाणाऱ्या भाविकांसाठी कॅबिनेट मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्यामार्फत नमो एक्स्प्रेसचे आयोजन करण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराज स्थानकातून ही ट्रेन गुरूवारी (ता. 5) सकाळी 10.30 वाजता सावंतवाडीला जाण्यासाठी निघाली. चिपळूण, रत्नागिरी, राजापूर, कणकवली, कुडाळ असा या एक्स्प्रेसचा मार्ग असेल. आज या सुविधेचा 1034 कोकणवासियांनी लाभ घेतला.
प्रवाशांसाठी सोय
प्रवाश्यांसाठी न्याहारी आणि पाण्याची व्यवस्था करण्यात आली. ट्रेनमध्ये स्वच्छता असेल याची काळजी घेण्यात आली. या रेल्वेच्या माध्यमातून केलेल्या नियोजनाबद्दल नागरिकांनी मंत्री लोढा यांचे आभार मानले आहेत. जास्तीत जास्त नागरिकांना याचा लाभ घेता यावा, यासाठी तिकीट 100 रुपये इतक्या माफक दरात उपलब्ध करून देण्यात आले.
विशेष ट्रेन
या विषयी बोलताना मंत्री लोढा म्हणाले, “गेली 10 वर्ष आम्ही गणेशभक्तांच्या सेवेसाठी ट्रेन सोडत आहोत. यावेळीसुद्धा तशी व्यवस्था केली आहे. यात कोणतेही राजकारण नाही. अशा ट्रेन आम्ही यापूर्वी पंढरपूर आणि अयोध्येसाठी सुद्धा सोडल्या आहेत. जिथे भगवान आहेत, भक्तांची श्रद्धा आहे, तिकडे भाजप आहे. गणेश उत्सव आपल्या सर्वांसाठी अतिशय जिव्हाळ्याचा विषय आहे.
Anil Dhanorkar : बाळू धानोरकर यांच्या भावाच्या डोळ्यांतून फुटला अश्रूंचा बांध
सोयीचा उद्देश
प्रत्येकाला आतुरता असते आपल्या घरी जाण्याची आणि श्रीगणेशाची स्थापना करण्याची. त्या सर्वांना आपल्या घरी जाण्यासाठी सोयीस्कर प्रवासाचा पर्याय उपलब्ध करून देण्याचा आमचा उद्देश आहे. आज ही ट्रेन पूर्ण भरली आहे. सर्वच नागरिक समाधानी आहेत. याचा आनंद वाटतो. प्रत्येकाचा प्रवास सुखरूप व्हावा आणि गणपती बाप्पाचा आशीर्वाद त्यांना मिळावा, असेही मंत्री लोढा म्हणाले. भाजप कार्यकर्त्यांच्या माध्यमातून या नमो एक्स्प्रेसचे नियोजन करण्यात आले होते. प्रथम येणाऱ्यास प्रथम संधी या माध्यमातून कोकणात जाणाऱ्या नागरिकांना तिकीट देण्यात आले.