महाराष्ट्र

Assembly Elections : जरांगेची पार्टी सर्वात भारी; 800 इच्छुकांचे अर्ज

Manoj Jarange Patil : विधानसभा निवडणूक लढणार?; आजी-माजी आमदारांची रांग

मनोज जरांगे पाटील यांनी आता विधानसभा निवडणूक लढवण्याचा निर्णय पक्का केलेला दिसत आहे. त्यांनी इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागवायला सुरुवात केली आहे. अनेकांनी भेटून त्यांच्याशी चर्चाही केली आहे. त्यात माजी आमदार, विद्यमान आमदार आणि इतर मातब्बर नेत्यांचा समावेश आहे. अनेक बड्या पक्षातील लोकही मनोज जरांगे पाटील यांच्याकडून लढण्यास तयार आहेत. मनोज जरांगे यांच्याकडे आतापर्यंत 800 इच्छुकांनी अर्ज दिले आहेत. या सर्वांना आमदार व्हायचं आहे. मनोज जरांगे पाटील यांनीच हा आकडा जाहीर केला आहे.

मनोज जरांगे यांनी माध्यमांशी संवाद साधताना ही माहिती दिलीय. ‘आमच्याकडे इच्छुकांचा मोठा डेटा आहे. सुमारे 700 ते 800 जणांनी अर्ज केले आहेत. या सर्व अर्जांची छाननी होईल. तज्ज्ञांची समिती हे काम करेल. मला वाटलं होतं मराठवाड्यातून सर्वाधिक अर्ज येतील, पण पश्चिम महाराष्ट्रातून सर्वाधिक अर्ज आले आहेत. मराठवाडा दुसऱ्या क्रमांकावर आहे’, असे मनोज जरांगे पाटील यांनी सांगितले. ‘खूप लोक इच्छुक आहेत. मला यातलं काही कळत नाही म्हणून आम्ही माणसं बसवली आहेत. उमेदवार पाहिले की असे वाटते कुठून या लफड्यात पडलो,’ असेही ते म्हणाले.

आंदोलनाला एक वर्ष पूर्ण होणार 

येत्या 29 तारखेला आंदोलनाला एक वर्ष पूर्ण होत आहे. माझ्या मायबाप मराठा समाजाने ताकदीने हे आंदोलन लावून धरले होते. त्यामुळेच आंदोलन यशस्वी झालं आहे. या यशाचं श्रेय हे मराठा समाजाच्या एकजुटीला आहे. त्यामुळे येत्या 29 तारखेला अंतरवालीत एक छोटेखानी चर्चासत्र आयोजित करू. कारण हे आंदोलन ऐतिहासिक झालेलं आहे. आंदोलनाचा लढा सर्वांनी यशस्वी केला आहे. त्याचे श्रेय सर्व गोरगरीब मराठा समाजाला आहे, असं मनोज जरांगे म्हणाले.

चर्चासत्र होणार

येत्या 29 तारखेला अंतरवालीत आयोजित चर्चासत्राला नक्की या. ज्यांना शक्य आहे, त्यांनी अंतरवालीत यावं. फक्त कामे बुडवून येऊ नका. थोड्या संख्येनेच या. मी काही जाहीर आवाहन करत नाही. कारण छोटा कार्यक्रम घेत आहोत. शेतीची कामे खोळंबू नये म्हणून कार्यक्रम छोटाच करणार आहे. ही कोणतीही राजकीय बैठक नाही, फक्त एक वर्ष पूर्ण झाले म्हणून छोटेखानी चर्चासत्र आपण घेतोय, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

तर मी कोणाच्या बापाला घाबरत नाही

मी जातीवाद करत नाही. मी कोणत्या गोरगरीब ओबीसीला, धनगर बांधवांना, मुस्लिम बांधवांना, बारा बलुतेदारांना दुखावलं नाही. फक्त नेत्यांना सोडत नाही. आमच्या आणि त्यांच्या सुद्धा नेत्यांना सोडत नाही. शेतकऱ्यांचा मुद्दा का घ्यायचा नाही? मी शेतकऱ्याचा मुलगा आहे. आमच्या शेतकऱ्यांचे काय प्रश्न असतात हे आम्हाला माहीत आहेत. 30 सप्टेंबरच्या आत सगळी कर्जमाफी केली पाहिजे. राज्यात अनुदानही मिळाले पाहिजे. पीक विमा सुद्धा मिळाला पाहिजे. एखाद्या मुद्द्यावर ठाम झालो तर मी कोणाच्या बापाला घाबरत नाही. माझा शेतकरी बाप जगला पाहिजे. आम्ही तुमचा ठेका घेतलेला नाही, अशा शब्दात त्यांनी सत्ताधाऱ्यांना फटकारले.

महायुतीला फायदा झाला नाही का?

लोकसभा निवडणुकीत मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाचा फायदा महाविकास आघाडीला झाल्याचे बोलले जाते. त्यावर मनोज जरांगे पाटील म्हणाले, ‘आम्हाला आमची ताकद दाखवणे गरजेचे आहे. जळगाव, सातारा, पुण्यात काय झाले. महायुतीलाही फायदा झाला नाही का? त्यांनी फक्त नाही म्हणावे मग मी सांगतो.’

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!