महाराष्ट्र

Manoj Jarange Ultimatum : ..तर विधानसभा निवडणुकीत उतरूच !

Maratha Reservation : गंभीर आरोपांनंतर जरांगेंचा सरकारला इशारा.

Reservation Movement : मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला 30 जूनपर्यंत सगेसोयरेबाबतचा अध्यादेश काढा, अशी मागणी केली. त्यावर शंभूराज देसाई यांनी एक महिन्यांची मुदत वाढवून द्यावी, अशी विनंती केली. पण मनोज जरांगे सुरुवातीला एक महिन्यांची मुदत वाढवून देण्यास तयार नव्हते. सरकारच्या शिष्टमंडळाने विनंती केल्यानंतर ते तयार झाले. त्यांनी सरकारला 13 जुलैपर्यंतची मुदत दिली आहे. तोपर्यंत सरकारने निर्णय घेतला नाही तर आपण आगामी विधानसभा निवडणुकीच्या मैदानात उतरु, असा इशारा मनोज जरांगे यांनी यावेळी सरकारला दिला.

मराठा समाजासाठी सरकारने सगेसोयरे कायद्याचा अध्यादेश काढलेला आहे. या कायद्याची अंमलबजावणी करावी, यासाठी जरांगे यांनी पुन्हा एकदा आमरण उपोषण सुरू केलं. आमरण उपोषण सुरू असताना काल गुरुवारी (13 जून) राज्य सरकारमधील मंत्री शंभूराज देसाई यांनी जालन्यातील अंतरवाली सराटी येथे जाऊन जरांगेंची भेट घेतली. या भेटीनंतर मनोज जरांगे यांनी आपलं उपोषण स्थगित करण्याचा निर्णय घेतला. त्यासोबतच एक मोठा निर्णयसुद्धा घेतला आहे.

अंमलबजावणी करा

मनोज जरांगे गेल्या पाच दिवसांपासून जालना जिल्ह्यातील अंतरवली सराटी येथे उपोषणाला बसले आहेत. मराठा आरक्षणाच्या मसुद्यात सगेसोयरे बाबतची मागणी मान्य करा आणि तशी अंमलबजावणी करा, अशी मनोज जरांगे पाटील यांची मागणी आहे. याच मागणीसाठी ते उपोषणाला बसले आहेत. मनोज जरांगे यांनी राज्य सरकारवर टीका केली होती. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ओएसडीवरही गंभीर आरोप केले होते.

काल 13 जून रोजी महाराष्ट्र सरकारचं शिष्टमंडळ मनोज जरांगे यांच्या भेटीसाठी दाखल झालं. राज्याचे उत्पादन शुल्क विभागाचे मंत्री शंभूराज देसाई हे स्वत: या शिष्ठमंडळात होते. तसेच भाजपचे आमदार राणा जगजित सिंह पाटील, छत्रपती संभाजीनगरचे नवनिर्वाचित खासदार संदीपान भुमरे यांचादेखील या शिष्टमंडळात समावेश होता.

Navneet Rana : काही लोकं मैदान जिंकण्यासाठी येतात, तर काही..

राज्य सरकारचं शिष्टमंडळ आलं, तेव्हा दोन्ही बाजुंनी चर्चा करण्यात आली. मनोज जरांगे सगेसोयऱ्याच्या मुद्द्यावर कायम राहिले. यावेळी शंभूराज देसाई यांनी मनोज जरांगे यांना उपोषण मागे घेण्याची विनंती केली. आपल्या सर्व मागण्या मान्य होतील. फक्त तुम्ही उपोषण मागे घ्या. तुमच्या प्रकृतीची आम्हाला काळजी आहे, असं शंभूराज देसाई म्हणाले. आपण 14 जूनला याबाबतची तातडीने बैठक घेऊ, असं आश्वासन शंभूराज देसाई यांनी मनोज जरांगे यांना दिलं.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!