महाराष्ट्र

Pankaja Munde : पुन्हा सरकार आल्यास होणार मंत्री?

BJP : विधान परिषदेत शपथविधीनंतर पुन्हा नाव चर्चेत

Vidhan Parishad : नावापुढे पुन्हा एकदा आमदार हा शब्द लागल्यानंतर भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्या मंत्रिपदाच्या चर्चेचे जोर धरला आहे. केंद्र आणि राज्याच्या राजकारणीतून अनेक दिवसांपर्यंत ‘साइड ट्रॅक’ असलेल्या मुंडे यांना पुन्हा एकदा राजकीय प्रवाहात आणण्यात आले आहे. पंकजा मुंडे यांना मध्यंतरीच्या काळात मुख्यमंत्रिपदाच्या दावेदार मानले जात होते. त्यांनी स्वत: देखील मी जनतेच्या मनातील मुख्यमंत्री वैगरे सारखी विधाने केली होती. त्यामुळे त्या पक्षश्रेष्ठींच्या विरोधात जात असल्याचा संदेश सर्वत्र गेला. परिणामी मुंडे भगिनींना भाजपने ‘लूप लाइन’वर टाकले.

अनेक दिवसांपर्यंत मुख्य प्रवाहापासून बाजुला असलेल्या मुंडे यांना लोकसभा निवडणुकीत (Lok Sabha) भाजपने स्थान दिले. मात्र त्यांना पाहिजे ते यश मिळाले नाही. निवडणुकीनंतर एनडीएचे सरकार तिसऱ्यांदा स्थापन झाले. नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी सलग तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतली. शपथविधीपूर्वीही पंकजा मुंडे यांना केंद्रीय मंत्रिमंडळात घेण्यात यावे, यासाठी कार्यकर्त्यांनी प्रचंड दबाव आणण्याचा प्रयत्न केला. मात्र भाजपला असे करणे शक्य झाले नाही.

पुन्हा आमदारकी

पंकजा मुंडे यांचा वाढता जनाधार भाजपला दिसून आला. त्यांच्यासाठी काही कार्यकर्त्यांनी आत्महत्या केल्याच्या घटनेचीही भाजपने गंभीर नोंद घेतली. त्यामुळे त्यांना विधान परिषद निवडणुकीत संधी देण्यात आली. पंकजा मुंडे यांना या निवडणुकीत विजय मिळाला. रविवारी (ता. 28) त्यांनी विधिमंडळाच्या मध्यवर्ती सभागृहात आमदारकीची शपथ घेतली. राज्यातील महायुती (Mahayuti) सरकारचा कार्यकाळ जरी संपत असला तरी पंकजा मुंडे आमदार राहणार आहेत. आगामी विधानसभा निवडणुकीसाठी (Assembly Election) महायुतीमधील तीनही घटकपक्ष जोरदार ताकद लावत आहे.

मंत्रालय काबीज करण्यासाठी महाविकास आघाडीच्या (Mahavikas Ahgadi) ठोशास ठोसा देणे महायुतीने सुरू केले आहे. यात विशेषत: भाजप आघाडीवर आहे. राष्ट्रवादी काँग्रेस ‘इमेज बिल्डिंग’ करीत आहे. शिवेसना लोकांना भावेल अशा मुद्द्यांना हात घालत आहे. तर भाजप ‘फेक नॅरेटिव्ह’ला प्रत्युत्तर देत आहे. या तिहेरी प्रयत्नातून महायुतीचे सरकार आल्यास आमदार पंकजा मुंडे या मंत्रिपदाच्या दावेदार राहणार आहेत. तशी चर्चाही आतापासूनच सुरू झाली आहे. भविष्यात महायुतीची सत्ता आल्यास पंकजा मुंडे यांना वजनदार मंत्रालय कदाचित भाजपला द्यावे लागू शकते. त्यासाठी त्यांचे चाहते नक्कीच पुन्हा शक्तीप्रदर्शन करतील, यात शंकाच नाही. मात्र या साऱ्यात आता पंकजा मुंडे यांना बरीच संयमाची भूमिका घ्यावी लागणार आहे. अतिरेकी महत्वाकांक्षा नेहमीच घातक ठरते, ही खुणगाठ त्यांना बांधावी लागणार आहे.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!