महाराष्ट्र

Gadchiroli : आत्रामांनी घेतली अधिकाऱ्यांची झाडाझडती

Dharmarao Baba Aatram : नागरिकांच्या कामावरून व्यक्त केला संताप

Mahayuti Government : गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी उपविभागात रस्ते, पाणी, वीज, शिक्षण, आरोग्य, वनजमिनीचे पट्टे आदी समस्या सोडविण्यात हयगय होत आहे. यासंदर्भात नागरिक तक्रार करीत आहेत. या अधिकाऱ्यांची अहेरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार तथा राज्याचे अन्न औषधी प्रशासन मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांनी चांगली झाडाझडती घेतली. नागरिकांच्या समस्यांकडे दुर्लक्ष करणाऱ्या अधिकाऱ्यांची त्यांनी चांगलीच कानउघाडणी केली. आत्राम यांनी अहेरी व एटापल्ली तालुक्यातील विकास कामांचा आढावा घेतला. बैठकीत नागरिकांनी समस्यांचा पाढा वाचला. त्यामुळे धर्मरावबाबांनी अधिकाऱ्यांना जाब विचारला. विकास कामात हयगय खपवून घेतली जाणार नाही, असा इशाराही दिला.

अहेरी येथील आढावा बैठकीला सहाय्यक जिल्हाधिकारी विजय भाकरे, उपविभागीय अधिकारी आदित्य जिवणे, तहसीलदार बालाजी सोमवंशी, उपमुख्याधिकारी महिला व बालकल्याण राजेंद्र भुयार उपस्थित होते. पोलिस निरीक्षक दशरथ वाघमोडे, अहेरी नगर पंचायतीचे मुख्याधिकारी नानाजी दाते, सामाजिक कार्यकर्ते बबलू हकीम हे देखील यावेळी उपस्थित होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) जिल्हाध्यक्ष रवींद्र वांसेकर, अहेरी पंचायत समितीचे माजी सदस्य हर्षवर्धनरावबाबा आत्राम आदी यांनीही संवाद साधला. मुख्यतः अहेरी तालुक्यातील व शहरातील रस्ते, वीज, पाणी, आरोग्य, शिक्षण वनजमिनीवरील पट्टे यावर धर्मराव बाबा आत्राम यांनी अधिकारी व कर्मचाऱ्यांची कान उघाडणी करीत त्यांना धारेवर धरले.

हलगर्जीपणा नको

अहेरी शहरातील अहेरी ते आलापल्ली रस्त्यावरील पोलिस उपमुख्यालय प्राणहिता ते मुख्य चौकातील रस्ता खराब आहे. या कामाला सहा महिन्यापासून विलंब होत आहे. सामाजिक कार्यकर्ते सुरेंद्र अलोणे यांनी आढावा बैठकीत हा विषय मांडला. यासंदर्भात त्यांनी आत्राम यांचे लक्षा वेधले. सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी व उपविभागीय अभियंत्यांना आत्रात यांनी खडे बोल सुनावले. सबंधित कंत्राटदारावर कारवाई करण्याचा इशाराही दिला. कंत्राटदाराला काळ्या यादीत टाकण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.

Parinay Fuke : सरसकट आरक्षणाची मागणीच चुकीची

मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेसाठी सर्व अधिकारी, कर्मचारी, सामाजिक कार्यकर्ते यांनी अर्ज ताबडतोब भरून घ्यावे असे ते म्हणाले.

महिलांना योजनेचा लाभ मिळवून देण्याचे आवाहन यावेळी धर्मराव बाबा आत्राम यांनी केले. आढावा बैठकीत विविध विभागाचे अधिकारी, विभाग प्रमुख, कर्मचारी, राष्ट्रवादी काँग्रेसचे अहेरी विधानसभा प्रमुख लक्ष्मण येरावार उपस्थित होते. नागरिकांनीही बैठकी उपस्थिती नोंदविली. वडलापेठा येथे स्थापित होत असलेल्या सूरजागड लोहखनित प्रकल्पामुळे या भागातील बेरोजगारांना रोजगार उपलब्ध होणारआहे. या प्रकल्पासाठी शेतकऱ्यांनी कंपनीला जागा उपलब्ध करून दिल्याने आत्राम यांच्या हस्ते शेतकऱ्यांचा शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!