Maharashtra Legislative Council Elections : महाराष्ट्र विधान परिषद निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर काँग्रेस आणि ठाकरे गटाच्या वरिष्ठ नेत्यांची नाशिक शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसंदर्भात चर्चा झाली. यावेळी दोन्ही पक्षाच्या सहमतीतून संदीप गुळवे यांचा आज ठाकरे गटात पक्षप्रवेश झाला. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत आणि सुभाष देसाई यांच्या उपस्थितीत संदीप गुळवेंचा पक्षप्रवेश झाला असून त्यांना नाशिक शिक्षक मतदारसंघातून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. यानंतर संदीप गुळवे यांनी नाशिक शिक्षक मतदारसंघाची जागा जिंकून आणेल, असा विश्वास व्यक्त केला.
राज्यातील लोकसभा निवडणुका संपल्यानंतर आता महाराष्ट्र विधान परिषद निवडणुकांचे बिगुल वाजले आहे. विधान परिषदेच्या चार जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून सर्वप्रथम दोन उमेदवारांची घोषणा करण्यात आली होती. यानंतर आता काँग्रेसचे नेते संदीप गुळवे यांनी शिवसेनाभवन दादर येथे ठाकरे गटात प्रवेश केल्यानंतर त्यांना नाशिक शिक्षक मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे
संजय राऊत यांचा विश्वास
लोकसभेचे निकाल 4 जूनला लागतील. ही निवडणूक 26 तारखेला आहे. 7 जूनला फॉर्म भरायचे आहेत. त्यानंतर विधानसभेच्या निवडणुका येतील. म्हणजेच निवडणुकीचा हंगाम सुरु झालेला आहे. हा संपूर्ण निवडणुकीचा मोसम हा शिवसेनेचा आहे. प्रत्येक निवडणूक शिवसेना जिंकणार आहे. शिक्षकांच्या मतदारसंघातून संदीप गुळवे हे या राज्यातल्या शिक्षकांचं नेतृत्व करतील, यासाठी मी त्यांना शुभेच्छा देतो. मला खात्री आहे, ते जिंकून येतील, असा विश्वासही राऊतांनी व्यक्त केला.
Lok Sabha Election : मतदानादरम्यान रांगेत उभे असलेल्या वृद्धाचा मृत्यू !
अॅड. संदिप गुळवे यांचे शिक्षण बी.ए., एल.एल.बी. पर्यंत झालेले असून नाशिक जिल्हा परिषदेचे 2012 ते 2017 पर्यंत ते सदस्य होते. मराठा विद्या प्रसारक मंडळाचे ते संचालक आहेत. नाशिक जिल्हा सहकारी बँकेचे संचालक म्हणून त्यांनी कामगिरी बजावली आहे.