प्रशासन

Bhandara ZP : सुटीतही जिल्हा परिषद ऑन ड्यूटी, टेंशन मार्च एंडिंगचे !

March Ending Fever : अनेक वेळा उपलब्ध निधी वेळेत खर्च न झाल्याने तो परत पाठवावा लागतो.

Administration News : भंडारा जिल्हा परिषदेला मार्च एंडिंगचे टेंशन अधिक आल्याचे बघायला मिळाले. रविवार (ता. 31 मार्च) सुटीचा दिवस असतानासुद्धा भंडारा जिल्हा परिषदेत कर्मचारी ऑन ड्यूटी पहायला मिळाले. रविवार सुटीचा दिवस असताना सर्वच विभागांत मार्च एंडिंगचा फिव्हर दिसून आला. या आर्थिक वर्षातील कामे शेवटच्या दिवसांत कव्हर करण्यावर अधिकारी व कर्मचारी भर देत कार्यालयात ठाण मांडून कामकाज करताना दिसून आले.

Lok Sabha Election : निष्ठावंतांना अस्वस्थ करताहेत आयाराम-गयाराम!

विशेष म्हणजे जिल्हा परिषदेतील वित्त, बांधकाम, आरोग्य, महिला व बालकल्याण, पाणीपुरवठा आदी विभागांत कामकाज सुरू होते. स्थानिक स्वराज्य संस्थांना केंद्र व राज्य शासनाकडून विविध योजनेंतर्गत विकासकामांसाठी निधी उपलब्ध होत असतो. हा निधी दिलेल्या आर्थिक वर्षात खर्च करणे बंधनकारक आहे. अन्यथा अनेक वेळा उपलब्ध निधी वेळेत खर्च न झाल्याने तो परत पाठवावा लागतो.

शासनाचा निधी विकासाच्या विविध बाबींवर खर्च व्हावा, यासाठी अधिकारी कर्मचाऱ्यांकडून तसे नियोजन सुरू असल्याचे चित्र अनेक शासकीय कार्यालयांत दिसून आले. मार्च संपत असतानाही टेबलवरच असलेल्या फाईल्स हातावेगळ्या करण्याच्या कामाला वेग आल्याचे चित्र जिल्हा परिषदेतील विविध विभागांमध्ये दिसून आले. यंदा लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्याने शासनाच्या योजनांच्या कामांना ब्रेक लागला आहे.अनेक कामांच्या वर्कऑर्डर मिळूनही ती कामे बाकी आहेत. तर काही कामे वेळेत पूर्ण करूनही त्याचा निधी शासनस्तरावर प्रलंबित असतो. यासाठी वरिष्ठांकडे पाठपुरावा सुरू असतो. विविध विकासकामे केलेल्या संस्था, कंत्राटदारही कामाचे बिल वेळेत मिळावे, म्हणून जिल्हा परिषदेत ठाण मांडून होते. या सर्व घडामोडी एरवी कामात कामचुकारपणा करणारी जिल्हा परिषद सुटीच्या दिवशीही गजबजली पहायला मिळाल्याने मार्च एंडिंगचा फिव्हर चढल्याचे बोलले जात आहे.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!