Nagpur News : पुणे येथील अल्पवयीन आरोपीला वाचवण्यासाठी ससून हाॅस्पिटलच्या डाॅक्टरांनी वैद्यकीय पेशाला काळिमा फासला. आणि नागपूर पोलिसांच्या भूमिकेवर देखील प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. एकेक संतापजनक बाबी महाराष्ट्रात समोर येत आहे.
नागपूर शहरातील गिट्टीखदान परिसरात 7 मे रोजी मॉर्निंग वॉकला गेलेल्या दोन महिलांना एका कारचालकाने बेदकारपणे उडविले. याचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले असून हा अपघाताचा बनाव असल्याचे स्पष्टपणे दिसत आहे. या घटनेच्या 23 दिवसानंतर पोलिसांना आरोपी सापडतो. पोलिसांनी या आरोपीला केवळ नोटीस देवून सोडून दिले. पुण्यातील हिट ॲन्ड रन प्रकरणासारखे नागपूर पोलिसही आरोपीला वाचविण्याचा प्रयत्न करत आहेत का? असा प्रश्न नागपूरकरांना पडला आहे.
BJP on Awhad : खामगावात आव्हाडांचे फोटो या आमदाराने पायदळी तुडविले !
जखमी महिलांवर शासकीय खर्चाने उपचार करा
नागपूर पोलिसांनी या प्रकरणाचा सखोल तपास करुन दोषीवर कारवाई करावी तसेच या अपघातामध्ये ज्या दोन महिला गंभीर जखमी झाल्या आहेत, त्यांच्याकडे उपचारासाठी पैसे नाहीत. त्यामुळे त्यांनी पूर्ण उपचार न करता रुग्णालयातून डिस्चार्ज घेतला. या दोन्ही जखमी महिलांवर शासकीय खर्चाने उपचार करावेत, अशी मागणी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केली आहे.
कायद्याचे राज्य आहे की नाही
महाराष्ट्रात हिट अँण्ड रनच्या घटना एका मागोमाग घडत आहेत. या प्रकरणातील आरोपींना शिक्षा व्हावी म्हणून पुढाकार घेणे आवश्यक आहे. परंतु त्या ऐवजी आरोपीला कसे वाचवता येईल हा प्रयत्न होताना दिसतो. पुण्यातील डाॅक्टरांनी तर पैशाच्या हव्यासापोटी वैद्यकीय मूल्य पायी तुडवले तर नागपुरात पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. ‘कुठे नेऊन ठेवला महाराष्ट्र माझा’ असे म्हणण्याची वेळ आली आहे. परंतु आरोपींना पाठीशी न घालता त्यांना शासन झालेच पाहिजे. ही जन भावना आहे.