महाराष्ट्र

Pravin Darekar : फडणवीसांच्या संयमाला दुर्बलता समजू नका

Maratha Reservation : मनोज जरांगे पाटील यांना प्रवीण दरेकर यांचा इशारा

BJP Warns Manoj Jarange Patil : मनोज जरांगे पाटील यांचा द्वेष केवळ भाजप आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावर आहे. मराठा समाजाने जरांगे पाटलांवर विश्वास दाखवला आहे. यातून जरांगे यांनी अहंकार येऊ देऊ नये. अहंकारातून ऱ्हास झाल्याची अनेक उदाहरणे आहेत. देवेंद्र फडणवीस संयमी आहेत. त्यांच्या संयमी भूमिका म्हणजे दुर्बलता समजू नका, असा इशाराच भाजपा गटनेते आमदार प्रविण दरेकर यांनी दिला. जरांगे यांनी आंदोलन सुरू केले. त्या दिवसापासून ते आजपर्यंत देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना लक्ष्य करीत आहेत.

देवेंद्र फडणवीस हेच मराठा आरक्षणाला आडवे आहेत, अशा प्रकारचे चित्र निर्माण केले जात आहे. हा कुणाचा तरी राजकीय अजेंडा आहे. तो राबवित आहेत की काय, अशी भावना होत आहे. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांनी मराठा समाजाला आरक्षण देण्याचे काम केले. हे आरक्षण त्यांनी हायकोर्टात टिकविले. सुप्रीम कोर्टात ते नाकारले गेले नाही. परंतु नंतर उद्धव ठाकरेंचे सरकार आल्यावर त्यांनी निष्काळजीपणा केला. त्यामुळे आरक्षण गेले. परंतु त्यांना जाब विचारला गेला नाही. आता आम्ही फडणवीसांची बाजू घ्यायला गेलो, तर आम्हाला फडणवीसांचा रोग झाल्याचे सांगितले जाते, असे दरेकर म्हणााले.

पवारांना जाब विचारा

शरद पवार (Sharad Pawar) अनेक वर्ष महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. त्यांच्या नेतृत्वात, मार्गदर्शनाखाली अनेक सरकारांनी काम केले. त्यांना कोणी जाब विचारत नाही. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) अडीच वर्ष मुख्यमंत्री होते. त्यांना कोणीही जाब विचारला नाही. तेव्हा आंदोलन, आक्रमण केले अशा प्रकारची भूमिका नव्हती. तेव्हा प्रश्न नव्हते का? ओबीसी आरक्षणाला संवैधानिक धक्का लागू शकतो का?ओबीसीतून आरक्षण द्या, अशा प्रकारे शरद पवार, उद्धव ठाकरे, काँग्रेसचे नेते सांगू शकतात का? ओबीसीतून आरक्षण द्या हे ते लिहून देणार आहेत का? असा सवालही दरेकर यांनी केला.

सरकार सकारात्मक आहे. असे असताना चर्चा सोडून वातावरण दूषित केले जात आहे. यामुळे समाजात जातीय तेढ निर्माण होऊ शकते. जरांगे म्हणतात देवेंद्र फडणवीस रक्तरंजित इतिहास रचत आहेत. गृहमंत्री असूनही त्यांच्याविषयी जरांगे वाटेल ते बोलत आहेत. फडणवीस किंवा सरकार ते सहन करत आहे. राज्यात फक्त शांतता राहावी यासाठी. संयमी भूमिका फडणवीस घेत असतील, तर ती त्यांची दुर्बलता जरांगेंनी समजू नये. जरांगेंचे आंदोलन मराठ्यांच्या प्रश्नासाठी आहे की, देवेंद्र फडणवीस यांना ‘टार्गेट’ करून कुणाचा तरी राजकीय अजेंडा चालविण्यासाठी अस सवालही त्यांनी केला.

मनोज जरांगे हे शरद पवार, उद्धव ठाकरे, काँग्रेस नेत्यांची भूमिका विचारत नाहीत. त्यांना देवेंद्र फडणवीस द्वेषाने कावीळ झाला आहे. सरकार विरोध हा अजेंडा आहे, भाजपा विरोध हा अजेंडा आहे की देवेंद्र फडणवीस विरोध हा अजेंडा आहे, हे त्यांनी ठरवावे. मराठ्यांचे प्रश्न समन्वयातून सोडवणे हा आंदोलनाचा मुख्य उद्देश असेल तर तशी कृती त्यांनी करावी. देवेंद्र फडणवीस, छगन भुजबळ, गिरीश महाजन, चंद्रकांत पाटील, प्रकाश आंबेडकर असतील या सगळ्यांवर टीका करायची. ही महाराष्ट्राची संस्कृती नसल्याचेही दरेकर म्हणाले.

Radhakrishna Vikhe Patil : अकोलेकरांच्या नशिबी पालकमंत्र्यांचे दर्शनच नाही

शरद पवार, उद्धव ठाकरे आणि काँग्रेसचे नेते सह्याद्रीवरील बैठकीला उपस्थित नव्हते. त्यांनी मराठा समाजाच्या हितासाठी असलेल्या बैठकीकडे ढुंकूनही पाहिले नाही. एका शब्दानेही विचारणा केली नाही. मुख्यमंत्री मराठा समाजाविषयी संवेदनशील आहेत. त्यामुळे सरकारवर विश्वास असायला हवा. सरकार पायशी यावे, सरकारने नमावे यापेक्षा चर्चेतून मराठा समाजाचे हित महाराष्ट्राला अपेक्षित आहे. मराठा समाजासाठी सरकारने अनेक निर्णय घेतल्याचेही दरेकरांनी यावेळी नमूद केले.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!