MNS Vs NCPSP : शरद पवार यांना महाराष्ट्राचा मणिपूर करायचा आहे का? मणिपूरसारखी परिस्थिती निर्माण करण्यासाठी शरद पवार यांनी हातभार लावू नये, अशी प्रखर टीका टीका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली. शरद पवारांनी दंगली घडविण्याबाबत केलेल्या विधानावर ठाकरे यांनी त्यांचा चांगलाच समाचार घेतला. ठाकरे यांनी एका वाक्यात यावर रोखठोक उत्तर दले. पवार काय बोलले हे आपण ऐकलेले नाही. पण पवरांनी अशा प्रकारांना हातभार लावू नये, असे ठाकरे म्हणाले.
पुणे येथे (Pune) पूरग्रस्त भागांची पाहणी केल्यानंतर राज ठाकरे यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. मणिपूरमध्ये जे काही घडलं त्यानंतर ते राज्य अस्थिर झाले आहे. पंतप्रधानांना एकदाही तिकडे जावे असे वाटले नाही. मोदींना मणिपूरमधील नागरिकांना दिलासा द्यावासा वाटला नाही. मणिपूरमध्ये घडले तेच आजूबाजूच्या राज्यांमध्ये कर्नाटकातही घडले. आगामी काळात महाराष्ट्रातही असे काहीतरी घडेल अशी चिंता आता वाटू लागली आहे, असे पवार म्हणाले होते. पवारांच्या या वक्तव्यावर भाजपने प्रत्युत्तर दिले आहे. नागपूर येथे (Nagpur) येथे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी पवारांवर टीकाही केली. त्यानंतर राज ठाकरे यांनीही पवारांना सल्ला दिला आहे.
सरकारवरही आरोप
उपमुख्यमंत्री अजित पवार हे पुण्याचेच आहेत. त्यानंतरही अशी परिस्थिती निर्माण झाली. त्याबद्दल ठाकरे यांनी आश्चर्य व्यक्त केले. दोन उपमुख्यमंत्री असले तरी राज्याकडे कुणाचेच लक्ष नाही. केवळ अधिकाऱ्यांचे निलंबन करून प्रश्न सुटणार नाही. महानगरपाका, राज्य सरकारमधील काही अधिकारी आणि बिल्डर हे सर्व मिळून दिसली जमीन की विक असे करीत आहेत. पुण्याची आता पाच शहरे झाली आहेत. गेल्या काही वर्षांपासून स्थानिक स्वराज संस्थांमध्ये प्रशासक राज सुरू आहे. सरकारने निवडणूक घेतलेली नाही. या प्रकाराची जबाबदारी कोणीतरी घेतले पाहिजे, असे ठाकरे म्हणाले.
महानगरपालिकांमध्ये नगरसेवक नाहीत. अधिकाऱ्यांची मनमानी सुरू आहे. प्रशासकीय अधिकाऱ्यांशी बोलणार कोण, अशी परिस्थिती आहे. सध्या सुरू असलेला कारभार पाहता ही सर्व जबाबदारी प्रशासनाची आहे. परराज्यातून येणाऱ्या नागरिकांना मोफत घरकुल मिळत आहे. राज्यातील मराठी माणूस भीक मागत आहे. महाराष्ट्रावर कोणाचे लक्ष आहे की नाही? देशात प्रत्येक जण आपापल्या राज्याचा विचार करत आहे. महाराष्ट्राच्या विचार करणारे कोणी आहे का? असे देखील राज ठाकरे यांनी नमूद केले.
पुण्यातील सफाईची जबाबदारी महापालिकेची आहे. प्रशासनाला पनवेल, ठाण्यातून लोक बोलवावे लागत आहे. ते येऊन सफाई करीत आहेत. ही लाजिरवाणी गोष्ट असल्याचे राज ठाकरे म्हणाले. एवढ्या मोठ्या शहरात साफसफाईसाठी बाहेरच्या जिल्ह्यांमधून साफसफाई कर्मचारी बोलवावे लागतात. यावर देखील राज ठाकरे यांनी प्रश्नउपस्थित केला.