प्रशासन

Nagpur Medical College : 11 डॉक्टर विरोधात गुन्हा दाखल

Negligency :  हलगर्जीपणामुळे रुग्णाचा गेला जीव, नातेवाईकांचा आरोप

Nagpur : मेडिकलचे अधिष्ठाता डॉ.राज गजभिये यांच्यासह 11 डॉक्टरांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 2019 साली मेडिकलमध्ये शस्त्रक्रियेसाठी आलेल्या एका महिलेचा मृत्यू झाला होता. त्या प्रकरणात तिच्या कुटुंबियांनी न्यायालयात धाव घेतली होती. न्यायालयाच्या निर्देशा नंतर अजनी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामुळे वैद्यकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे

आरोपींमध्ये डॉ.राज गजभिये यांच्यासह डॉ.भुपेश तिरपुडे, डॉ.हेमंत भनारकर, डॉ.वासुदेव बारसागडे, डॉ.अपूर्वा आनंद, डॉ.सुश्मिता सुमेर, डॉ.विक्रांत अकुलवार, डॉ.गायत्री देशपांडे, डॉ.गिरीश कोडापे, डॉ.विधेय तिरपुडे व डॉ.गणेश खरकाटे यांचा समावेश आहे. जिल्हा न्यायालयाचे सेवानिवृत्त अधीक्षक केवलराम पांडुरंग पटोले हे तक्रारदार आहेत.

काय आहे प्रकरण

केवलराम पांडुरंग पटोले यांची पत्नी पुष्पा पटोले यांच्या मानेवरील गाठीसंदर्भात डॉ.गजभिये यांना दाखवण्यात आले. 5 जुलै 2019 रोजी त्यांना शस्त्रक्रियेसाठी बोलविण्यात आले होते. 6 जुलै रोजी पुष्पा यांच्यावर शस्त्रक्रिया झाली. मात्र,अचानक पत्नीची प्रकृती गंभीर झाल्याचे अन्य डॉक्टरांनी सांगितले. त्यांना बाहेर काढल्या नंतर डोळ्यावर कापूस ठेवला होता व नाकाला रबरी नळी जोडली होती. त्यांना आयसीयूमध्ये नेण्यात आले व नातेवाईकांना भेटू देखील दिले नाही. उपचारासाठी दुसरीकडे नेऊ देखील दिले नाही. 8 जुलै रोजी पटोले यांनी ओळखीच्या डॉक्टरांच्या माध्यमातून डिस्चार्जसाठी संपर्क साधला असता रात्री त्यांच्या पत्नीचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले.

पत्नीचे शवविच्छेदन देखील झाले नाही.

शस्त्रक्रियेदरम्यानच पत्नीचा मृत्यू झाला होता, मात्र निष्काळजीपणा लपविण्यासाठी गजभिये व इतर डॉक्टरांनी पुष्पा यांना कार्डिॲक अरेस्ट आल्याचे नाटक केल्याचा आरोप पटोले यांनी केला. 30 जून 2020 रोजी त्यांनी अजनी पोलिस ठाण्यात डॉ.गजभिये व इतर डॉक्टरांविरोधात तक्रार केली होती. या तक्रारीवर चौकशी समिती नेमली असता पाच डॉक्टरांच्या समितीने पुष्पा यांचा मृत्यू कार्डिॲक अरेस्टने झाल्याचे अहवालात नमूद केले.

Maharashtra Lok Sabha Election : आजही माझा परिवार एका बाजूला

15 एप्रिल 2022 रोजी पटोले यांनी नागपूर पोलिस आयुक्त कार्यालयात तक्रार केली. तसेच न्यायालयात देखील धाव घेतली. 2 मे रोजी अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी यांनी संबंधित डॉक्टरांविरोधात गुन्हा दाखल करण्याचे निर्देश दिले. त्यानुसार अजनी पोलिस ठाण्यात या 11 डॉक्टरांविरोधात कलम 201, 202, 304-अ व 34 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!