महाराष्ट्र

Buldhana : लाडक्या बहीणीने दाखवले मुख्यमंत्र्यांना काळे झेंडे!

Eknath shinde : कार्यक्रमात बॅनरबाजी; आमदार गायकवाड यांच्यावर आरोप

Shiv Sena : वाघाची शिकार करून त्याचा दात गळ्यात बांधला आहे, असे वक्तव्य करून शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड अडचणीत सापडले. आता एकापाठोपाठ एक संकटं त्यांच्या पुढ्यात उभी ठाकली आहेत. शेतजमीन हडपून जीवे मारण्याचा प्रयत्न करण्याच्या आरोपाखाली गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. त्यांच्यासह मृत्युंजय गायकवाड आणि आणखी एकाचाही यात समावेश आहे. दरम्यान गुरुवारी जमीन हडपल्याचा आरोप करीत संतप्त महिलेने गुरुवारी बुलढाण्यात मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमात निषेधाचे बॅनर झळकावले. मुख्यमंत्र्यांना काळे झेंडे दाखवले. गायकवाडांनी बळकावलेली महिलेची जमीन परत करण्याची मागणी करण्यात आली आहे.

जमीन हडपण्याचा आरोप

रीटा उपाध्ये असे या महिलेचे नाव आहे. या महिलेची मोताळा शिवारात गट नंबर 62 मध्ये दीड एकर जमीन आहे. ही जमीन गायकवाड यांनी बळकावली असल्याचा आरोप महिलेने केला आहे. या प्रकरणी महिलेने सर्व पुरावे न्यायालयात सादर केले. न्यायालयाने आमदार गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल देण्याचे आदेश दिले. याबाबत पोलिसांकडून 28 फेब्रुवारीला गुन्हा दाखल करण्यात आला होता. आज पीडित महिलेने न्याय मागण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या लाडकी बहीण कार्यक्रमानंतर निषेधाचे बॅनर झळकावले. काळे झेंडे दाखवले. नेते जर असा अन्याय अत्याचार करत असतील तर महिलांचे काय होणार, असा प्रश्न उपस्थित केला. त्यामुळे कार्यक्रमात एकच खळबळ उडाली.

Shiv Sena : मुख्यमंत्री म्हणाले, ‘काँग्रेसचे खायचे दात वेगळे’

गुन्हे दाखल करा..

बुलडाणा आमदार गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. परंतु, बोराखेडी पोलिसांनी अजूनही गुन्हा दाखल केला नसल्याची प्रतिक्रिया पीडित महिलेने पत्रकारांना दिली. याबाबत पोलिसांनी 28 फेब्रुवारीला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान या पीडित महिलेने आज न्याय मागण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या बुलडाणा येथील लाडकी बहीण कार्यक्रमानंतर बॅनर झळकवले. काळे झेंडे दाखवून ‘आपल्याच पक्षाचे नेते जर असा अन्याय अत्याचार करत असेल तर महिलांचे काय होणार?’ असा प्रश्न त्यांनी मुख्यमंत्र्यांसमोर ठेवला आहे.

अतिक्रमण केलेले नाही – गायकवाड

गेल्या 4 वर्षांपासून सदर प्रकरण जिल्ह्यात गाजत आहे. यावर आमदार संजय गायकवाड यांनी यापूर्वीही प्रतिक्रिया नोंदविली होती. त्यांच्यानुसार आपण कुठल्याही जागेवर अतिक्रमण केलेले नाही. महिलेने आपल्यावर केलेले सर्व आरोप धादांत खोटे असल्याचे त्यांनी म्हटले आहे. असे असले तरी आता न्यायालयाने या प्रकरणात गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिल्याने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली होती.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!