महाराष्ट्र

Devendra Fadnavis : बुडणाऱ्या नागपूरला तारण्यासाठी प्लान

NMC Meeting : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितीत बैठक

Making New Orange City : नागपुरातील विकास कामांबाबत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी (ता. 6) आढावा बैठक घेतली. गडकरी यांच्या नेतृत्वात आढावा घेण्यात आला. नागपुरातील सिव्हेज आणि पाण्यासाठी प्लान तयार करण्यात आल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी दिली. नागरिकांना लवकरच जोडणी देण्यात येणार आहे. त्यामुळे पाणी लोकांपर्यंत पोहोचले पाहिजे, यासाठी नियोजन करण्यात आले, असे फडणवीस यांनी सांगितले.

मार्ग निघाला

नाग नदीसाठी 2 हजार 400 कोटी रुपयांचा निधी मिळाला आहे. त्यातून मोठे सिव्हेज नेटवर्क तयार करण्यात येणार आहे. यातून सांडपाण्याचे व्यवस्थापन प्रभावीपणे होईल. पावसाळ्यात पाणी तुंबते. त्यामुळे अनेक भाग जलमय होतात. रस्ते आणि अविकसित ले-आऊटमध्ये पाणी साचते. यासाठी पाइपलाइन टाकण्याबाबतही चर्चा करण्यात आली. नागपूर शहरातून निघणारा घनकचरा वाढत आहे. त्यामुळे कचरा तुंबणार नाही, यासाठी व्यापक उपाय करण्यात येणार आहेत. शहरातील कचरा वेगाने उचलला पाहिजे, अशा सूचना अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत. शहरातील अनेक भागात ड्रेनेज चोक होतात. ड्रेनेज सुस्थित राहतील याची काळजी घेण्याचे आदेशही दिल्याचे फडणवीस यांनी नमूद केले. 

Nagpur : गडकरी, फडणवीसांच्या बैठकीत काँग्रेस नेते!

सल्लागाराची नियुक्ती

नागपुरातील सिव्हेज आराखडा तयार करण्यासाठी सल्लागाराची नियुक्ती करण्यात आली आहे. महापालिकेच्या कार्यक्षेत्रात हा सल्लागार काम करणार असल्यााचे फडणवीस यांनी स्पष्ट केले. नागपूर शहरातील आढावा बैठकीच्या व्यतिरिक्त राजकीय विषयावरही उपमुख्यमंत्र्यांनी भाष्य केले. ते म्हणाले, महाविकास आघाडीत मुख्यमंत्री पदासाठी कोणतीही स्पर्धा नाही. मतभेद नाहीत. विरोधक विनाकारण संभ्रम तयार करीत आहेत. महायुतीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) प्रमुख आहेत. त्यांचा नेतृत्वाखाली आम्ही निवडणूक लढत आहोत, असेही फडणवीस म्हणाले.

महायुतीचे सरकार (Mahayuti Government) आल्यास मुख्यमंत्री कोण होणार, हा आपल्यास्तरावरील विषय नाही. त्यामुळे यासंदर्भात बोलण्याचा अधिकार नाही. मुख्यमंत्री पदाबाबत भाजपचे ‘पार्लिमेंट्री बोर्ड’, एकनाथ शिंदे, अजित पवार हे दोन्ही नेते मिळून निर्णय घेतील. निवडणुकीच्या पूर्वी यावर बोलायचे की नंतर हे देखील तेच ठरवतील. यासंदर्भात आपल्याला बोलण्याचा अधिकार नाही. परंतु यासंदर्भात कोणताही संभ्रम नाही, असेही फडणवीस यांनी स्पष्ट केले. आगामी निवडणुकीत जनता महायुतीला नक्की यश देईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. जागावाटप आणि उमदेवारांच्या नावांबाबतही लवकरच घोषणा होईल, असे संकेतही फडणवीस यांनी दिले.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!