महाराष्ट्र

Nagpur Blast : होरपळून अनेक कामगारांचा मृत्यू

Four Died : होरपळून अनेक कामगारांचा मृत्यू

Nagpur  : नागपुरात स्फोटकं बनवणाऱ्या एका कंपनीत भीषण स्फोट झाल्याने पाच लोकांचा जागीच मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. मृतकांचा आकडा वाढण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. स्फोटाची माहिती मिळताच घटनास्थळी अग्निशमन दल, पोलीस कर्मचारी दाखल झाले आहेत.

चार लोकांचा मृत्यू

प्राप्त माहितीनुसार चार लोकांचा घटनास्थळी मृत्यू झाला. तर चार जण गंभीर जखमी आहेत. शितल चटप, दानसा मरसकोल्हे, श्रद्धा पाटील, प्रमोद चावरे अशी गंभीर व्यक्तींची नावे आहेत. तर मृतकांमध्ये प्रांजली मोद्रे, प्राची फलके, वैशाली शिरसागर, मोनाली पन्नालाल बंदेवार यांचा समावेश आहे.

जखमी व्यक्तींना तातडीने रुग्णालयात पोहोचविण्याचे माजी गृहमंत्री व विद्यमान आमदार अनिल देशमुख यांनी पुढाकार घेतल्याची माहिती आहे. देशमुखांच्या पुढाकाराने अनेक जखमींना उपचारासाठी हलविण्याच्या कार्याला वेग आला आहे. तर अनिल देशमुख स्वत: जखमींची चौकशी करण्यासाठी नागपूरसाठी रवाना झालेले असल्याची देखील माहिती आहे.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, नागपूर येथील चामुंडा या स्फोटकं बनवणाऱ्या कंपनीत स्फोट झाला. दुपारी साधारणत: साडेबारा वाजण्याच्या सुमारास हा स्फोट झाला. हा स्फोट इतका भीषण होता की, कंपनीचं छतही संपूर्णपणे कोसळलं. या दुर्घटनेत एकूण पाच जणांचा मृत्यू झाला. या मृतकांमध्ये चार महिला असल्याची माहिती समोर आली आहे. तर जखमी सात कर्मचाऱ्यांची देखील प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती समोर आली आहे.

Nana Patole : ‘ते’ नंतर बघू, पहिले हे सरकार हाकलणे महत्वाचे !

सर्व जखमी व्यक्तींना नागपुरातील गुप्ता हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. तर एका व्यक्तीला रामनगर येथील दंदे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. र घटनास्थळी पोलिसांसह अग्निशमन पथक तसेच बचाव कार्य यंत्रणा सज्ज झाली आहे.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!