BJP News : मोबाईल हॅक झाल्याचा आरोप नंदुरबार मतदारसंघाच्या भाजप उमेदवार हिना गावित यांनी केला आहे. त्यांनी पोलिसांकडे तक्रार दिली आहे.
लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात राज्यातील 11 लोकसभा मतदारसंघात आज मतदान झाले. दरम्यान अनेक ठिकाणी वाद, आरोप प्रत्यारोप, गोंधळ पाहायला मिळाला. नंदुरबार मतदारसंघातही हाय व्होल्टेज ड्रामा पाहायला मिळत आहे. दरम्यान, काँग्रेसला पराभव दिसत असल्यामुळे अशा पद्धतीचा अपप्रचार केला जात असल्याचा आरोप डॉ. हिना गावित यांनी केला आहे. याबाबत गावित यांनी आपल्या अधिकृत फेसबुक पेजवर व्हिडिओ पोस्ट करत मतदारांना या घडल्या प्रकाराची माहिती दिली आहे. तसेच मतदारांनी दक्ष राहावे, अशा कुठल्याही कॉलवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन हिना गावित यांनी केले आहे.
भाजप काँग्रेसमध्ये लढाई
नंदुरबार लोकसभा मतदारसंघात काँग्रेसकडून केसी पाडवी यांचे चिरंजीव गोवाल पाडवी तर भाजपकडून डॉ. विजयकुमार गावित यांच्या जेष्ठ कन्या डॉ. हिना गावित रिंगणात आहेत. गेल्या दोन लोकसभा मतदारसंघात त्यांचा विजय झाला आहे. तर आता त्यांना भाजपने तिसऱ्यांदा संधी दिली आहे.
Ramesh Chennithala : नरेंद्र मोदींनाही 75 वर्षानंतर राजकारणातून निवृत्त करणार का?
आरोप प्रत्यारोप
दरम्यान,मतदानाच्या शेवटच्या टप्प्यात प्रक्रिया पार पडत असताना डॉ.गावित यांनी गंभीर आरोप केला आहे. काँग्रेसला पराभव दिसत असल्यामुळे अशा पद्धतीचा अपप्रचार केला जात असल्याचा आरोप डॉ. हिना गावित यांनी केला आहे. याबाबत हिना गावित यांनी फेसबुक पेज वर व्हिडिओ पोस्ट करत मतदारांना या घडल्या प्रकाराची माहिती दिली आहे.