महाराष्ट्र

Mahavikas Aghadi : ‘ईव्हीएम’विरोधात 700 जणांच्या रक्ताने स्वाक्षऱ्या!

EVM Issue : महाविकास आघाडीचे ईव्हीएम विरोधात जनआंदोलन

देशात आधी मतपत्रिकेच्या माध्यमातून पारदर्शकपणे निवडणुका व्हायच्या. परंतु ‘ईव्हीएम’द्वारे मतदान प्रक्रिया सुरू झाल्यापासून त्याविषयी साशंकता व्यक्त केली जात आहे. ‘ईव्हीएम’ ऐवजी मतपत्रिकेद्वारे मतदान व्हावे, या मागणीसाठी बुलढाणा जिल्ह्यातील खामगावात महाविकास आघाडीने मंगळवारी सुरू केलेल्या जनआंदोलनात 700 जणांनी रक्ताच्या स्वाक्षरी करीत सहभाग नोंदवला. नुकत्याच झालेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत राज्यातील महायुती सरकारविरोधात जनतेमध्ये प्रचंड रोष असताना निवडणुकीचा निकाल धक्कादायक असल्याचा आरोप याप्रसंगी करण्यात आला.

शेवटच्या तासामध्ये मतदानाच्या टक्केवारीमध्ये वाढ करून मतांची चोरी करून महायुतीने सत्ता मिळविली आहे, असा महाविकास आघाडीचा आरोप आहे. या निकालावर शंका उपस्थित करत काँग्रेसने ‘ईव्हीएम हटाओ लोकशाही बचाओ’ चा नारा देत निवडणुकीत पारदर्शकता आणण्यासाठी बॅलेट पेपरच्या माध्यमातून निवडणुका घेण्याची मागणी केली आहे. काँग्रेसच्या वतीने राज्यभर ईव्हीएम विरोधात जनआंदोलन उभारण्याचा निर्णय घेतला असुन त्यासाठी राज्यभर स्वाक्षरी अभियान सुरु केले आहे.

पुन्हा निवडणूक घेण्यासाठी स्वाक्षरी 

त्यानुसार खामगाव विधानसभा मतदार संघात माजी आमदार दिलीपकुमार सानंदा यांच्या नेतृत्वाखाली उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर ईव्हीएम विरोधात जनआंदोलन करुन मतपत्रिकेच्या माध्यमातून निवडणुका घेण्यासाठी स्वाक्षरी अभियान राबविण्यात आले. यावेळी ईव्हीएम विरोधात घोषणाबाजी करून निषेध नोंदविण्यात आला. देशातील लोकशाही धोक्यात आली असून, तिला वाचविण्यासाठी आगामी सर्व निवडणुका ‘ईव्हीएम’ ऐवजी मतपत्रिकेवर घ्याव्या, अशी मागणी माजी आमदार दिलीपकुमार सानंदा यांनी केली. महाविकास आघाडीच्या वतीने उपविभागीय अधिकारी कार्यालय परिसरात मंगळवारी दुपारी जनआंदोलन करून ‘ईव्हीएम’ विरोधात स्वाक्षरी अभियानाला प्रारंभ करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते.

Shiv Sena : अकोल्यात ठाकरेंच्या शिवसेनेला खिंडार पडण्याचा धोका

यावेळी उद्धव गटाचे जिल्हा संपर्क प्रमुख प्रा. नरेंद्र खेडेकर, काँग्रेस प्रदेश सचिव डॉ. स्वाती वाकेकर, धनंजय देशमुख, प्रदेश सरचिटणीस डॉ. तब्बसुम हुसैन, राकाँचे धोंडीराम खंडारे, संजय बगाडे, देवीदास गोतमारे, उद्धवसेना तालुका प्रमुख श्रीराम खेलदार, संजय बेलोकार, बाजार समिती सभापती सुभाष पेसोडे, काँग्रेस शहर अध्यक्षा सरस्वती खासने, तालुकाध्यक्ष मनोज वानखडे, विजय काटोले, शेगाव बाजार समिती सभापती गोपाळराव मिरगे, उपसभापती श्रीकांत तायडे, पंजाबराव देशमुख, डॉ. सदानंद धनोकार, सुरेश वनारे, सुरेशसिंह तोमर, गजानन वाकूडकर, महेंद्रसिंग राठोड, बबलू पठाण, किशोरअप्पा भोसले, रोहित राजपूत, अजय तायडे, कैलास फाटे, रवी महाले, आकाश जैस्वाल उपस्थित होते. 20 डिसेंबरपर्यंत खामगाव मतदारसंघात हे स्वाक्षरी अभियान राबविले जाणार आहे.

जवळपास 25 हजार नागरिकांच्या स्वाक्षऱ्या करून प्रदेश काँग्रेस कमिटीमार्फत राष्ट्रपती, निवडणूक आयोगाला ते दिले जाणार आहे. मोहिमेमध्ये विलाससिंग इंगळे, गणेश ताठे, प्रमोद चिंचोळकर, श्रीकृष्ण टिकार, पांडुरंग राखोंडे, राजेंद्रसिंह इंगळे, ओम शर्मा, संजय शर्मा, गणेश मानेकर, गोलू भेरडे, संताराम तायडे, विनोद माळवंदे, पुंडलिक ढेंगे, श्याम गायगोळ, डॉ. आर. के. राजपूत, भाऊराव शेजोळे, अशोक देशमुख सहभागी झाले होते.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!