महाराष्ट्र

Raj Thackeray : मनसे प्रमुख अमरावतीला येणार, विदर्भातील उमेदवार जाहीर होणार?

Maharashtra Navnirman Sena : सर्व 11 जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांची बैठक

Engine Ready To Run : आगामी विधानसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना सज्ज झाली आहे. काही दिवसांपूर्वी मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने राज्याचा दौरा केला होता. ते विदर्भातील जिल्ह्यातही आले होते. आता राज ठाकरे हे अमरावती जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार आहेत. या दौऱ्यादरम्यान ते विदर्भातील पदाधिकाऱ्यांकडून आढावा बैठक घेणार आहेत. या दौऱ्यात पश्चिम विदर्भातील ज्या मतदारसंघात मनसे लढण्यास इच्छुक आहे, त्या मतदारसंघाचे उमेदवार जाहीर होण्याची शक्यता देखील आहे.

विधानसभेचे वारे

राज्यात विधानसभा निवडणुकीची सर्वच पक्षाकडून जोरदार सुरू आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाकडून अद्याप महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीची तारीख जाहीर झालेली नाही. मात्र येत्या काही काळातच तारीख घोषित होण्याची शक्यता आहे. दिवाळीनंतर विधानसभा निवडणूक होऊ शकते, असा अंदाज वर्तविला जात आहे.

अवघ्या महिला, दीड महिन्यावर आलेल्या निवडणुकीसाठी महाविकास आघाडी आणि महायुती दोन्हींमधील नेते मंडळी, कार्यकर्ते कंबर कसून तयारीला लागले आहेत. त्याशिवाय इतर पक्षांनीही जय्यत तयारी सुरू केली आहे. त्यात मनसेही मागे नाही.

प्रतीक्षा संपण्याची चिन्हं

लोकसभा निवडणुकीत महायुतीला बिनशर्त पाठिंबा देणाऱ्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही विधानसभा निवडणुकीवर लक्ष केंद्रित केले आहे. विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी विदर्भातील जिल्ह्यांचा दौरा केला होता. त्यांनी येथील पदाधिकारी आणि काही कार्यकर्त्यांसोबत बैठक घेत आगामी विधानसभा निवडणुकीचा आढावा घेतला. काही मतदारसंघातील उमेदवारांच नाव देखील त्यांनी जाहीर केले होते.

Sudhir Mungantiwar : चंद्रपुरातील बहिणींसाठी आणखी एक ‘गुडन्यूज’

विदर्भातील जिल्ह्यांवर लक्ष

आता पुन्हा एकदा राज ठाकरे यांनी विदर्भातील जिल्ह्यांवर लक्ष केंद्रित केले आहे. मनसे प्रमुख राज ठाकरे हे विदर्भातील महत्वाच्या समजल्या जाणाऱ्या अमरावती जिल्ह्यात येणार आहेत.  राज ठाकरे यांचे ‘मिशन विदर्भ’ फोकस राहणार आहे.27 सप्टेंबरला सकाळी साडेसात वाजता ठाकरे यांचं अमरावतीत रेल्वे स्थानकावर (Amravati Railway Station) आगमन. 27 सप्टेंबरला राज ठाकरे पश्चिम विदर्भातील अमरावती, बुलढाणा, अकोला, वाशिम, यवतमाळ या पाच जिल्ह्यांचा आढाव घेणार आहेत. 28 सप्टेंबरला नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर जिल्हाचा ठाकरे आढावा घेणार आहेत. आगामी विधानसभा निवडणुकीसाठीची विदर्भातील पहिली यादी राज ठाकरे जाहीर करू शकतात, असे सांगण्यात येत आहे.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!