महाराष्ट्र

Congress Politics : खरगे निवडतील काँग्रेसचा विधानसभेतील गटनेता!

Mallikarjun  Kharge : कोण असेल काँग्रेसचा चेहरा?; वडेट्टीवार, अमित देशमुख यांची नावे चर्चेत

महाराष्ट्रात महायुतीने जोरदार मुसंडी मारली. लोकसभा निवडणुकीतील अपयश धुवून काढण्यात महायुतीला मोठं यश मिळालं. विशेषतः भाजपने ऐतिहासिक कामगिरी करत सर्वांनाच धक्का दिला. याऊलट आत्मविश्वासानं भारलेली काँग्रेस चारीमुंड्या चित झाली. फक्त 16 जागांवर समाधान मानावे लागले. आता काँग्रेसपुढे विधानसभेतील गटनेता निवडण्याचे मोठे आव्हान उभे ठाकले आहे. पण, प्रदेशाध्यक्ष निवडणुकीत अपयशी ठरल्यामुळे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे यांच्याकडे सर्वाधिकार असल्याचे बोलले जात आहे.

काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे यांच्याकडे गटनेता निवडीचे अधिकार आहेत. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावर विधानसभा निवडणुकीतील अपयशाचे खापर फोडण्यात येत आहेत. त्यांच्या राजीनाम्याची चर्चा तुर्तास थांबलेली आहे. पण, त्यासाठी दबाव आणण्याची कुठलीही संधी पक्षातील इतर नेत्यांनी सोडलेली नाही. सातत्याने पटोलेंच्या अपयशावर बोट ठेवण्याचे काम होत आहे. त्याचवेळी काँग्रेसचा नवा प्रदेशाध्यक्ष कोण असेल, याबाबत अनेक चर्चा होत आहेत.

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणून विजय वडेट्टीवार, अमित देशमुख, बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज चव्हाण आदींची नावे चर्चेत आहेत. मात्र, बाळासाहेब थोरात आणि पृथ्वीराज चव्हाण या दोन्ही दिग्गज नेत्यांचा विधानसभा निवडणुकीत पराभव झाला आगे. त्यामुळे त्यांच्याबाबतीत पक्षात किती सहमती होईल, हे निश्चित सांगता येणे कठीण आहे. दरम्यान, विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यामुळे आता विधानसभेतील गटनेता कोणाला करायचे, हा प्रश्न काँग्रेसपुढे उभा झाला आहे.

Nitin Gadkari : गडकरींना आठवला सत्तरच्या दशकातील हॉलीवूड सिनेमा

विधानसभेत काँग्रेस, राष्ट्रवादी (शरद पवार) आणि शिवसेना (उद्धव ठाकरे) या तिन्ही पक्षांकडे एकत्रितपणे अवघ्या 46 जागा आहेत. काँग्रेसला 16, शरद पवारांच्या राष्ट्रवादीला 10 आणि उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला 20 जागा जिंकता आल्या. त्यामुळे विरोधकांकडे विरोधीपक्षनेता नेमण्याएवढेही संख्याबळ नाही. त्यात शिवसेनेने भास्कर जाधव आणि राष्ट्रवादीने जितेंद्र आव्हाड यांच्याकडे गटनेतेपदाची जबाबदारी सोपवली आहे. काँग्रेसने मात्र अद्याप गटनेता निश्चित केलेला नाही. मल्लिकार्जून खरगे गटनेत्याची निवड करणार आहेत.

वडेट्टीवार की अमित देशमुख?

काँग्रेसच्या गटनेतेपदी विजय वडेट्टीवार किंवा अमित देशमुख यांच्यापैकी एकाची वर्णी लागण्याची शक्यता आहे. वडेट्टीवार विरोधीपक्षनेते होते. शिवाय त्यांच्याकडे सत्ताधाऱ्यांना धारेवर धरण्याची आक्रमकता आहे. त्यामुळे त्यांच्या नावाला पसंती मिळू शकते. दुसरीकडे, अमित देशमुख यांच्याकडे वडिलांचा वारसा आहे. काँग्रेसमधील तरुण नेतृत्व म्हणून त्यांच्याकडे बघितले जाते. पक्षातील तरुण चेहऱ्यांना संधी देण्याच्या दृष्टीने हायकमांड अमित देशमुख यांच्या नावाचा विचार करू शकते.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!