आगामी विधानसभा निवडणूक आणि मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका डोळ्यापुढे ठेवून पारंपरिक मराठी मतदारांना आपल्याकडे खेचण्यासाठी महायुती सरकार ‘नामांतरा’चा प्रयोग करणार आहे. याअंतर्गत मुंबई रेल्वे स्थानकांची नावे बदलण्याचा प्रस्ताव आला असून त्यावर निर्णय होण्याचीदेखील दाट शक्यता आहे.
मुंबई उपनगरातील अनेक स्थानकांना ब्रिटीश अधिकाऱ्यांची नावे दिलेली होती. मात्र मुंबईतील 7 लोकल स्थानकांची नावे लवकरच बदलणार आहेत. ज्यामध्ये मुंबईचे मरीन लाइन्स स्टेशन आता मुंबा देवी म्हणून ओळखले जाणार आहे. या स्थानकाचे नाव बदलल्याने मुंबादेवीला जाणाऱ्या नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. कारण आत्तापर्यंत जर कोणाला मुंबादेवीला जावे लागले. त्यामुळे कोणत्या स्थानकावर उतरायचे आणि मुंबा देवीचे मंदिर सर्वात जवळ असेल का, या संभ्रमात लोक राहायचे. मात्र सरकारने अशी नावे बदलण्याचं निर्णय घेतला आहे.
मध्य रेल्वेच्या स्थानकांची इंग्रजी नावे बदलण्याची मागणी शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी सर्वप्रथम केली होती. राज्यात सत्ताबदल झाल्यानंतर महाविकास आघाडीचे सरकार जाऊन महायुतीचे सरकार स्थानापन्न झाल्यानंतर गेल्या वर्षी तत्कालीन खासदार राहुल शेवाळे यांनी पुन्हा ही मागणी लावून धरली. त्यानंतर राज्य विधीमंडळात हा प्रस्ताव अखेर मंजूर झाला आहे.
या स्थानकांच्या नावांना स्थानिक परिसरातील ओळखीनूसार नावे देण्याचा प्रस्ताव होता. या प्रस्तावाला राज्य विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात अखेर मंजूरी देण्यात आली आहे. त्यामुळे या स्थानकांची जुनी ओळख पुसली जाणार आहे. आता यापुढे इंग्रजी नावे जाऊन नवीन मराठी नावे स्थानकांना मिळणार आहेत. त्यामुळे आता मरीन लाईन्स मुंबादेवी असे त्या परिसराला साजेसे असे नाव मिळणार आहे.
अशी राहतील स्थानकांची नावे
मुंबईतील रेल्वे स्थानकांची नावे बदलण्याचा ठराव मंगळवारी विधानसभेत अखेर मंजूर करण्यात आला आहे. आता हा ठराव केंद्र सरकारला पाठवला जाणार आहे. त्यानंतर रितसर नावं बदलण्यात येणार आहेत. आता करी रोड – लालबाग रेल्वे स्थानक म्हटले जाणार आहे. तर पुढील बदल अनुक्रमे सँडहर्स्ट रोड – डोंगरी रेल्वे स्थानक, मरीन लाईन्स – मुंबादेवी, चर्नी रोड – गिरगाव, कॉटन ग्रीन – काळाचौकी, डॉकयार्ड रोड – माझगाव रेल्वे स्थानक, किंग सर्कल – तीर्थकर पार्श्वनाथ रेल्वे स्थानक अशी नावे देण्यात आली आहेत.
Vidhan Parishad : ना झाडी..ना डोंगर..तरीही गुवाहाटीची पुनरावृत्ती?
मंजुरी मिळताच नावे बदलणार
सात लोकल रेल्वे स्थानकांची नावे बदलण्याचा प्रस्ताव महाराष्ट्र विधान परिषदेने मंजूर केला आहे. हा प्रस्ताव रेल्वे मंत्रालयाकडे पाठवण्यात येणार आहे. जिथून केंद्र सरकारकडून मंजुरी मिळताच रेल्वे स्थानकांची नावे बदलण्यात येणार आहेत.
मुंबादेवी, लालबागसह ही नावे कायम राहणार
मरीन लाइन्स मुंबादेवी, करी रोड ते लालबाग, सँडहर्स्ट रोड ते डोंगरी, चर्नी रोड ते गिरगाव येथे हलवण्यात येणार आहेत. तसेच सेंट्रल लाईनवर तसेच हार्बर लाईनवर सँडहर्स्ट रोडचे नाव बदलण्यात येणार आहे. इतर स्थानकांपैकी कॉटन ग्रीन स्टेशनचे नाव बदलून काळाचौकी, डॉकयार्ड रोडचे नाव माझगाव आणि किंग सर्कलचे नाव तीर्थंकर पार्श्वनाथ असे ठेवले जाईल.