Nilesh Lanke : राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) खासदार निलेश लंके हे खासदार म्हणून निवडून आल्यांनतर पहिल्यांदाच विधानभवनात दाखल झाले होते. विधानभवनाच्या पायऱ्यांजवळ येताच त्यांनी केलेली कृती सध्या सोशल मीडियावर व्हायरल होते आहे. काही दिवसांपूर्वी संसदेत शपथ घेतानाही त्यांनी आपले वेगळेपण दाखवत सर्वांचे लक्ष वेधले होते.
खासदार निलेश लंके यांनी विधान भवनाच्या पायऱ्यांना वाकून नमस्कार करीत दर्शन केले. निलेश लंके यांनी केलेली हीच कृती सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ‘माझ्या मतदारसंघातील विविध कामांसंदर्भात विधानभवनात आलो होतो. त्यावेळी जुने सहकारी भेटले. आनंद वाटला. 2019 मध्ये या विधानभवनात आमदार म्हणून आलो होतो. साडेचार वर्ष सामान्य नागरिकांसाठी अभिमानाने काम केल्याचा आनंद वाटतो,’ अशी प्रतिक्रिया निलेश लंके यांनी व्यक्त केली.
अजितदादांची भेट झाली का?
यावेळी पत्रकारांनी अजितदादांची भेट झाली का, असा प्रश्न केला. यावर खासदार लंके म्हटले, “दादा कामात व्यस्त आहेत. त्यामुळे त्यांची भेट होऊ शकली नाही.’ नीलेश लंके विधान भवन परिसरात येतात त्यांच्याभोवती त्यांच्या चाहत्यांचा गराडा पडला. त्यांच्या जुन्या सहकाऱ्यांच्या त्यांनी गाठीभेटी घेतल्या. खासदार लंके विधानभवनातून बाहेर पडल्यानंतर थेट शरद पवार यांच्या भेटीसाठी निघून गेले.
राज्याचा राजकारणाचा ट्रेंड बदललेला..
विधानसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर खासदार नीलेश लंके यांनी प्रतिक्रिया दिली. ‘राज्याचा राजकारणाचा ट्रेंड बदललेला आहे. महाविकास आघाडीला सहानुभूतीची लाट आहे.
Eknath Shinde : मिहिरला पाठीशी घालणार नाही, राजेश शहांना पदमुक्त केले !
महाविकास आघाडीच राज्यातील शेतकरी आणि सर्वसामान्यांचे प्रश्न समजून घेऊ शकते आणि ते प्रश्न सोडवूदेखील शकते,’ असे नीलेश लंके यांनी म्हटले.
इंग्रजीत शपथ घेऊन विखेंना दिले होते उत्तर !
18व्या लोकसभेच्या नवनिर्वाचित सदस्यांचा शपथविधी सोहळा मागील महिन्यात पार पडला. अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) खासदार निलेश लंके यांनी इंग्रजीत लोकसभेच्या सदस्यत्वाची शपथ घेतली. लोकसभेत इंग्रजीतून शपथ घेत निलेश लंके यांनी सुजय विखे पाटील यांच्या आव्हानाला संसदेतून उत्तर दिल्याचे पाहायला मिळाले होते.
सुजय विखे संसदेत इंग्रजीत भाषण करतानाचा एक व्हिडीओ दाखवण्यात आला होता. तेव्हा समोरच्या उमेदवाराने एक महिना पाठांतर करून तरी असं इंग्रजी बोलून दाखवलं, तर मी उमेदवारी अर्ज भरणार नाही, असं सुजय विखे म्हणाले होते. याच आव्हानाला निलेश लंके यांनी आपल्या कृतीतून उत्तर दिलं होतं.