प्रशासन

Akola MSEDCL : लोक कंटाळले; रोहित्राची महाआरती करीत निषेध

Power Play : अनोख्या आंदोलनानंतरही महावितरणला अजगराप्रमाणे सुस्त

Interrupted Electricity : वीज पुरवठा वारंवार खंडित होण्याचे प्रकार गेल्या अनेक दिवसांपासून सुरू आहेत. महावितरण आणि सरकारच्या दुर्लक्षाला नागरिक वैतागले आहेत. वारंवार वीज पुरवठा खंडित होत असल्याने महावितरणबद्दल प्रचंड रोष आहे. दमदार पाऊस नसल्यामुळे नागरिक उकाड्यापासून त्रस्त आहेत. अशात वारंवार वीज पुरवठा खंडित होत असल्याने अकोला शहरातील गीता नगर परिसरात नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. या त्रासाला कंटाळून अखेर माजी महापौर मदन भरगड यांच्यासह परिसरातील नागरिकांनी रोहित्राची महाआरती करीत आंदोलन केले.

गेल्या काही दिवसांपासून अकोल्यातील काही भागात वारंवार विद्युत पुरवठा खंडित होत आहे. सर्वाधिक त्रास अकोल्यातील जुने शहर भागात आहे. अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघात हा भाग येतो. या प्रकारामुळे नागरिक त्रस्त आहेत. असा कोणता तांत्रिक बिघाड निर्माण झाला आहे, जो दुरुस्त होऊ शकत नाही? असा प्रश्न नागरिकांसमोर निर्माण झाला आहे. यासर्व प्रकारामुळे नागरिकांमध्ये महावितरणबद्दल संतापाची लाट आहे.

फिडरमध्ये बदल

गीता नगर परिसरातील विद्युत पुरवठा गोरक्षण फिडरवरून करण्यात येत होता. गोरक्षण फिडरवरून अनेक भागांना विद्युत पुरवठा होतो. त्यामुळे कोणत्याही भागात बिघाड झाल्यास गीता नगर परिसरातील विद्युत पुरवठा बंद करण्यात येतो.

Bomb News : अमरावती मध्यवर्ती कारागृहात बॉम्ब? 

परिणामी वाशिम बायपास फिडरवरून विद्युत पुरवठा करण्यात यावा, अशी मागणी माजी महापौर मदन भरगड यांनी केली होती. त्यानंतर ठेकेदाराने विद्युत खांब बसविले. मात्र केबल न टाकल्याने काम अर्धवट आहे. त्यामुळे महावितरणचे लक्ष वेधण्यासाठी माजी महापौर मदन भरगड यांनी शेकडो नागरिकांसह विद्युत रोहित्राची महाआरती केली.

गोरक्षण रोड फिडरवरून कैलास टेकडी, खदानसह अनेक भागात विद्युत पुरवठा करण्यात येतो. त्यामुळे गोरक्षण रोड फिडरवर मोठ्या प्रमाणात ताण येत होता. दररोज कोणत्या ना कोणत्या भागात बिघाड निर्माण होत होता. परिणामी मानव शोरूमपासून हिंगणा मंदिर

गीतनगर, स्नेहनगर, पोलिस वसाहत, अकोली खुर्द, एमरॉल्ड कॉलनी, रेणुका ड्युप्लेक्स, रूपचंद नगर, मातोश्रीनगर, हिंगणा, सोमठानापर्यंत विद्युत पुरवठा खंडित होत होता. दररोज होणाऱ्या विजेच्या लपंडावामुळे नागरिक त्रासले. त्यांनी हा प्रश्न सोडविण्याची माजी महापौर मदन भरगड यांना विनंती केली.

भरगड यांनी तत्कालीन पालकमंत्री बच्चू कडू यांची भेट घेऊन नागरिकांची समस्या सांगितली. बच्चू कडू यांनी विद्युत खांब टाकून वाशिम बायपास फिडरवरून वीज पुरवठा देण्यासाठी निधीची तरतूद केली होती. ‘वर्कऑर्डर’ही काढण्यात आली. वाशिम बायपास ते कलोरे कॉम्प्युटरपर्यंत विद्युत खांब उभारण्यात आले. मात्र गेल्या दोन वर्षांपासून केबल न टाकल्याने काम अर्धवटच आहे. त्यामुळे विद्युत पुरवठा गोरक्षण फिडरवरून होत आहे.

दररोज नागरिकांना त्रास सहन करावा लागत असल्याने आता लोक संतापले आहेत. सहनशीलता संपल्याने मदन भरगड यांच्या नेतृत्वात गीता नगर परिसरात रोहित्राची महाआरती करण्यात आली.

Indian Army : मोरगाव भाकरे येथील जवानाला वीरमरण!

अनोख्या आंदोलनाने वारंवार खंडित होणाऱ्या विविध पुरवठ्याची समस्या पुन्हा एकदा ऐरणीवर आली आहे. महाआरतीला राजेंद्र चितलांगे, गणेश कटारे, रघुनाथ खडसे, अभिषेक भरगड, गणेश कलसकर आदी उपस्थित होते.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!