महाराष्ट्र

Reservations : मनोज जरांगे यांना जीवे मारण्याची धमकी; पोलीस बंदोबस्त वाढविला

Manoj Jarange Patil : बजाज बिश्नोई लीडर नावाच्या अकाऊंटवरून ही धमकी

Manoj Jarange Patil : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांना आता जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. उमेदवारी मागण्यासाठी इच्छुक म्हणून येणार आणि गेम वाजवणार, अशी धमकी आल्यामुळे आंतरवाली सराटीत पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. सध्या मुलाखतीसाठी आलेल्या इच्छुकांचीही कसून तपासणी करण्यात येत आहे. यूट्यूबच्या कॉमेंट बॉक्समध्ये ही धमकी देण्यात आली असून पोलीस धमकी देणाऱ्याचा शोध घेत आहेत. आंतरवाली सराटी येथे सध्या विधानसभेसाठी इच्छुक असलेल्या मराठा उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात येत आहेत. त्यामुळे गावात सध्या प्रचंड गर्दी आहे.

एका यूट्यूब चॅनलच्या कॉमेंट बॉक्समध्ये अज्ञाताने ‘उमेदवार म्हणून येणार आणि मनोज जरांगे यांचा गेम करणार’ अशी धमकी दिली आहे. बजाज बिश्नोई लीडर नावाच्या अकाऊंटवरून ही धमकी देण्यात आली आहे. या धमकीनंतर मनोज जरांगे यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली असून मुलाखतीसाठी येणारांनाही तपासणीला सामोरे जावे लागत आहे.

कशाला या भानगडीत..

आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागला असता तर भानगडीत पडलो नसतो. सध्या उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात येत आहेत. 29 किंवा 30 ऑक्टोबरला मतदारसंघ जाहीर करणार आहे. तेव्हाच उमेदवारही जाहीर करण्यात येतील, असे मनोज जरांगे यांनी सांगितले. केवळ एका जातीच्या आधारावर निवडणूक जिंकता येत नाही, त्यामुळे सर्वांना सोबत घेऊनच विधानसभा लढवणार असल्याचे जरांगे यांनी स्पष्ट केले. महाराष्ट्रात मराठा-ओबीसी असा वाद नसल्याचेही ते म्हणाले. मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागला असता तर आम्ही कशाला या भानगडीत पडलो असतो? पण देवेंद्र फडणवीस, छगन भुजबळ यांनी अडथळे आणले. ज्यांनी अडथळे आणले त्यांची पाडापाडी निश्चित असल्याचाही जरांगे यांनी पुनरुच्चार केला.

Shiv Sena : भोंडेकर एबी फॉर्म आण्यायला गेले; सोबत जबाबदारीही घेऊन आले !

उमेदवारीसाठी जरांगे यांच्याकडे गर्दी

आंतरवली सराटीमध्ये राज्यातील २३ मतदारसंघातील इच्छूक उमेदवारांनी गुरुवारी गर्दी केली. गटागटाने लोक यायचे, जरांगे पाटील त्यांना एका उमेदवारांचे नाव नक्की करुन या असे सांगायचे, मग लोक पुन्हा एखाद्या झाडाखाली बसून गटागटाने चर्चा करायचे. पुन्हा एकमत झाल्याची उदाहरणे तशी नव्हतीच त्यामुळे उमेदवार ठरविण्याच्या प्रक्रियेत जरांगे यांचा गुरुवारचा दिवस गेल्याचे चित्र होते. विधानसभा निवडणुकीत पाठिंबा देण्यासाठी तसेच उमेदवारी जाहीर करण्यासाठी गुरुवारी जिल्ह्यातील आंतरवाली सराटी येथे इच्छुकांची मोठी गर्दी झाली होती. गुरुवारी २३ जिल्ह्यातील इच्छुक आले होते आणि उर्वरित जिल्ह्यातील इच्छुक दुसऱ्या टप्प्यात येणार असल्याचे मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी इच्छुकांशी चर्चा करण्यापूर्वी माध्यम प्रतिनिधींशी बोलताना सांगितले.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!