महाराष्ट्र

Shiv Sena : पोलीसांवर अविश्वास, आरोपीबद्दल आपुलकी

Badlapur Cases : खासदार नरेश म्हस्के यांची विरोधकांवर सडकून टीका

Encounter : ‘बदलापूरमधील दुर्देवी घटनेनंतर आरोपीला ताबडतोब फाशी द्या’ अशा घोषणा देत रेल्वे रोखून आंदोलन केले. त्या कूरकर्मा आरोपीबद्दल विरोधकांना आपुलकी का वाढली? विरोधकांचा पोलिसांवर अविश्वास आहे आणि आरोपीबद्दल आपुलकी. विरोधकांचा हा दुतोंडी व्यवहार आहे, अशी सडकून टीका शिवसेना खासदार नरेश म्हस्के यांनी केली. केवळ राजकारणासाठी पोलिसांच्या शौर्यावर संशय घेऊन आरोपीची भूमिका घेणारे विरोधक दुतोंडी साप आहेत, असा घणाघात खासदार म्हस्के यांनी केला.

पोलिसांच्या शौर्यावर संशय

बदलापूर अत्याचारातल्या आरोपीने पोलिसांची रिव्हॉल्वर हातात घेऊन पोलिसांवरच गोळीबार केला. तीन पोलिस त्यात जखमी आहे. पोलिसांनी स्वसंरक्षणासाठी गोळीबार केला. त्यात आरोपीचा मृत्यू झाला. मात्र विरोधक कुठलीही माहिती न घेता या घटनेवर प्रतिक्रिया देत सुटले आहेत. एन्काऊंटर की हत्या असा प्रश्न उपस्थित करून पोलिसांच्या शौर्यावर संशय व्यक्त करीत आहे. हे दुर्दैवी असल्याचे खासदार म्हस्के म्हणाले.  

अत्याचाराच्या दुर्दैवी घटनेचे विरोधकांनी राजकारण केले. आंदोलनासाठी बाहेरुन बसने माणसे आणली. बेंबीच्या देठापासून हेच विरोधक आरोपीला ताबडतोब फाशी द्या, आमच्या ताब्यात द्या असे ओरडत होते. मात्र याच नराधमाचा पोलिसांनी स्वसंरक्षणात केलेल्या गोळीबारात मृत्यू झाला. तर विरोधकांना त्याचा इतका पुळका का आलाय?, असा खरमरीत सवाल खासदार म्हस्के यांनी केला.

उध्दव ठाकरे यांच्यावर टीका 

ठाण्यातील व्यापारी मनसुख हिरेन याची १०० कोटींच्या वसुली करता. हत्या करणारा सचिन वाझे हा पोलिस अधिकारी संजय राऊत यांचा पीए होता. सचिन वाझेचे तोंडभरुन कौतुक करणारे तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हिरेन प्रकरणी विधान परिषदेत मूग गिळून बसले होते, अशीही टीका खासदार म्हस्के यांनी केली. तेलंगाणातील बलात्कार प्रकरणात एनकाउंटर करणाऱ्या पोलिसांचे सामनात जाहीर कौतुक केले. मात्र महाराष्ट्र पोलिसांच्या कामगिरीवर तुम्ही संशय व्यक्त करता. त्यांचे कौतुक करायला तुम्हाला लाज वाटते का?, असा सवालही त्यांनी केला. केवळ खुर्चीसाठी आरोपीच्या मृत्यूचे गलिच्छ राजकारण करणाऱ्या विरोधकांना महाराष्ट्रातील जनता लाथ मारुन हाकलून देईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

Sudhir Mungantiwar : बदलापूर प्रकरणात राजकारण अनाकलनीय !

विरोधकांना काही घेणं देणं नाही

जखमी पोलीसाची शिवसेनेकडून विचारपूस आरोपी अक्षय शिंदे याने केलेल्या गोळीबारात जखमी झालेले एपीआय निलेश मोरे यांची शिवसेनेकडून विचारपूस करण्यात आली. ठाण्यातील ज्युपिटर हॉस्पिटल येथे शिवसेनेच्या शिष्टमंडळाने विचारपूस केली. जखमी पोलीसाबाबत विरोधकांना काही घेणं देणं नाही पण अक्षय शिंदे मारला गेला याचे त्यांना दुःख होतंय. विरोधकांच्या या दुटप्पी भूमिकेमुळे पोलिसांच्या मनोधैर्यावर परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पोलिसांचं मनोबल कायम रहावं, त्यांच्या पराक्रमाचं कौतुक व्हावं. तसंच महाराष्ट्रातील जनता त्यांच्या पाठीशी आहे असा विश्वास द्यावा. यासाठी जखमी पोलिसांची भेट घेतली, असे खासदार नरेश म्हस्के म्हणाले.

error: Content is protected !!