प्रशासन

Kishore Jorgewar : शहराच्या स्वच्छतेसाठी आमदार सरसावले

Chandrapur Municipal Corporation : अधिकाऱ्यांसोबत बैठक घेत दिल्या सूचना

Clean City : चंद्रपूर शहराच्या स्वच्छतेसाठी आमदार किशोर जोरगेवार सरसावले आहेत. चंद्रपूर महापालिकेच्या अधिकाऱ्यांसोबत त्यांनी मॅराथॉन बैठक घेत शहरातील सफाईबाबत सूचना दिल्या. सफाई कामगारांना हक्काचे घर मिळावे यासाठी प्रयत्न करणार आहे. कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित प्रश्नांबाबतही कायमस्वरूपी तोडगा काढण्यावर भर असल्याचे चंद्रपूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार जोरगेवार यांनी सांगितले. महापालिका आयुक्तांच्या कार्यालयात ही बैठक पार पडली.

महानगरपालिका आयुक्त विपिन पालिवाल, अतिरिक्त आयुक्त चंदन पाटील, अखिल भारतीय सफाई मजदूर काँगेस संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष गोविंद परमार, विक्की बढेल, धनश्याम डकाह, जितु मस्ते आदी यावेळी उपस्थित होते. सफाई कर्मचाऱ्यांसाठी राज्य सरकारकडून राबविण्यात येत असलेल्या श्रमसाफल्य योजनेवरही चर्चा करण्यात आली. योजनेची अंमलबजावणी तातडीने करावी अशी सूचना देण्यात आली. , महानगरपालिका पातळीवर असलेल्या वाल्मिकी सुदर्शन समाजाच्या समस्याही जोरगेवार यांनी जाणून घेतल्या.

नियोजनावर भर

आमदार जोरगेवार यांनी योजनेच्या अंमलबजावणीसाठी नियोजन करण्याबाबत त्यांनी आयुक्तांशी संवाद साधला. सफाई कामगारांना या योजनेअंतर्गत हक्काची घरे मिळणार आहेत. त्यासाठी ठोस पावले उचलण्याची गरज आहे. राज्यातील महानगरपालिका किंवा नगर पालिका सफाई कामगारांना विशिष्ट स्वरूपाचे काम करावे लागते. हे काम विचारात घेऊन 25 वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त सेवा झालेल्यांना काही लाभ दिले जातात. सेवानिवृत्तीच्या वेळी किंवा सेवेत असताना मृत्यू झाल्यास वारसांना महापालिकेकडून मोफत सदनिका दिली जाते. त्याची मालकी कर्मचाऱ्याच्या कुटुंबाकडे असते. या सदनिकांचे बांधकाम सरकारकडून स्वतंत्रपणे करण्यात येते. ही योजना सफाई कामगारांसाठी महत्त्वाची आहे. त्याची अंमलबजावणी तातडीने करण्याची गरज असल्याचे आमदार जोरगेवार म्हणाले.

Nagpur : गडकरी, फडणवीसांच्या बैठकीत काँग्रेस नेते!

समस्या कडे लक्ष

कामगारांच्या नोंदणी प्रक्रियेला गती देणयाची गरज आहे. पात्र लाभार्थ्यांच्या समस्या तातडीने सोडविल्या जाव्या. योजनांबाबत सफाई कामगारांमध्ये जनजागृती करण्यात यावी, असे निर्देश या बैठकीत त्यांनी प्रशासनाला दिलेत. सरकारकडून सफाई कामगारांसाठी राबविण्यात येत असलेल्या योजनेबाबत प्रचार-प्रसार गरजेचा आहे. सफाई कामगारांच्या समस्या सोडविण्यासोबतच चंद्रपूर शहरातील स्वच्छतेकडे गंभीरतेने लक्ष देण्याची गरज असल्याचेही जोरगेवार म्हणाले. सण, उत्सवांना सुरुवात झाली आहे. अशात शहरात कचरा साचणार नाही याची दक्षता घेणे गरजेचे आहे. पावासाळ्याच्या दिवसात ड्रेनेजही तुंबते. त्यामुळे पावसाचे पाणी नागरी वस्त्यांमध्ये शिरण्याचा धोका असतो. याकडेही लक्ष देण्याची सूचना जोरगेवार यांनी महापालिकेच्या अधिकाऱ्यांना केली आहे.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!