Antarwali Sarati : मराठा आरक्षणात ‘सगेसोयरे’ची अंमलबजावणी व्हावी, ओबीसीमधून सरसकट आरक्षण द्यावे ही मनोज जरांगेंची मागणी कायम आहे. त्यांच्या या मागणीला ओबीसी समाजाचा विरोध आहे. मराठा समाजाला वेगळे आरक्षण द्यावे. ओबीसीतून (OBC) आरक्षण देवू नये, अशी ओबीसी नेत्यांची मागणी आहे. या सर्व पार्श्वभूमीवर मनोज जरांगे यांनी पुन्हा आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. शनिवार, 20 जुलैपासून त्यांनी अंतरवाली सराटीतूनच उपोषणाला सुरुवात केली आहे. वर्षभरातील त्यांनी पाचव्यांदा उपोषणास सुरुवात केली आहे.
मराठा आंदोलक मनोज जरांगे हे शनिवारपासून पुन्हा एकदा बेमुदत उपोषणाला बसले आहे. त्यांनी याबाबतची घोषणा आधीच केली होती. त्यानुसार जालना जिल्ह्याच्या अंतरवाली सराटी येथे त्यांनी उपोषणाला प्रारंभ केला आहे. मराठा समाजाला ओबीसीमधूनच सरसकट आरक्षण द्यावे, ही त्यांनी मागणी आहे. सरकारने निर्णय घ्यावा, यासाठी त्यांनी अल्टिमेटमही दिला होता. सरकाने चर्चा करून त्यांना आश्वासनही दिले होते. पण अजूनही त्यात काहीच होत नसल्याचे सांगत जरांगे यांनी उपोषणाला सुरुवात केली आहे.
सरकार अडचणीत
मनोज जरांगे यांनी शांतता रॅली काढली होती. रॅलीत महायुती सरकार आणि ओबीसी नेते छगन भुजबळ यांच्यावर त्यांनी जोरदार टीका केली. आता महायुती आणि महाविकास आघाडीचे (Mahavikas Aghadi) सरकार येणार नाही. येवल्यातील छगन भुजबळांच्या (Chagan Bhujbal) नादी लागल्याने सत्ता जाणार. सरकारने मराठ्यांचा अंत पाहू नये, असा इशारा त्यांनी दिला होता. याशिवाय 288 उमेदवार पाडणार, असा सूचक इशाराही त्यांनी दिला होता. त्याच वेळी त्यांनी 20 तारखेपासून अंतरवली सराटीमधून उपोषण सुरू करणार आहे. आता माघार नाही, अशी घोषणा केली होती.
लाडकी बहिण, लाडका भाऊ आणि आता लाडकी मेव्हणी अशी योजना पण आणा, असा टोला जरांगे पाटील यांनी सरकारला लगावला. होता. त्यांनी सरकारच्या धोरणावर टीका केली होती. अनेक योजनांचे पैसे येण्यासाठी किती कालावधी लागतो, याची त्यांनी उजळणी केली. दीड हजार रुपयांसाठी सरकारच्या संकेतस्थळावर उड्या पडल्याने त्यांची सेवा कोलमडली. त्याचा फटका विद्यार्थ्यांच्या प्रवेशावर झाल्याचा आरोप त्यांनी जरांगे पाटील यांनी यावेळी केला. सगे सोयऱ्यांच्या अध्यादेशाची अंमलबजावणी करून त्याचे कायद्यात रूपांतर करावे अशी मागणी त्यांची आहे. हैदराबाद, सातारा, बॉम्बे गॅझेटचा आधार घेत मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावे. गॅझेटमध्ये मराठा समाजाचा कुणबी असा उल्लेख आहे, असेही जरांगे यांचे म्हणणे आहे. अंतरवालीसह राज्यात मराठा आंदोलकावर दाखल झालेले गुन्हे परत घेण्यात यावे अशी मागणीही त्यांनी केली आहे.