महाराष्ट्र

Lok Sabha Election : गडचिरोलीत काँग्रेसमध्ये चाललंय तरी काय?

Namdev Usendi : काँग्रेस आदिवासी आघाडीच्या प्रदेशाध्यक्षांनी घेतली पक्षाशी फारकत

Gadchiroli Constituency : ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर गडचिरोली जिल्ह्यातील काँग्रेसमध्ये गटबाजीने डोके वर काढले आहे. गडचिरोलीच्या बाहेरील उमेदवार दिल्याने गडचिरोलीतील दोन काँग्रेस नेत्यांनी पक्ष सोडला आहे. काँग्रेसचे आदिवासी सेलचे नेते डॉ. नामदेव उसेंडी यांनी मंगळवारी (ता. 26) राजीनामा दिला. त्यानंतर ते नागपुरात प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये गेले. काँग्रेसचे आणखी काही नेते राजीनामा देतील असे आता सांगण्यात येत आहे. त्यामुळे विदर्भातरन काँग्रेसमध्ये पुढील काही दिवसांत भूकंप होण्याची चिन्हे आहेत.

लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर गडचिरोली जिल्हा काँग्रेसमध्ये गटबाजी सुरू झाली. गटबाजी चव्हाट्यावर आली. काँग्रेसचे प्रदेश सचिव डॉ. नितीन कोडवते यांनी पत्नीसह मुंबई गाठत भाजपमध्ये प्रवेश केला. त्यानंतर काँग्रेसने चिमूर-गडचिरोली लोकसभेची उमेदवारी डॉ. नामदेव किरसान यांना जाहीर करताच माजी आमदार नामदेव उसेंडी भाजपमध्ये गेले. त्यामुळे आता काँग्रेसपुढै मोठे आव्हान निर्माण झाले आहे. दोन दिवसांतील या घडामोडींमुळे काँग्रेस कार्यकर्त्यांमध्येही संभ्रम निर्माण झाला आहे. कार्यकर्त्यांमध्ये कोणता झेंडा घेऊ हाती, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.

उसेंडींच्या पाठीशी अनेक जण

उसेंडी यांनी राजीनामा दिल्याची घोषणा पत्रकार परिषदेत केली. यावेळी काँग्रेस नेते जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष बंडोपंत मल्लेलवार, हसन गिलानी यांच्यासह अनेक समर्थक उपस्थित होते. उसेंडी सध्या एकटेच भाजपमध्ये गेले आहेत. त्यांचे समर्थक काय भूमिका घेतात यावरच काँग्रेसच्या उमेदवाराचे भवितव्य अवलंबून आहे. गडचिरोली जिल्हा काँग्रेसमध्ये वाद पेटले असताना जिल्हाध्यक्षांनी घेतलेली भूमिका पक्षाला मारक ठरणार आहे.

किरसान यांचा फटका

चिमूर-गडचिरोली लोकसभा मतदारसंघात जिल्ह्यातील गडचिरोली, आरमोरी व अहेरी, चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर व ब्रम्हपुरी आणि गोंदिया जिल्ह्यातील देवरी विधानसभा मतदारसंघाचा समावेश आहे. सर्वाधिक मतदार गडचिरोली जिल्ह्यातील असल्याने गृहजिल्ह्यातील इच्छुकांना उमेदवारी मिळावी, अशी काँग्रेसच्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांची भावना होती. मात्र, तसे झाले नाही जिल्हाध्यक्षांकडून डॉ. किरसान यांचे पारडे जड करण्यात आल्याने गडचिरोलीतील स्थानिक कार्यकर्ते अन्याय झाल्याची भावना व्यक्त करीत आहेत. त्याची किंमत काँग्रेसला मोजावी लागू शकते.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!