Buldhana constituency : लोकसभा निवडणुकीत जिल्ह्यात यंदा कमी मतदान झाले. सायंकाळी 6 वाजेपर्यंत बुलढाणा जिल्ह्यात सरासरी 60.03 टक्के मतदान झाल्याची माहिती प्रशासनाकडून जाहीर करण्यात आली आहे. 6 वाजेनंतरही अनेक मतदार रांगेत होते. मागच्या निवडणुकीत 63.53 टक्के मतदान झाले होते, ते पाहाता यंदा मतदानाची टक्केवारी वाढण्याची आशा होती. अबकी बार 70 टक्के पार चा नारा हि प्रशासनाने दिला होता. परंतु, मतदारयाद्यात घोळ झाल्याने ही टक्केवारी घसरली असल्याचे जाणकारांचे मत आहे.
मतदारयादीत मोठ्या प्रमाणात घोळ असल्याचे दिसून आले. 11 लाख 5 हजार 761 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. याच मतदारांनी आपला खासदार निवडला असून 4 जून रोजी नवीन खासदाराची घोषणा होणार आहे.
बुलढाणा लोकसभा मतदारसंघातील नऊ लाख 33 हजार 173 पुरुष मतदारांपैकी सहा लाख 3 हजार 525, तर आठ लाख 49 हजार 503 महिला मतदारांपैकी पाच लाख 2 हजार 226, तसेच इतर 24 मतदारांपैकी दहा मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. मतदारसंघातील 17 लाख 82 हजार 700 मतदारांपैकी अकरा लाख 5 हजार 761 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.
बुलढाणा विधानसभा मतदारसंघातील एक लाख 53 हजार 160 पुरुष मतदारांपैकी 86 हजार 164, तर एक लाख 40 हजार 326 महिला मतदारांपैकी 72 हजार 211 मतदारांनी हक्क बजावला. चिखली विधानसभा मतदारसंघातील एक लाख 51 हजार 9 पुरुष मतदारांपैकी 97 हजार 482, तर एक लाख 40 हजार 609 महिला मतदारांपैकी 83 हजार 947 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.
सिंदखेड राजा विधानसभा मतदारसंघातील एक लाख 64 हजार 629 पुरुष मतदारांपैकी 1 लाख 4 हजार 355, तर एक लाख 49 हजार 449 महिला मतदारांपैकी 88 हजार 293 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. मेहकर मतदारसंघातील एक लाख 56 हजार 713 पुरुष मतदारांपैकी 1 लाख 5 हजार 150, तर एक लाख 42 हजार 385 महिला मतदारांपैकी 88 हजार 794, तसेच 3 इतर मतदारांपैकी 2 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. खामगाव मतदारसंघातील एक लाख 52 हजार 968 पुरुष मतदारांपैकी 1 लाख 6 हजार 408, तर एक लाख 37 हजार 20 महिला मतदारांपैकी 85 हजार 763, तसेच 4 इतर मतदारांपैकी 1 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. जळगाव जामोद मधील एक लाख 54 हजार 694 पुरुष मतदारांपैकी 1 लाख 3 हजार 966, तर एक लाख 39 हजार 714 महिला मतदारांपैकी 83 हजार 218 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. विशेष म्हणजे10 तृतीयपंथीयांनी देखील मतदान केले.
Future alliance : ॲड. आंबेडकर असं का म्हणाले, काँग्रेसने आता वंचितला मदत करावी!
शेवटच्या एका तासात धोधो मतदान!
काल झालेल्या मतदानाच्या शेवटच्या एका तासात सुमारे पावणेदोन लाख मतदान झाले. सकाळी 7 ते संध्याकाळी 5 वाजे दरम्यान केवळ 53 टक्के मतदान झाले. मात्र शेवटच्या एका तासांत 1,74,512 मतदारांनी मतदान केले. अनेक ठिकाणी रात्री 8 पर्यंत मतदान प्रक्रिया चालली. यामुळे मतदानाची टक्केवारी 62.03 टक्के पर्यंत गेली.
बुलढाणा जिल्ह्यात तिरंगी लढत
बुलढाणा मतदारसंघात 1962 मतदार केंद्रांवर 17.82 लाख मतदार मतदानाचा हक्क बजावला. या मतदारसंघात ठाकरे गटाचे प्रा. नरेंद्र खेडेकर, शिंदे गटाचे प्रतापराव जाधव आणि अपक्ष रविकांत तुपकर यांच्यात तिरंगी लढत होत आहे. यामध्ये जिल्ह्यातील घाटावरील प्रत्येक भागात अपक्ष उमेदवार रविकांत तुपकरांचा जोर दिसून आला. मात्र,घाटाखाली महाविकास आघाडीचे प्रा. नरेंद्र खेडेकर यांचा जोर जास्त दिसून आल्याने जिल्ह्यात तिरंगी लढत पाहावयास मिळाली.