Maharashtra Assembly Elections : भाजपच्या कार्यकर्त्याने कुणबी समाजाबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केले. त्यानंतर एका न्यूज पोर्टलवर ही बातमी प्रकाशित झाली. त्याचे पडसाद उमटायला लागले. पण भाजप नेत्यांनी वेळीच सतर्क होत या सर्व घटनाक्रमावर पडदा टाकला. भाजप नेते आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांनी सहकारी पदाधिकाऱ्यांसह पत्रकार परिषद घेऊन घटनाक्रमाची सत्यता उलगडली.
भाजप नेते, वणीचे विद्यमान आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार ‘द लोकहित’शी बोलताना म्हणाले की, एका पोर्टलवर जी बातमी प्रकाशित झाली, त्याचा तसा अर्थाअर्थी भाजप कार्यालयाशी संबंध नाही. कार्यालयाच्या बाहेर चार कार्यकर्त्यांची चर्चा सुरू होती. त्यातूनच थोडासा वाद झाला. विषय कुणबी समाजाशी संबंधीत होता. वाद थोडासा वाढल्यावर आमच्या जिल्हाध्यक्षांनी ‘ते’ वक्तव्य करणाऱ्याला विचारणा केली. थोड्या चर्चेनंतर सर्व विषय तेथे संपला होता. पण त्यानंतर एका न्यूज पोर्टलने खोडसाळपणाचे वृत्त प्रकाशित केले. त्यामुळे विषय वाढत गेला. पण आमचा भाजप पक्ष शिस्तीसाठी ओळखला जातो. आम्ही सर्व पदाधिकाऱ्यांनी मिळून विषय निकाली काढला. पत्रकार परिषदेत तशी घोषणाही केली. पण समाजात तेढ निर्माण करणाऱ्या न्यूज पोर्टलच्या विरोधात मानहानीचा दावा निश्चितपणे दाखल करणार आहे.
चर्चेदरम्यान झाला होता वाद
‘त्या’ न्यू पोर्टलवर प्रकाशित झालेले वृत्त खोडसाळपणाने दिले गेले होते, असे माजी नगराध्यक्ष तारेंद्र बोर्डे यांनी स्पष्ट केले. त्या वृत्तात म्हटल्या गेल्यानुसार त्या ठिकाणी काही घडलेच नाही. कार्यकर्त्यांमधील ती चर्चा होती आणि चर्चेदरम्यान त्या दोघांमध्ये किरकोळ वाद झाला होता. त्याचीच बातमी बनवून वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न करण्यात आला पण. भारतीय जनता पक्ष हा शिस्तबद्ध पक्ष आहे. विरोधकांनी कितीही प्रयत्न केले तरी आमच्या पक्षात आणि समाजात कुणीही तेढ निर्माण करू शकणार नाही, असेही बोर्डे यांनी ‘द लोकहित’शी बोलताना स्पष्ट केले.
निवडणुकीच्या वातावरणात समाजबांधवांमध्ये भांडणं लावण्याचे विरोधकांचे प्रयत्न आहे. पण आमचे कार्यकर्ते पक्षशिस्तीचा भंग करणार नाहीत, असेही बोर्डे यांनी नमूद केले. आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांनी काल सायंकाळच्या पत्रकार परिषदेला संबोधित केले. यावेळी भाजपनेते दिनकर पावडे, संजय पिंपळशेंडे, गजानन विधाते. रवि बेलुरकर, संतोष डंभारे यांच्यासह कुणबी समाजाचे पदाधिकारी होते.
Assembly Elections : विदर्भवाद्यांना निवडणूकीच्या तोंडावर जाग
आमदार बोदकुरवार म्हणाले की, 4 नोव्हेंबर रोजी सायंकाळी दोन कार्यकर्त्यांमध्ये क्षुल्लक गोष्टींवरून वाद झाला. हा वाद वैयक्तिक होता. ही घटना भाजप कार्यालयात घडल्याने त्याला राजकीय स्वरूप देण्याचा प्रयत्न करण्यात आला. वाद वाढत असल्याचे बघून तारेंद्र बोर्डे यांनी मध्यस्थी केली आणि त्यानंतर वाद संपुष्टात आला. सर्व काही ठीक झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी एका न्यूज पोर्टलवर कुणबी समाजाविषयी आक्षेपार्ह मजकूर प्रकाशित झाला. त्यामुळे समाजबांधवांच्या भावना दुखावल्या गेल्या.
सदर पोर्टलवर दिलेले वृत्त खोडसाळ प्रवृत्तीतून देण्यात आल्याचे आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार म्हणाले. वृत्त प्रकाशित करणाऱ्या न्यूज पोर्टलवर मानहानीचा गुन्हा दाखल करणार आहो, असेही बोदकुरवार यांनी सांगितले. आमच्या पक्षात सर्वसमावेशक लोक आहेत. कुणबी समाजासह सर्वच समाजांचे लोक एकत्र मिळून काम करतात. ही एकजुटच पक्षाची ताकद आहे. त्यामुळे विरोधकांना पोटशूळ उठला आणि हे कारस्थान घडवून आणल्याचा आरोप आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांनी केला.