महाराष्ट्र

Nagpur : नितीन राऊत म्हणतात, ‘संविधानाचाच मुद्दा परिणामकारक’

Nitin Raut : ‘द लोकहित’शी खास बातचित; ‘विधानसभेत आरक्षणाचा मुद्दा ठरेल परिणामकारक’

Assembly Election : लोकसभा निवडणुकीत काँग्रेसने देशभर संविधान आणि आरक्षणाचा मुद्दा लावून धरला. त्याचा परिणाम झाला आणि देशभरात भाजप व एनडीएच्या गेल्या निवडणुकीपेक्षा कमी जागा आल्या. महाराष्ट्रात तर महाविकास आघाडीने महायुतीला धोबीपछाड दिले. आता विधानसभेतही हाच मुद्दा परिणामकारक ठरेल, असा दावा माजी मंत्री व उत्तर नागपूरचे काँग्रेसचे उमेदवार नितीन राऊत यांनी केला आहे. ‘द लोकहित’शी त्यांनी खास बातचित केली. 

उत्तर नागपूर मतदारसंघात सर्व जाती-धर्मांचे लोक आहेत. परप्रांतातून आलेले लोकही येथे स्थायिक झालेले आहेत. या लोकांनी आमच्यासोबत मैत्री जोपासलेली आहे. मी सुद्धा आजपर्यंत माझ्या जनतेला भरभरून देण्याचा प्रयत्न केला आहे. मतदारसंघात फेरफटका मारताना अनेक समस्या माझ्यापर्यंत येतात. त्यावरून या निवडणुकीतही लोकसभेप्रमाणे संविधान आणि आरक्षणाचाच विचार करूनच लोक मतदान करतील, असा दावा नितीन राऊत यांनी केला आहे.

उत्तर नागपुरात सलग तीन निवडणुका जिंकल्यानंतर नितीन राऊत यांची घोडदौड 2014 मध्ये थांबली होती. भाजपचे उमेदवार डॉ. मिलिंद माने यांच्याकडून त्यांना पराभव पत्करावा लागला होता. 2019 मध्ये पुन्हा एकदा दोघांमध्ये सामना झाला. पण, यावेळी नितीन राऊत यांच्या बाजुने निकाल लागला. या दोघांमध्ये आता सलग तिसऱ्यांदा लढत होणार आहे. काँग्रेसच्या बाजुने तर नितीन राऊत यांची उमेदवारी आधीपासून निश्चित होती. भाजपमध्ये मात्र माने यांच्या ऐवजी दुसऱ्याला संधी देण्याचा विचार सुरू होता. संदीप जाधव, धर्मपाल मेश्राम ही नावे चर्चेतही होती. पण नेत्यांनी रिस्क न घेता माने यांनाच उमेदवारी दिली.

आता डॉ. माने आणि राऊत यांच्यात हा सलग तिसरा सामना असेल. यात दोनवेळा राऊत, तर एकदा माने विजयी झाले आहेत. नितीन राऊत यांनी ‘द लोकहित’शी बोलताना भाजपवर टीका केली आहे. भाजप हा मूळ पक्ष राहिलेलाच नाही. इतर पक्ष फोडून नेते, कार्यकर्ते आणले आहेत. आता तर आपल्याच नेत्यांना इकडचे तिकडे पाठवून निवडणूक लढत आहेत, अशी टीका राऊत यांनी केली

बाबासाहेब म्हणाले होते..

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि काँग्रेस यांच्यापैकी कुणाला निवडायचं असेल तर काँग्रेसला निवडा, असं डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सांगितलं होतं, असा दाखलाही नितीन राऊत यांनी दिला.

लाडकी बहीण’ हा लाच देण्याचा प्रकार

नितीन राऊत यांनी यावेळी महायुती सरकारच्या लाडकी बहीण योजनेवरही टीका केली. लडकी बहीण योजनेमध्ये महिलांना पैसे देणे म्हणजे मतांसाठी लाच देण्याचा प्रकार आहे, अशी जोरदार टीका त्यांनी केली आहे.

निकाल आमच्याच बाजुने

2020-21 मध्ये लॉक डाऊन असताना कोरोना काळात आम्ही लोकांना सावरलं. त्यांना सर्वतोपरी मदत केली. त्यामुळे लोक महाविकास आघाडीलाच निवडून देतील, असा विश्वास राऊत व्यक्त करतात. महाविकास आघाडीमध्ये आम्ही सर्व नेते सहभागी झालो. आमच्यात अतूट एकी आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीपेक्षाही चांगले निकाल विधानसभा निवडणुकीत आमच्या बाजूने लागतील.

Assembly Election : मुनगंटीवार म्हणतात, ‘आता फेक नरेटिव्ह चालणार नाही’

ही तर त्यांची भावना

समाजाच्या भावनांवर मुख्यमंत्री ठरत नाही. निवडणुकीच्या निकालात कुणाकडे किती सदस्य निवडून आले यावर मुख्यमंत्रीपदाचा नेता ठरत असतो. ‘बौद्ध समाजाचा मुख्यमंत्री व्हावा’, अशी मागणी जर समाजाने केली असेल तर त्या त्यांच्या भावना आहेत, असंही राऊत म्हणाले.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!