महाराष्ट्र

Assembly Session : आघाडीच्या आमदारांनी घेतली नाही शपथ 

Mahavikas Aghadi : ईव्हीएमला विरोध करण्यासाठी आंदोलन 

Vidhan Sabha : ईव्हीएमला विरोध करण्यासाठी महाविकास आघाडीच्या आमदारांनी शपथविधी प्रक्रियेवर बहिष्कार टाकला आहे.  विधिमंडळाच्या विशेष अधिवेशनाला शनिवारपासून (7 डिसेंबर) सुरुवात झाली. विधानसभेचे हंगामी अध्यक्ष कालिदास कोळंबकर यांनी प्रक्रियेला सुरुवात केली. मात्र विधानसभेमध्ये महाविकास आघाडीचे आमदारांनी शपथच घेतली नाही. नियमानुसार जोपर्यंत विधानसभेमध्ये शपथ घेतली जात नाही, तोपर्यंत उमेदवाराला अधिकृत आमदार गृहीत धरले जात नाही. त्यामुळे शपथ न येणाऱ्या उमेदवारांचे काय होणार? असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. 

विधानसभेच्या निवडणुकीमध्ये महायुतीला अपेक्षेपेक्षा अधिक बहुमत मिळाली आहे. ही निवडणूक एकतर्फीच झाली आहे. त्यामुळे महाविकास आघाडीने ईव्हीएमच्या वापराबद्दल संशय व्यक्त केला आहे. राहुल गांधी यांच्यासह महाविकास आघाडीचे सगळेच नेते ईव्हीएमच्या विरोधात आंदोलन करीत आहेत. शनिवारी विधिमंडळाच्या विशेष अधिवेशनाला सुरुवात झाली त्यावेळी देखील हे आंदोलन बघायला मिळाले.

विरोध कायम राहणार

हे सरकार मतं चोरून आले आहे. सरकारने भूमिका घेतली पाहिजे, मॉक पोलींग होऊ द्यायाला पाहिजे होतं. मारकडवाडीमधील लोकांचं मत, जनभावना समजून घेतली पाहिजे होती, असं यावेळी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणालेत. मारकडवाडीत काही लोकांना काल रात्री अटक करण्यात आली आहे. आम्ही जिंकलो असलो तरी आज शपथ घेणार नाही. या निकालावर महाराष्ट्राचा विश्वास बसत नाही. गावाने एखादा निर्णय घेतला तर लोकाशाही पध्दतीने आलेले सरकार वरवंटा पसरवण्याचे काम करत आहे. तर हे सरकार लोकशाही पद्धतीने आले नाही, असं म्हणत जितेंद्र आव्हाड यांनी निवडणूक प्रक्रियेवर संशय व्यक्त केला आहे.

Nana Patole : ‘ना खाऊंगा, ना खाने दुंगा’, हा मंत्र मोदींच्या लोकांसाठी नाही

विधानसभेच्या या निवडणुतीत सत्तास्थापनेचा दावा करणाऱ्या महाविकास आघाडीला पराभवाला समोरं जावं लागलं. यंदाच्या या निवडणुकीत दिग्गज नेत्यांचा पराभव झाला. त्यानंतर महाविकास आघाडीकडून ईव्हीएमवर संशय व्यक्त करण्यात आला. महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून विधिमंडळ परिसरात आंदोलन करण्यात आलं. यापूर्वी महाविकास आघाडीच्या नेत्यांची बैठक विधान भवन परिसरात झाली. या बैठकीला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विजय वडेट्टीवार, जितेंद्र आव्हाड, शिवसेनेचे आदित्य ठाकरे, जितेंद्र आव्हाड आदी उपस्थित होते.

या बैठकीनंतर महाविकास आघाडीचे नेते विधान भवन परिसरात एकत्र आलेत. त्यांनी ईव्हीएमला विरोध व्यक्त केला. सामान्य नागरिकांची मतं चोरी करण्यात आली आहेत. त्यामुळे आम्ही शपथ न घेण्याचा निर्णय घेतला आहे. यासंदर्भात वरिष्ठांशी चर्चा केल्यानंतर निर्णय घेऊ, असे यावेळी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी जाहीर केले. त्यामुळे ईव्हीएमचा लढा आता विधान भवनातही आता पोहोचला आहे.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!