महाराष्ट्र

Devendra Fadanvis : उपमुख्यमंत्र्यांना प्रश्न विचारणे गुन्हा आहे का?

Nagpur Congress : बॅनर फाडल्यावरुन शहर कॉंग्रेसमध्ये रोष.

काँग्रेस नेते माजी नगरसेवक प्रफुल गुडधे यांचे बॅनर फाडल्यावरुन शहर कॉंग्रेसमध्ये सत्तारुढ पक्षांविरुद्ध रोष उफाळून आला आहे. नगरसेवक प्रफुल गुडधे यांनी यामागे भाजपचा हात असल्याचा आरोप केला आहे. फडणवीस यांना प्रश्न विचारणे हा आमचा गुन्हा आहे काय, असा सवाल प्रशासनासमोर उपस्थित करुन प्रशासनाला धारेवर धरले आहे.

गेल्या काही दिवसांपासून दक्षिण-पश्चिम नागपूरमध्ये बॅनरवरुन कॉंग्रेस भाजपमध्ये शितयुद्ध सुरु आहे. विधानसभा निवडणुका लक्षात घेता भाजपच्यावतीने दक्षिण-पश्चिम नागपुरात 20 ते 25 ठिकाणी बॅनर लावून स्वतः केलेल्या कामांची फसवी जाहिरात करणे सुरू आहे. सर्वसमान्यांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला जात आहे. हे स्वतःची पाठ स्वतःच थोपटून घेण्यासारखे आहे. हे बॅनर पाहून कॉंग्रेसच्यावतीने प्रफुल गुडधे यांनी त्यांच्या केलेल्या दाव्यांचा बॅनरमधून सडकून समाचार घेतला.

दाव्यावर प्रश्न उपस्थित..

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या प्रत्येक दाव्यावर गुडधे यांनी प्रश्न उभा करुन भाजपचे सर्व दावे खोडून काढले आहेत. भाजपने लावलेल्या जलयुक्त शिवारच्या होर्डिंगवरुन त्यांच्याच बाजूलाच लावलेल्या बॅनरवर नगरसेवक प्रफुल्ल गुडधे यांनी साहेब, पावसाळ्यात जलयुक्त शहरचे काय, असा प्रश्न उपस्थित केला. भाजपने केलेल्या प्रत्येक दाव्यावर गुडधे यांनी प्रश्नचिन्ह लावले. त्यामुळे खवळलेल्या फडणवीसांनी शेवटी प्रशासनावर दबाव आणून महानगरपालिका आयुक्तांना सांगून बॅनर हटविण्याचे आदेश दिले.

महापालिकेच्या लक्ष्मीनगर झोनने हे सर्व बॅनर अवैध असल्याचे सांगत दोन्ही पक्षांचे बॅनर प्रशासनाकडून काढून जप्त केले. दरम्यान महापालिका आयुक्त डॉ.अभिजित चौधरी यांच्याशी फोनवरुन बोलून ही कारवाई पक्षपातीपूर्ण असल्याचा आरोप गुडधे यांनी केला. भाजपचे बॅनर आमच्या आधी आठ दिवसांपूर्वी लागले होते. त्यांच्या बॅनरवर कार्यवाई न करता आमचे बॅनर लागताच अवैध ठरवून प्रशासनाने ते हटविण्याचा निर्णय घेणे म्हणजे सत्तारुढ पक्षाच्या प्रभावातून केलेला हा अन्यायच आहे, असा आरोप गुडधे यांनी केला.

लोकशाहीत आम्हालाही अधिकार

ही लोकशाही आहे आणि लोकशाहीत तुम्हाला जसा व्यक्त होण्याचा अधिकार आहे, तसा आम्हालाही आहे. अशी दडपशाही करणे योग्य नाही. आपले खोटे दावे जनतेच्या लक्षात येऊ नये म्हणून प्रशासनाला हाताशी धरुन बॅनर हटविण्याची भाजपने भ्याड कार्यवाई केली. ‘खोटे बोला पण रेटून बोला’ अशाप्रकरची भाजपची ही कृती आहे.

Mumbai : काँग्रेसच्या न्याय यात्रेला मुंबईतून सुरुवात

असत्याचा बुरखा फाडून त्यांनी अब्रू चव्हाट्यावर टांगताच त्यांचा जळफळाट होणे अपेक्षितच होते. ‘ये पब्लिक है सब जानती है. या कारवाईने भाजपचे पितळ उघडे पडले आहे. याचे उत्तर लवकरच मतदारच देणार असल्याची प्रतिक्रिया गुडधे यांनी दिली. ‘बॅनरवॉर’ प्रकरणावरुन शहर कॉंग्रेसमध्ये वातावरण प्रचंड तापले असून कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी रोष व्यक्त केला जात आहे.

सत्तारुढ पक्ष भाजप हा रडीचा डाव खेळत आहे. वारंवार खोटे बोलून ते जनतेची दिशाभूल करीत आहे. आम्ही केलेल्या प्रश्नांवर त्यांच्याकडे कुठलेच उत्तर नाही. त्यामुळे त्यांना सत्याची मिरची झोंबली आहे. त्यांनी हातघाईवर येऊन प्रशासनाला दबावाखाली घेऊन सत्याला खोडण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या या कृतीला लवकरच जनतेच्या दरबारत उत्तर मिळेल, असे प्रफुल्ल गुडधे यांनी ‘द लोकहित’ला सांगितले.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!