महाराष्ट्र

Gondia : आमगाव-सालेकसाला भक्कम निधी द्या!

Devendra Fadnavis : आमदार संजय पुराम यांचा मुख्यमंत्र्यांकडे आग्रह

MLA Sanjay Puram : आमगाव आणि सालेकसा तालुक्यांतील नागरी सुविधांच्या विकासासाठी नगरोत्थान कार्यक्रमांतर्गत पाणीपुरवठा योजना मंजूर करून तत्काळ कार्यान्वित करण्याची मागणी आमदार संजय पुराम यांनी केली आहे. या भागातील नागरीकांना पिण्याच्या पाण्याच्या सुविधेसाठी मोठ्या समस्यांना सामोरे जावे लागत असून, या समस्या सोडवण्यासाठी आमदार संजय पुराम यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि नगर विकास विभागाचे प्रधान सचिव डॉ. गोविंदराज यांच्याशी चर्चा करून निवेदन सादर केले.

आमगाव व सालेकसा तालुक्यातील अनेक गावांमध्ये पिण्याच्या पाण्याचा तुटवडा जाणवत आहे. नगरोत्थान कार्यक्रमांतर्गत पाणीपुरवठा योजना मंजूर करून त्वरित निधी उपलब्ध केल्यास नागरिकांना मोठा दिलासा मिळेल, असे आमदार संजय पुराम यांनी नमूद केले. “पाणी ही मूलभूत गरज असून, त्याचा पुरवठा ही सरकारची प्राथमिक जबाबदारी आहे. या योजनेसाठी तातडीने निधी मंजूर व्हावा,” अशी आग्रही मागणी त्यांनी निवेदनाद्वारे केली.

निधी

वैशिष्ट्यपूर्ण व नागरी सेवा आणि सुविधा योजनेअंतर्गत मंजूर करण्यात आलेल्या कामांसाठीही तातडीने निधी वितरित करण्याची मागणी आ. संजय पुराम यांनी केली. या योजनांमुळे परिसरातील नागरी विकासाला चालना मिळेल. “मंजूर कामांना निधी न मिळाल्यास योजना रखडण्याचा धोका आहे. यामुळे नागरिकांमध्ये नाराजी निर्माण होऊ शकते,” असे त्यांनी आपल्या निवेदनात स्पष्ट केले.देवरी नगरपंचायतसाठी 10 कोटींचा निधी हवा

देवरी नगरपंचायतच्या नव्या इमारत बांधकामासाठी 10 कोटी रुपये मंजूर करण्यात यावेत, अशीही मागणी आमदार संजय पुराम यांनी केली. ही इमारत नागरी प्रशासनासाठी एक महत्त्वाचा प्रकल्प ठरणार असून, नागरिकांना उत्तम सेवा देण्यासाठी ती उपयुक्त ठरेल. देवरीसारख्या तालुक्याच्या मुख्यालयासाठी अद्ययावत नागरी सुविधा असलेल्या इमारतीची आवश्यकता आहे, असे त्यांनी सांगितले.

मुख्यमंत्री आणि प्रधान सचिवांसोबत चर्चा

आमदार संजय पुराम यांनी या सर्व मागण्यांसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि नगर विकास विभागाचे प्रधान सचिव डॉ. गोविंदराज यांच्याशी सविस्तर चर्चा केली. यावेळी त्यांनी आपल्या मतदारसंघातील नागरीकांच्या समस्या आणि अपेक्षा स्पष्टपणे मांडल्या. “आमगाव-सालेकसा मतदारसंघ हा मागास भाग असून, येथील नागरी विकासासाठी तातडीने पावले उचलणे आवश्यक आहे,” असे त्यांनी सांगितले.आमदार संजय पुराम यांनी केलेल्या या मागण्या त्यांच्या मतदारसंघातील नागरीकांच्या दैनंदिन समस्यांशी संबंधित आहेत. त्यांच्या या प्रामाणिक प्रयत्नांमुळे आमगाव-सालेकसा आणि देवरी येथील नागरीकांना विकासाच्या दृष्टीने दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे

Bhandara : राज्यात बोगस औषधांचा पुरवठा

मूलभूत सुविधा

आमदार संजय पुराम यांनी आमगाव व सालेकसा तालुक्यातील नागरीकांच्या मूलभूत सुविधांसाठी उचललेली पावले ही कौतुकास्पद आहेत. पाणीपुरवठा योजना, नागरी सुविधा योजनेसाठी निधी, आणि देवरी नगरपंचायतीसाठी नव्या इमारतीसाठी मागणी यामुळे या भागातील नागरी विकासाला चालना मिळेल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे. यामुळे सरकारच्या आगामी निर्णयाकडे संपूर्ण मतदारसंघाचे लक्ष लागले आहे.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!