राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांच्यावर गोळीबार करण्यात आला. ही खळबळजनक घटना रविवारी रात्री उशिरा पुण्यातील नानापेठेत घडली. या गोळीबारात सुरुवातीला वनराज आंदेकर गंभीर जखमी झाले होते. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्यावर पाच गोळ्या झाडण्यात आल्याची माहिती आहे. पुण्यातील मध्यवर्ती आणि गर्दीच्या गणेशपेठ येथे हा गोळीबार करण्यात आला. 15 ते 16 जणांच्या टोळीकडून हा गोळीबार करण्यात आला.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (अजित पवार गट) माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांच्यावर मध्यरात्री पुण्यात अंधाधुद गोळीबार करण्यात आला आहे. नानापेठ परिसरात ही घटना घडल्याची प्राथमिक माहिती आहे. आधी परिसरातील लाईट घालवण्यात आले आणि त्यानंतर वनराज आंदेकर यांना एकट्याला गाठून त्यांचावर अंधाधुद गोळीबार करण्यात आला. काही कळण्याआधीच पुन्हा हल्लेखोरांनी त्यांचावर कोयत्याने सपासप वार केले. प्रत्यक्षदर्शनींनी वनराज आंदेकर यांना रुग्णालयात हलवले. खूप रक्तस्त्राव झाल्याने आंदेकर यांचा मृत्यू झाला.
घरगुती वादातून फायरिंग ?
घरगुती वादातून बंडु आंदेकर यांचा जावई गणेश कोमकर यानं फायरिंग केल्याचं सांगितलं जात आहे. गणेश कोमकर यानं काही वर्षांपूर्वी शिवसेना शहर प्रमुख रामभाऊ पारेख याच्यांवर अॅसिड हल्ला केला होता. बंडु आंदेकर हे वनराज आंदेकर यांचे वडील आहेत.
आधी बत्ती गुल, नंतर हल्ला
गोळीबारकरून हल्लेखोरांनी कोयत्याने वार केले अशी माहिती प्रकरणातील मिळत आहे. आधी परिसरातील आणि नानापेठ चौकातील लाईट आरोपींनी घालवले. त्यानंतर वनराज आंदेकर यांना एकट्यात गाठून हल्ला करण्यात आला. काही कामानिमित्त आंदेकर नानापेठेत गेले होते. आंदेकर यांचा काही घरगुती कार्यक्रम असल्यामुळे त्यांच्यासोबत इतर सहकारी किंवा कार्यकर्ते नव्हते. हल्लेखोरांनी नेमकी हीच संधी साधून हल्ला केला. आधी बाइकवरुन आलेल्या तीन ते चार जणांनी वनराज आंदेकर यांच्यावर गोळ्या झाडल्या आणि त्यानंतर कोयत्याने सपासप वार केले. गंभीर जखमी झालेल्या आंदेकर यांना तातडीने केएम रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु, त्यांची प्राणज्योत मालवली.
पोलिसांकडून तपास सुरू
माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांच्या पुण्यातील गणेशपेठ येथील घरासमोरच 15 ते 16 जणांच्या टोळीकडून पाच गोळ्या झाडण्यात आल्या. यात वनराज यांचा मृत्यू झाला. गोळीबार करणारे फरार झाले. घटनास्थळी समर्थ पोलीस ठाण्याचे अधिकारी यांच्यासह गुन्हे शाखेचे अधिकारी खल झाले. पूर्ववैमन्यासातून हा हल्ला झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जातोय. या घटनेनं पुणे शहरात पुन्हा एकदा गँगवॉर सुरू झालं की काय? असा सवाल उपस्थित केला जात आहे.