महाराष्ट्र

Devendra Bhuyar : टिंगलटवाळी करणे भोवले

Comment On Women : आमदाराचे वादग्रस्त विधानावरून आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी

या लेखातील मते लेखकाची आहेत. या द मतांशी लोकहित सहमत असेलच असे नाही.

Question Of Respect : काही माणसे बाष्कळ बडबड करतात. आपण काय बोलत आहोत, याचे भान ते राखत नाहीत. काळ वेळ न बघता टिंगलटवाळी करणे हा एकच छंदच बहुदा त्यांनी जोपासलेला असतो. चांगले बोलणे त्यांना जमत आणि रूचतही नाही. अकारण गमज्या करण्याचा नादही ते जोपासतात. त्यांच्या गमतीच्या बोलण्याने बरेचदा अनेकजण दुखावले जातात. आपल्या विखारी बोलण्याची त्यांना कधी खंतही वाटत नाही. आपला मूळ स्वभाव ते सोडत नाहीत. राजकारणात असे बोलणाऱ्यांची संख्या बरीच आहे. मोर्शी मतदारसंघाचे आमदार देवेंद्र भुयार यांचे महिला विषयींचे वादग्रस्त विधान सध्या चर्चेत आहे. त्यावर अनेकांनी आपल्या तिखट प्रतिक्रिया नोंदविल्या आहेत.

जिभेला हाड नसते असे नेहमी बोलले जाते. जीभ मधुर, सत्य, शुभ, हितकर, समोरच्याला आनंद देईल असे बोलू शकते. तुमच्या आदेशाची तालीम ती करते. काही जणांची जीभ इतरांवर टीका करण्यासाठी आसुसलेली असते. शब्दांचे विखारी आणि विषारी बोल बोलण्याने मिळणारे आसुरी समाधान मिळविण्यात ती समाधान मानते. ‘उचलली जीभ लावली टाळ्याला’ असा हा स्वैराचारी प्रकार असतो. अशा चुकीच्या बेबंद बोलण्याने मोठे अनर्थ घडले आहेत. वादविवाद, भांडणे, हाणामारी या सारखे प्रकार अशा खुन्नस पूर्ण बोलण्यातून उद्भवतात.

प्रतवारी आणि गुणवत्ता

दैनंदिन उपयोगात येणाऱ्या वस्तू , धान्य पीकं, खाद्यपदार्थ या संदर्भात सहसा प्रतवारी, गुणवत्ता या सारखे शब्दप्रयोग वापरले जातात. भारत, जपान निर्मित वस्तू दर्जेदार तर चीननिर्मित वस्तू टुकार किंवा दर्जाहीन मानली जाते. कापसामध्ये सुपर ग्रेड, एफएक्यू, हे प्रकार गुणवत्तेच्या दृष्टीने वरचढ समजले जातात. निम्न दर्जाच्या कापसाला फरदड म्हणतात. सोयाबीनची गुणवत्ता ओलाव्यानुसार ठरविली जाते. आता या प्रतवारी सारखी तुलना आमदार महोदयांनी चक्क मुलींसोबत केली आहे.

महिलांच्या सौंदर्यानुसार त्यांचे तीन प्रकारचे स्तर ठरवून कोणत्या स्तरातील मुलांना कोणती मुलगी मिळू शकते असे आपल्या शैलीत त्यांनी सांगितले आहे. आपल्या बोलण्याचा ‘आवळ्याचा भोपळा’ झाला आहे हे त्यांना समजले. आता त्यांनी आपल्या बोलण्यामागचे स्पष्टीकरण दिले आहे. चांगल्या देखण्या मुली नोकरदार मुलांना मिळतात. दुसऱ्या श्रेणीतील मुली किराणा दुकानदार, पानटपरी चालकांना मिळतात. छोटेमोठे उद्योग करणाऱ्यांना मिळतात. तिसऱ्या श्रेणीतील उरल्यासुरल्या मुली शेतकऱ्यांच्या मुलांना मिळतात, असे वक्तव्य या आमदार देवेंद्र भुयार यांनी केले.

Korapna Sexual Assault : कोरपना अत्याचार प्रकरणातील एकूण एक आरोपी शोधून काढा 

द्यावे लागले स्पष्टीकरण

मध्य प्रदेशातील एका शेतकरी मेळाव्यात दोन ते तीन वर्षांपूर्वी शेतकऱ्यांच्या मुलामुलींच्या परिस्थितीवर आपण बोललो होतो. शेतकऱ्यांच्या मुलाचे लग्न होत नसल्याने शेतकरी त्रस्त आहेत हीच विदारक स्थिती मी थोड्याशा हलक्या फुलक्या शब्दात मांडली. महिलांचा अपमान करण्याचा कोणताही हेतू नव्हता. मात्र निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम जुना अर्धवट व्हिडीओ काढून विरोधकांकडून राजकारण केल्या जात आहे, असे आता भुयार म्हणत आहेत.

