महाराष्ट्र

Assembly Election : राजकीय पक्षांमध्ये सुरू झाला बैठकांचा सपाटा

Bhandara Politics : शिवसेना, वंचित बहुजन आघाडीकडून घेतला जातोय आढावा

Pitch Inspection : विधानसभेच्या निवडणुकीला घेऊन राजकीय पक्षांमध्ये हालचाली सुरू झाल्या आहेत. वंचित बहुजन आघाडीची गोंदिया जिल्हा बैठक नुकतीच पार पडली. त्यापाठोपाठा शिवसेना उद्धव ठाकरे गटाची भंडाऱ्यात जिल्हा कार्यकारिणी बैठकही घेण्यात आली. बैठकांचा सपाटा लक्षात घेता आगामी निवडणूक या दोन्ही पक्षांनी चांगल्याच गंभीरतेने घेतल्याचे दिसत आहे. 

वंचित बहुजन आघाडीची (Vanchit Bahujan Aghadi) बैठक विश्रामगृहात घेण्यात आली. बैठकीला पूर्व विदर्भ संयोजन समितीचे अध्यक्ष डॉ. रमेश कुमार गजबे यांनी मार्गदर्शन केले. राज्यभर संपर्क अभियान दौऱ्याच्या माध्यमातून आगामी विधानसभा निवडणुकीबाबत या बैठकीत चर्चा करण्यात आली. संघटनात्मक बांधणी मजबूत करण्यावरही भर देण्यात आला. पहिल्यांदा आणि दुसऱ्यांदा मतदान करणाऱ्या नवमतदारांशी संवाद साधण्यासाठी अभियान राबविण्याचा निर्णय घेण्यात आला. लोकसभा निवडणुकीतील पराभवाने खचून न जाता फुले, शाहू, आंबेडकरी राजकारण प्रस्थापित करण्यासाठी आणि वंचित बहुजनांच्या हाती सत्ता देण्यासाठी पुन्हा नव्या ताकतीने मैदानात उतरण्याचा संकल्प पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी केला.

सभेला पूर्व विदर्भ समन्वय समितीच्या मुख्य संयोजकांसह माजी राज्यमंत्री डॉ. रमेश कुमार गजबे, पूर्व विदर्भ समन्वय समितीचे संयोजक मुरलीधर मेश्राम उपस्थित होते. विवेक हाडके, प्रफुल मानके, भंडारा गोंदिया जिल्हा प्रभारी भगवान भोंडे, वंचित बहुजन आघाडी गोंदियाचे प्यारेलाल जांभुळकर, जिल्हा उपाध्यक्ष राजू राहुलकर, महासचिव विनोद मेश्राम, युवक आघाडीचे जिल्हाध्यक्ष अश्विन डोंगरे यांनी उपस्थिती नोंदविली. जिल्ह्यातील मुख्य कार्यकारिणी, महिला व युवक आघाडी, तालुका कार्यकारिणीचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

Gram Panchayat Politics : सरपंच काढणार मुंबईत लाँग मार्च 

ठाकरे गट फ्रंटफूटवर

शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या (Shiv Sena Uddhav Thackeray) जिल्हा कार्यकारिणीची बैठक जिल्हा संपर्क प्रमुख प्रदीप खोपडे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. ही बैठकीही भंडारा जिल्हा विश्रामगृहात घेण्यात आली. यावेळी जिल्हाप्रमुख संजय रेहपाडे, अॅड. रवी वाढई यांनी संवाद साधला. सहसंपर्क प्रमुख नरेश डाहारे, जिल्हा संघटक लवकुश निर्वाण यांची प्रमुख उपस्थिती होती. अध्यक्षीय भाषणात खोपडे यांनी आपसातील हवेदावे, मतभेद विसरण्याचे आवाहन केले. एकदिलाने काम करावे असे ते म्हणाले. रेहपाडे यांनी पक्षाने जिल्ह्यात केलेल्या विविध कामांचा आढावा सादर केला. भंडारा विधानसभा शिवसेनेचा परंपरागत मतदारसंघ आहे. विधानसभेत महाविकास आघाडीतर्फे (Mahavikas Aghadi) शिवसेना आपला उमेदवार देईल. त्यादृष्टीने पक्षसंघटन बळकट करण्यात आल्याचे यावेळी त्यांनी सांगितले.

बैठकीचे प्रास्ताविक तालुकाप्रमुख ललितबोंद्रे यांनी केले. विनोद ढोरे यांनीही संवाद साधला. महिला आघाडी जिल्हा संघटका रश्मी पातुरकर, युवासेना जिल्हाधिकारी श्रीकांत मेश्राम, जितू उइके, उपजिल्हाप्रमुख किशोर चन्ने, दीपक गजभिये, नरेंद्र पहाडे, प्रतिभा पारधी, सविता हटवार, तालुकाप्रमुख किशोर तलमले, प्रमोद मेश्राम, नितीन कळंबे, उपतालुकाप्रमुख निवृत्ती गभणे, केशव तरोणे, राधेश्याम बांगडकर आदी यावेळी उपस्थित होते.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!