महाराष्ट्र

Maratha Reservation : खासदाराच्या पत्रामुळे ओबीसी, कुणबी समाज नाराज

Sanjay Deshmukh : जरांगेंची मागणी पूर्ण करण्याची विनंती

MP Sanjay Deshmukh : यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघाचे नवनिर्वाचित खासदार संजय देशमुख यांनी राज्यपालांना पत्र लिहिले आहे. ‘मनोज जरांगे यांच्या मागणीप्रमाणे मराठा समाजाला आरक्षण लागू करण्यासंदर्भात महाराष्ट्र शासनाला सूचित करावे’, अशी विनंती पत्रात केली आहे. खासदर संजय देशमुख यांच्या पत्रामुळे यवतमाळ जिल्ह्यातील ओबीसी बांधवांच्या भुवया उंचावल्या असून कुणबी, ओबीसी समाज नाराज झाल्याची माहिती आहे.

आरक्षणातील ‘सगेसोयरे’ या संदर्भात अध्यादेशाची अंमलबजावणी करावी, मराठा-कुणबी एकच असल्याचा कायदा पारित करावा आदी मागण्यांच्या पूर्ततेसाठी 8 जूनपासून मनोज जरांगे यांनी जालना जिल्ह्यातील आंतरवली सराटी येथे आमरण उपोषण सुरू केले होते. शासनाने त्याची दखल घेतल्यानंतर, आरक्षणाच्या मुद्द्यावर निर्णय घेण्यासाठी एक महिन्याची मुदत देवून जरांगे यांनी 13 जूनला उपोषण स्थगित केले.

मराठा आरक्षणासाठी उपोषण सुरू असताना, यवतमाळ-वाशिमचे नवनिर्वाचित खासदार संजय देशमुख यांचे एक पत्र समोर आले आहे. या पत्रामुळे आता सामाजिक राजकारणाला सुरुवात झाली आहे. 12 जून रोजी महाराष्ट्राच्या राज्यपालांना पाठविलेल्या पत्रात, मनोज जरांगे यांच्या मागणीप्रमाणे मराठा समाजाला आरक्षण देण्यासंबंधी महाराष्ट्र शासनाला निर्णय घेण्यास तत्काळ सूचना देण्याची मागणी केली.

पत्रामध्ये खासदार देशमुख यांनी, मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा दाखला देत, महाराष्ट्र शासन जरांगे यांच्या मागण्यांना गांभीर्याने घेताना दिसत नसल्याचे म्हटले आहे. शासन वेळकाढूपणाचे धोरण अवलंबत असल्याचा आरोपही केला आहे. मराठा समाज रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करण्याच्या पवित्र्यात असल्याचेही देशमुख यांनी पत्रात म्हटले आहे. हे पत्र राज्यपालांना पाठविल्यानंतर ते आता समाज माध्यमांवरही प्रसारित झाले आहे. जरांगे यांनी उपोषण स्थगित केल्याने देशमुख यांच्या पत्राचा फार प्रभाव राहिला नाही. परंतु, या पत्रामुळे जिल्ह्यातील कुणबी, ओबीसी बांधवांमध्ये अस्वस्थता पसरली आहे. 

खासदार संजय देशमुख हे मराठा समाजातून येतात. मात्र यवतमाळ जिल्ह्यात मराठ्यांपेक्षा कुणबी व ओबीसींची संख्या अधिक आहे. नुकत्याच झालेल्या निवडणुकीत संजय देशमुख यांना कुणबी, ओबीसींसह दलित, मुस्लीम मतदारांनी भक्कम साथ दिल्याने ते मोठ्या मताधिक्याने निवडून आले. असे असताना त्यांनी मराठ्यांना ओबीसींमधून आरक्षण देण्याची कारवाई करण्याबाबत शासनाला सूचित करावे, अशी विनंती राज्यपालांकडे केल्याने जिल्ह्यातील कुणबी, ओबीसी नेत्यांसह नागरिकांमध्ये नाराजी पसरली आहे.

Sudhir Mungantiwar : विजग्राहकांना दिलासा देण्यासाठीच सरकारचा ‘स्मार्ट’ निर्णय

पत्र द्यायला नको होते : ओबीसी जनमोर्चा

यवतमाळ जिल्ह्यातील बहुसंख्य कुणबी, ओबीसी, एनटी आदी प्रवर्गातील मतदारांनी संजय देशमुख यांना मतदान करून निवडून आणले आहे. असे असताना त्यांनी या प्रकारे मराठ्यांना मनोज जरांगे यांच्या म्हणण्यानुसार आरक्षण देण्याची मागणी केली, ही बाब अत्यंत चुकीची आहे. आरक्षणाचा विषय समजून न घेता देशमुख यांनी असे पत्रच द्यायला नको होते, या पत्रामुळे जिल्ह्यातील कुणबी, ओबीसी, बंजारा आदी घटक दुखावले आहेत, असे असे सांगण्यात येत आहे.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!