महाराष्ट्र

Manoj Jarange Patil : भुजबळ म्हणजे नाशिकला लागलेली साडेसाती!

Chhagan Bhujbal : नाशिकमध्ये मनोज जरांगे यांचा हल्लाबोल; योग्य कार्यक्रमाचा इशारा

Nashik : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी हिंमत असेल तर निवडणूक लढवून दाखवावी, असं थेट आव्हान मंत्री छगन भुजबळ यांनी दिले होते. त्यामुळे जरांगेंच्या उत्तराकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं होत. मनोज जरांगे पाटील यांनी छगन भुजबळ यांच्यावर शांतता रॅलीच्या सांगता सभेतून जोरदार टीकास्त्र डागले. भुजबळ म्हणजे नाशिकला लागलेली साडेसाती आहे. त्यांचा योग्य कार्यक्रम करू, येवल्याला लागलेला डाग पुसणारच, असे त्यांनी म्हटले आहे.

तपोवनमधून सुरू झालेल्या रॅलीचा जिल्हा न्यायालयासमोर छत्रपती शिवाजी महाराज स्मारकामध्ये समारोप झाला. छगन भुजबळांवर जोरदार टीका मनोज जरांगे पाटील म्हणाले, ‘जातीवंत, कडवट, कट्टर म्हणजे काय हे नाशिकच्या जनतेने दाखवून दिले आहे. तुम्ही मराठवाड्यापेक्ष्या मोठ्या संख्येने जमा झाले आहात. तुमच्या जिल्ह्याला लागलेली साडेसाती म्हणत आहे की, ‘मनोज जरांगेंनी 8 जागा निवडून आणून दाखवाव्या’. तुझ्याच जिल्ह्यातील निवडून येतात का बघ आधी?’

देवेंद्र फडणवीस यांचा पक्ष भुजबळ संपवतील. छगन भुजबळांनी शिवसेना, राष्ट्रवादी फोडली, आता भाजप फोडतील. माझ्या नादी लागू नको, असे म्हणत त्यांनी छगन भुजबळांवर जोरदार निशाणा साधला. ते पुढे म्हणाले की, ‘फडणवीस देखील वेडयासारखे वागत आहेत. तुमच्या येवल्याचे नाव यावेळेस पवित्र होणार आहे. येवल्याचा डाग पुसून टाकणार आहे. त्याचा मी कार्यक्रमच लावतो. मराठा आरक्षणाच्या आडवा येणाऱ्याला आडवे केले. देवेंद्र फडणवीस सर्वांना पाणी पाजतात. त्यांना आता मी भेटलो. त्यांनाच काय करावे सूचत नाहीये आता.’

Uddhav Thackeray : दिल्लीत बसलेल्या दोघांच्या बुडाला आग लावू!

आता विधानसभेत कार्यक्रम करू

आपण मराठा समाजासाठी 10 टक्के आरक्षण मागितले होते का? त्याची व्हॅलिडीटी दिली नाही. मी मागे लागलो म्हणून थोडी वाढवली. आता ईडब्ल्यूएस आरक्षण गेले तर म्हणतात मराठा आरक्षणाच्या मागणीमुळे गेले. माझ्या विरोधात विधानपरिषदेचे आमदार बोलताय. विधानसभेचे आमदार बोलत नाही. लोकसभेत कार्यक्रम केला. तुम्ही लई जोरात पडले, आता विधानसभेतही योग्य कार्यक्रम करू असे म्हणत मनोज जरांगे पाटील यांनी महायुती सरकारला डिवचले.

प्रकृती बरी नसतानाही

मनोज जरांगे पाटील यांची तब्येत ठिक नसतानाही ते शांतता रॅलीच्या समारोप सभेत सहभागी झाले. त्यांना डॉक्टरांनी १८ मिनिटांच्यावर भाषण करू नका असा सल्ला दिला होता. पण ते तब्बल ४५ मिनिटे व्यासपीठावर बोलले. व्यासपीठावर बोलत असताना त्यांना अचानक बसून बोलण्याची इच्छा झाली. परंतु ते बसू शकले नाही. त्यांच्या कमरेतही वेदना होत असल्याचे दिसून येत होते. उपोषणामुळे माझे अंग गळून गेले आहे. फारशी ताकद राहिली नाही, असेही त्यांनी सांगितले. शेवटी त्यांनी भाषण आटोपते घेतले. डॉक्टरांच्या सल्याने ते थेट आंतरवली सराटीत जावून ॲडमिट होणार असल्याचे त्यांनी सभेत सांगितले.

29ला ठरवू लढायचं की पाडायचं !

येत्या २९ ऑगस्ट रोजी आंतरवली सराटीत सर्व समाजबांधवांनी यावे. त्या ठिकाणी आपण विधानसभा निवडणूक लढायची की उमेदवारांना पाडायचे याचा निर्णय घेऊ, असे आवाहन जरांगे पाटील यांनी केले.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!