महाराष्ट्र

Swati Maliwal स्वपक्षीय नेत्यांकडून माझे चारित्र्यहनन

AAP : तक्रार मागे घ्यावी म्हणून प्रचंड दबाव

Delhi News दिल्ली महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा, खासदार स्वाती मालिवाल यांना जीवे मारण्याच्या आणि बलात्कार करण्याच्या धमक्या येत आहेत. आपल्यासोबत झालेल्या गैरवर्तनाच्या घटनेनंतर स्वाती मालिवाल यांनी आप वर गंभीर आरोप केले आहेत. 

मालिवाल यांनी एक्स पोस्टमध्ये म्हटले आहे, “माझ्या स्वतःच्या पक्षाच्या, आपच्या नेत्यांनी माझ्याविरुद्ध चारित्र्यहनन, लाजिरवाणी मोहीम राबवली. आता मला बलात्कार आणि जीवे मारण्याच्या धमक्या येत आहेत. जेव्हा YouTuber @Dhruv_Rathee ने माझ्या विरोधात एकतर्फी व्हिडिओ पोस्ट केला. असे सांगून स्वाती मालिवाल यांनी असा दावा केला की मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचे सहकारी विभव कुमार यांच्याविरोधातील तक्रार मागे घेण्यासाठी धमकावण्याचा प्रयत्न करत आहे. स्वाती मालिवाल यांच्यासोबत गैरवर्तन केल्याच्या आरोपावरून मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचे सहकारी विभव कुमार यांना 4 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.

बदनामीचा प्रयत्न .. 

मी तक्रार मागे घ्यावी, यासाठी माझा पक्ष पूर्ण ताकदीनिशी प्रयत्न करत आहे. त्यासाठी मला धमकावण्याचा वारंवार प्रयत्न केला जात आहे. तसेच ध्रुव राठीला माझी बाजू समजावून सांगण्यासाठी मी त्याच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला. परंतु त्याने माझा कॉल आणि मेसेजेसकडे दुर्लक्ष केले”, असेही स्वाती मालिवाल यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.

स्वाती मालिवाल यांनी सांगितल्याप्रमाणे ध्रुव राठीने 22 मे रोजी एक व्हिडीओ युट्यूबवर शेअर केला आहे. ध्रुव राठीला युट्यूबवर दोन कोटी लोक फॉलो करतात. तर एक्स या साईटवर त्याचे 2.2 कोटी फॉलोअर्स आहेत. स्वाती मालिवाल यांच्या संपूर्ण प्रकरणामध्ये काय काय घडले? याचा व्हिडीओ ध्रुव राठीने प्रसारित केला आहे.

Amit Shah : नक्षलवादाचा देशातून लवकरच खात्मा

मालिवाल यांनी म्हटले, मला काही झाले तर भडकावणारा कोण आहे हे सर्वांना माहीत आहे.ध्रुव राठीने मला इतके लाजवले आहे की आता मला जास्त शिवीगाळ आणि धमक्या येत आहेत. संपूर्ण पक्ष आणि त्याच्या समर्थकांनी ज्याप्रकारे माझी बदनामी करण्याचा आणि लाजिरवाणा करण्याचा प्रयत्न केला आहे, त्यावरून महिलांच्या प्रश्नांवर त्यांची भूमिका स्पष्ट होते. मी दिल्ली पोलिसांत बलात्कार आणि खुनाच्या धमक्यांविरोधात गुन्हा दाखल करत आहे. ते गुन्हेगारांवर कठोर कारवाई करतील. असे त्या म्हणाल्या.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!