प्रशासन

Nagpur Drugs : नागपूर मनपाचा कर्मचारी निघाला ड्रग्स तस्कर

Police Action : तीन जणांना अटक; 90 लाखांचा साठा जप्त

MD Narcotics : नागपूरच्या गुन्हे शाखा एनडीपीएस कक्षाने सापळा रचत एका मोठ्या औषध विक्रेत्याला अंमलीपदार्थाच्या तस्करीप्रकरणी अटक केली आहे. पोलिसांनी आरोपींकडून 907 ग्राम मेफेड्रोन ड्रग्ज जप्त केले आहे. धक्कादायब बाब म्हणजे नागपूर महापालिकेचा कर्मचारी या ड्रग्स तस्करी प्रकरणात पकडला गेला आहे. तो मोठ्या प्रमाणात अंमलीपदार्थाचा व्यापार करीत होता, असा पोलिसांचा दावा आहे. करत होता. या प्रकरणातील पाच फरार आरोपींचा शोध पोलिस घेत आहेत. आरोपींमध्ये ताजनगर टेकनाका येथील रहिवासी मकसूद अमिनोद्दीन मलिक, सोहेल (रा. सारंगपूर मध्य प्रदेश), गोलू बोरकर (रा. हिवरीनगर), अक्षय बोबडे व अल्लारखा (रा. हिंगणा) रहिवासी आहेत.

ड्रग्स तस्करी करणाऱ्या तीन आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये कपिल गंगाधर खोब्रागडे (वय 40, रा. राजेंद्रनगर झोपडपट्टी, आंबेडकर चौक), राकेश अनंत गिरी (वय 31, रा. नंदनवन झोपडपट्टी) आणि अक्षय बंडू वंजारी (वय 25, रा. जुना बागरगंज) यांचा समावेश आहे. आरोपींपैकी कपिल हा महापालिकेच्या आरोग्य विभागात पर्यवेक्षक (Supervisor) आहे. महापालिकेच्या नेहरू नगर झोनमध्ये कपिल आरोग्य विभागाात कामाला असल्याचे पोलिसांनी सांगितले.

Vijay Wadettiwar : कोणाला फाशी दिली, हे मुख्यमंत्र्यांनी जाहीर करावे 

अनेक दिवसांपासून काम

मकसूद अनेक दिवसांपासून अंमलीपदार्थांच्या व्यापारात सक्रिय आहे. पोलिसांना कपिलने सांगितले की, तो कमी वेळात जास्त पैसे कमाविण्याच्या उद्देशाने हे पदार्थ खरेदी करत होता. या रॅकेटमध्ये सोहेल, गोलू, अक्षय आणि अल्लारखा यांचाही सहभाग आहे. पोलिसांनी त्यांचा शोध सुरू केला आहे. मकसूद हा अनेक अंमलीपदार्थांच्या व्यवसायात प्रमुख म्होरक्या असल्याचे सांगण्यात येत आहे. अल्पावधीतच त्याला जामिन मिळाला. जामिनावर बाहेर येताच त्याने पुन्हा ड्रग्सचा व्यवसाय सुरू केला. आता तो पोलिसांच्या जाळ्यात अडकला आहे. गुन्हे शाखेचे निरीक्षक गजानन गुल्हाने, हेडकॉन्स्टेबल मनोज नेवारे, पवन गजभिये, शैलेश डोबोळे, रोहित काळे, राहुल पाटील, शेषराव रेवतकर, सुभाष गजभिये, सहदेव चिखले यांनी ही कारवाई केली. केली.

कपिल हा हिवरीनगर येथील लोहाणा समाज भवनाजवळ कोणाला तरी ड्रग्स देण्यासाठी येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचला. कपिल आणि त्याचे मित्र अक्षय, राकेश यांना ड्रग्स पोहोचविण्यासाठी पोहोचले. व्यवहार सुरू असतानाच पोलिसांनी त्यांना पकडले. झडती घेतल्यानंतर त्यांच्याजवळून मेफेड्रोन ड्रग्ज जप्त करण्यात आले. त्याची किंमत 90.70 लाख रुपये आहे. अटक केल्यानंतर त्याच्याविरोधात नंदनवन पोलिस एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आल आहे.

मकसूद कुख्यात

मकसूद शहरातील बड्या अंमलीपदार्थ विक्रेत्यांपैकी एक असल्याची माहिती आता पोलिसांना मिळाली आहे. त्याच्यावर 14 गुन्हे दाखल आहेत. त्यापैकी पाच गुन्हे अंमलीपदार्थ विक्रीचे आहेत. याआधीही कपिलला ड्रग्ज विकताना पकडण्यात आले होते. मात्र त्यानंतर जास्त प्रमाणात ड्रग्ज सापडले नव्हते. राकेश आणि अक्षयवरही गुन्हे दाखल आहेत. ड्रग्स तस्कर असलेल्या व्यक्तीला महापालिकेच्या नेहरूनगर झोनमधील आरोग्य विभागाचा पर्यवेक्षक पदावर कसे घेण्यात आले, हा प्रश्न आता उपस्थित होत आहे. कपिल हा गुन्हेगारांच्या मदतीने अंमलीपदार्थ विक्रीचा व्यवसाय करीत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे. पोलिस सतत त्याच्यावर नजर ठेवून होते. मकसूद हा देखील कुख्यात ड्रग्स तस्कर असताना प्रत्येक गुन्ह्यातून तो जामिनावर कसा सुटतो हा प्रश्नही उपस्थित होत आहे.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!