महाराष्ट्र

Ravindra Dhangekar : धंगेकरांचा पुणे पोलिसांवर घणाघात

Pune Porsche Car Accident पोलिसांचा फोटो ट्विट फडणवीसांवर निशाणा 

Congress Attack : पुण्यात मागील चार दिवसापूर्वी झालेल्या कल्याणी नगरमधील अपघात प्रकरणाची देशभरात चर्चा सुरू आहे. या प्रकरणात आता पुणे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी आपली भूमिका मांडली. पोलिस आयुक्तांची पत्रकार परिषद संपताच काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना टॅग करत ट्विट केले आहे.आता ट्विटवरून सर्वत्र खळबळ उडाली आहे.धंगेकर यांनी पुण्यातील पबमधील पोलिस कॉन्स्टेबल यांचे फोटो सोशल मीडियावर ट्विट केले आहेत.

ट्विटवर फोटो अपलोड..

सोबत एक फोटो जोडत आहे ज्यात हे वसुली कॉन्स्टेबल वॉटर्स नावाच्या पबमध्ये पार्टी करताना दिसून येत आहेत. आम्हा पुणेकरांच्या वतीने आपणांस विनंती आहे की,पुणे बिघडविणाऱ्या या पोलिस कॉन्स्टेबलची तातडीने चौकशी करत यांना निलंबित करा. अन्यथा 48 तासात यांचे इतर व्हिडिओ देखील असेच ट्विट करण्यात येतील. पुन्हा भेटुयात नव्या पोलिस स्टेशनचा ग्राउंड रिपोर्ट घेऊन. जय हिंद ,जय पुणेकर..!”, अशी पोस्ट रवींद्र धंगेकर यांनी केली आहे.

Nana Patole : खोके सरकारला गरिबांच्या जीवाचे मोल नाही!

पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांच्यावर निशाणा

आमदार रवींद्र धंगेकर यांनी केलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मी एक गोष्ट लक्षात आणून देऊ इच्छितो. कल्याणीनगर अपघातानंतर तपासात अक्षम्य चुका झाल्या आहेत. त्यानंतर पुणे शहराचे पोलिस कमिश्नर अमितेश कुमार यांना अजूनही कोणी दोषी आहेत असे वाटत नाही. अर्थात जो स्वतःच बिल्डरच्या पाकिटावर काम करतोय तो कसा कुणावर कारवाई करणार? आजपासून मी तुम्हाला दररोज एका पोलिस स्टेशनवर सुरू असलेल्या गैर-कारभाराची कथा पाठवणार आहे.

आंदोलनाचा इशारा..

तपास अधिकाऱ्यावर पहिला गुन्हा दाखल केला पाहिजे. जोपर्यंत गुन्हा दाखल होणार नाही, तोपर्यंत मी पुण्यात ठिकठिकाणी जाऊन रोज आंदोलन करणार आहे. अपघाताच्या एका रात्रीत कोट्यवधींची उलाढाल झाली, असा आरोप रवींद्र धंगेकर यांनी केला.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!