महाराष्ट्र

Amol Mitkari : मनसे-मिटकरी वाद थांबता थांबेना!

MNS : आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी पुन्हा झडायला लागल्या

Political War : राज ठाकरे यांच्यावर केलेल्या टिकेनंतर मनसे कार्यकर्त्यांनी अकोल्यात आमदार अमोल मिटकरी यांच्या गाडीला लक्ष केले होते. त्यानंतर मनसे विरुद्ध आमदार अमोल मिटकरी या दोघांमधील संघर्ष काहीकाळ सुरू होता. गेल्या काही दिवसांमध्ये राजकारणात सुरू असलेला आमदार अमोल मिटकरी आणि मनसेच्या नेत्यांमधील वाद पुन्हा वाढत चालल्याचे दिसून येत आहे. आमदार अमोल मिटकरी यांची मनसैनिकांनी गाडी फोडली होती त्यानंतर देखील अमोल मिटकरींनी राज ठाकरेंवर टीका करणं सोडलं नसल्याचं दिसत आहे. आता मनसे प्रवक्ते योगेश चिले यांनी आज पत्रकार परिषद घेऊन आमदार अमोल मिटकरींवर हल्लाबोल केला आहे. तर दुसरीकडे आमदार अमोल मिटकरी यांनीही योगेश चिलेंसह मनसेवर आरोप केले आहेत.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर आमदार अमोल मिटकरींनी केलेल्या टिकेनंतर मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी आमदार अमोल मिटकरींची अकोल्यात गाडी फोडली. त्यानंतर या प्रकरणात आमदार मिटकरींनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी मनसेच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल केले. तर घटनेच्या दिवशी या प्रकरणातील आरोपी असलेले पदाधिकारी जय मालोकार यांचा मृत्यू झाला. त्यांनतर या प्रकरणात मनसे विरुद्ध आमदार मिटकरींमध्ये बरेच दिवस संघर्ष पाहायला मिळाला. अनेक आरोप प्रत्यारोप करण्यात आले. मात्र हे अद्यापही थांबत नसल्याचं समोर आलं आहे. दुसरीकडे आज मनसेचे प्रवक्ते योगेश चिले यांनी पत्रकार परिषद घेऊन आमदार अमोल मिटकरींवर गंभीर आरोप केले आहेत.

Gondia : विधानसभेसाठी इच्छुकांची भली मोठी यादी!

तरी सुद्धा आमदारकी दिली?

योगेश चिले म्हणाले, अमोल मिटकरी यांना कुठलीही माहिती नसताना राज ठाकरेंवर त्यांनी टीका केली आहे. आता अमोल मिटकरी यांना राज्यात घासलेट चोर म्हणून ओळखतील. मिटकरी यांच्या वडिलांचा रेशन दुकान होतं. मृत व्यक्तींचा किंवा बाहेर गावी गेलेल्या व्यक्तीच्या नावाने येणारे रेशन, दुकानातील घासलेट रॉकेल हे मिटकरी आणि त्यांचे वडील चोरायचे आणि अशा या घासलेट चोराला अजित पवार यांनी आमदार कसा केलं? अमोल मिटकरी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता तरी सुद्धा अशा चोराला आमदारकी दिली? असा सवाल देखील योगेश चिले यांनी उपस्थित केला आहे. तर दुसरीकडे आमदार अमोल मिटकरींनी चिले यांना प्रत्युत्तर दिले आहे.

मिटकरी नेमकं काय म्हणाले!

माझ्यावर हल्ला करणारे मुख्य आरोपी मनसेचे सरचिटणीस कर्णबाळा दूनबळे यांची पाठराखण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे करत असल्याचा घणाघाती आरोप मिटकरींनी केला आहे. चिले यांच्या टीकेला ‘हरामखोरी’ अशा शब्दात त्यांनी उत्तर दिले. चिले हे खंडणीखोर आणि माहितीच्या अधिकाराचा गैरवापर करून पैसे उकळत असल्याचा आरोप मिटकरींनी केला आहे. चीलेचे राज ठाकरे आणि अमित ठाकरे यांच्या नावावर खंडणी मागण्याचे अनेक ऑडिओ क्लिप्स आपल्याकडे आहेत. यानंतर चिले अधिक बोलल्यास ते आपण जाहीर करू असा इशारा यावेळी मिटकरींनी दिला आहे.

चिले यांची चौकशी लावणार

लवकरच चीलेंच्या संदर्भात पनवेल येथे जाऊन पोलीस अधिकारी आणि आयुक्तांना भेटून चिले यांची चौकशी लावणार असल्याचं मिटकरी म्हणाले. अकोला येथील जिल्हा उपनिबंधक प्रवीण लोखंडे यांना अँटी करप्शन विभागाने क्लीन चिट दिली आहे. या बाबत माहिती तपासून घेण्याचंही मिटकरी म्हणाले. नितेश राणे आणि जितेंद्र आव्हाड या दोघांचे ट्विट रात्री 8 नंतर आले, म्हणजे ‘रात्रीस खेळ चाले’ असा प्रकार असल्याचा टोला मिटकरींनी लगावला.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!