महाराष्ट्र

Lok Sabha Election : काँग्रेसला आणखी एक धक्का; पाऊनकर भाजपमध्ये

Chandrapur Constituency : विरोधी पक्षांच्या गडाचे बुरूज ढासळतेच

Political News : गेल्या काही दिवसांपासून चंद्रपूर जिल्ह्यात विरोधी पक्षांची सुरू झालेली वाताहात थांबण्याचे नाव घेताना दिसत नाही. चंद्रपूर-वणी-आर्णी लोकसभा मतदारसंघात सध्या विरोधी पक्षातील नेते भाजपच्या वाटेवर अधिक दिसत आहेत. त्यामुळे चंद्रपुरात महाविकास आघाडीत बिघाडी निर्माण झाली आहे. गडचिरोली जिल्ह्यातील काँग्रेस नेते डॉ. नितीन कोडवते दाम्पत्य, माजी आमदार डॉ. नामदेव उसेंडी, चंद्रपूर जिल्हा काँग्रेसचे माजी अध्यक्ष प्रकाश देवतळे, उत्तर भारतीय संघटनांच्या नेत्यांनी आता भाजपला पसंती दिली आहे. अशातच काँग्रेसला चंद्रपुरात आणखी एक धक्का बसला आहे. सुधीर मुनगंटीवार यांच्यावर विश्वास दाखवत चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे माजी अध्यक्ष मनोहर पाऊनकर यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे.

पाऊनकर नगराध्यक्षही होते. कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती म्हणूनही त्यांनी काम पाहिले आहे. चंद्रपुरातील एका हॉटेलमध्ये आयोजित कार्यक्रमात मुनगंटीवार यांनी भाजपचा दुपट्टा घालत पाऊनकर यांना भाजपमध्ये प्रवेश दिला. पाऊनकर यांच्यासह माजी सभापती विजय बल्की, मारेगावच्या कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक रमण डोहे, संतोष मत्ते हे देखील भाजपवासी झालेत. पाऊनकर यांच्याशिवाय काँग्रेसचे आणखी काही नेते भाजपमध्ये जाणार असल्याचा राजकीय जाणकारांचा अंदाज आहे. त्यामुळे चंद्रपुरात नावाला बोटावर मोजण्याइतके नेते विरोधी पक्षात शिल्लक उरतात की काय? असा प्रश्न अनेकांना पडला आहे.

धनोजे कुणबी समाजाचे शेकडो लोक लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती आहे. आणशी काही राजकीय पक्षांतील नेते भाजपच्या वाटेवर आहेत. लवकरच त्यांचाही भाजप प्रवेश होणार आहे. ऐन निवडणुकीच्या काळात विरोधी पक्षांना आपले नेते सांभाळता येत नसल्याने ते देश काय सांभाळतील अशी चर्चा जोरात आहे. लोकसभा निवडणुकीच्या काळात पूर्व विदर्भातील विरोधी पक्षांना सोडत नेते भाजपमध्ये जात असल्याने विधानसभा व स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक होईपर्यंत किती नेते शिल्लक राहतात याची चिंता आता काँग्रेसला वाटत आहे. त्यामुळे उरलेल्या नेत्यांची मनधरणी आता काँग्रेसला करावी लागणार आहे.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!