राज्यातील महायुती (Mahayuti) सरकार महिलांविषयी आदर दर्शवित चांगल्या योजना राबवित आहे. लाडकी बहिण योजना यशस्वी ठरली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde), उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार लाडक्या बहिणींचे लाडके भाऊ झाले आहेत. अशा स्थितीत अजित दादा गटाच्या समर्थक आमदाराने केलेले वक्तव्य वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे. महिलांचा अनादर करणाऱ्या त्यांच्या या विधानावर अनेक जण नाराजी व्यक्त करीत आहेत. शेतकरी आणि महिलांची टिंगल करणे हा तुमचा अजेंडा आहे काय? असा प्रश्न शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या प्रवक्त्या सुषमा अंधारे यांनी यावर केला आहे. देवेंद्र भुयार शरद पवार गटात असते तर त्यांनी असे विधान केले असते का? असा प्रश्नही त्यांनी विचारला आहे.

कंट्रोल गरजेचा

अजित पवार आणि सत्ताधाऱ्यांनी त्यांच्या आमदारांना कंट्रोलमध्ये ठेवले पाहिजे. अशा प्रकारचे महिलांचे वर्गीकरण कोणी खपवून घेणार नाही. समाज धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही, असे खडे बोल माजी मंत्री आणि काँग्रेसच्या (Congress) नेत्या आमदार यशोमती ठाकूर यांनी भुयार यांना सुनावले आहेत. महिलांच्या मतासाठी तुम्ही जिवाचं रान करत आहात व दुसरीकडे महिलांचे वर्गीकरण करून त्यांचा अपमान करत आहात त्यामुळे तुमची मानसिकता काय हे समजून येत आहे. महिला उपभोगाचे साधन आहेत का अशी टीका यशोमती ठाकूर यांनी केली आहे.

Amol Mitkari : आमदार भुयार यांचा यूटर्न; मिटकरींनीही दिली साथ!

आमदार देवेंद्र भुयार यांनी केलेल्या वक्तव्याचा भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनीही निषेध केला. स्त्रीच्या रूपापेक्षा तिच्यात असलेली शक्ती ओळखायला हवी. तुमची भाषा कुठल्याही सभ्य समाजाला शोभणारी नाही. अशा पद्धतीची वक्तव्ये टाळली पाहिजेत, ज्यामुळे महायुतीची बदनामी होईल, असे वाघ म्हणाल्या.

मिटकरींना वाटते स्टाइल

आमदार देवेंद्र भुयार काहीही वादग्रस्त बोलले नाहीत. शेतकऱ्यांच्या मुलांची अवस्था बिकट आहे. भुयार यांनी ही वस्तुस्थिती त्यांच्या स्टाइल मध्ये मांडली, असे मत राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी यांनी नोंदविले आहे. सध्या राजकारणात चुकीच्या पद्धतीने बोलण्याची सवय रुढ होत आहे. बोलताना कुणी फारसा विचार करत नाही. त्यामुळे वाचाळविरांची एक नवी संस्कृतीच तयार होत आहे. चुकीच्या शब्दाने वाद निर्माण होतो. गैरसमज वाढतात. मने दुखावली जातात. महिला असो की पुरुष कोणतेही विधान करताना ते विचारपूर्वक केले पाहिजे. सावधतेने तसेच संयम राखूनच विधान केले पाहिजे.

महिलांविषयी बोलताना तर विशेष काळजी घेणे आवश्यक असते. आपण काहीही बोललो तरी आपल्याला जाब विचारला जाणार नाही, असे काहींना वाटते. काही आमदार तर चहापेक्षा केटली जड असे असतात. चाटुगिरीच्या नादात ते काहीही बोलून जातात. टीव्हीवर सतत दिसलो पाहिजे म्हणून ते नसलेले अधिकारही हातात घेतात. अतिआत्मविश्वासातून अशी वादंग माजविणारी वक्तव्ये केली जातात. हे सुसंस्कृत आणि सुशिक्षित माणसाचे लक्षण अजिबात नाही.

सुशिक्षित, सुसभ्य आणि सुसंस्कृत माणूस कधीच वाह्यात बोलत नाही. ज्याच्यावर चांगले संस्कार असतात ते तर बोलताना खुपच तारतम्य बाळगतात. राजकारणतील लंब्या रेसचे घोडे तर अगदी मोजके आणि सुयोग्य पद्धतीची वक्तव्य करतात. ज्यांनी आयुष्यात कधीच काही पाहिलेले नसते आणि ज्यांना आयते मिळते, असेच लोक नुसते गडगडणाऱ्या ढगांप्रमाणे असतात जे कधीच बरसत नाही. उथळ पाण्याला खळखळाट फार असतो. त्यामुळे स्वल्पाक्षर मधुर सत्य बोलावे, ज्या योगे श्रोत्यांचे चित्त आणि शीरही डोलावे. हे सुभाषित राजकारण्यांनी लक्षात ठेवावे, म्हणजे बोलण्यातून वाद निर्माण होणार नाहीत.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!