महाराष्ट्र

NCP Politics : भाईजींनी आणले; आमदार वापस पाठविणार?

Raju Karemore : तुमसरच्या मुख्याधिकाऱ्यांवर शिस्तभंगाच्या कारवाईची मागणी

राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार राजू कारेमोरे यांच्याशी झालेले संभाषण व्हायरल करणे आता मुख्याधिकाऱ्याला भारी पडत आहे. मुख्याधिकाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करण्याची मागणी आता राष्ट्रवादी अजित पवार गटाद्वारे करण्यात येत आहे. विशेष म्हणजे तुमसर नगरपरिषद अजित पवार गटाचे कार्याध्यक्ष राज्यसभा खासदार प्रफुल पटेल यांनी या महिला मुख्याधिकाऱ्याला पद मिळवून दिले होते. आता तिला परत पाठविण्यास आमदार राजू कारेमोरे गट सज्ज झाल्याने चर्चेला उधाण आले आहे.

तुमसरचे आमदार राजू कारेमोरे यांनी मुख्याधिकारी यांच्याशी भ्रमणध्वनीवर संवाद साधला होता. हा संवाद जाणीवपूर्वक सोशल मीडियावर व्हायरल केला. तसेच विरोधकांकडे पाठवला. आमदार कारेमोरे यांची कोणतीही परवानगी न घेता संभाषणाचे रेकॉर्डिंग व्हायरल केल्याप्रकरणी मुख्याधिकारी यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करावी. सेवेतून निलंबित करावे, असे निवेदन तुमसर राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिष्टमंडळाने (अजित पवार गट) उपविभागीय अधिकारी दर्शन निकाळजे यांना सोमवारी (30 सप्टेंबर) दिले. या प्रकरणात कारवाई न केल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही देण्यात आला आहे.

Bhandara Politics : कारेमोरेंची क्लिप व्हायरल करणारा निघाला घरचाच भेदी

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत तुमसर नगरपालिकेच्या मालकीच्या नेहरू मैदानावर जनसन्मान यात्रा व लाडक्या बहिणींशी संवाद असा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. मैदानावर किमान सुविधांबाबत खात्री करण्याकरिता स्वतः पाहणी करून योग्य नियोजन करण्याची जबाबदारी शहरातील प्रशासकीय प्रमुख्याने मुख्याधिकारी करिष्मा वैद्य यांची होती. मात्र वैद्य यांनी कार्यक्रमापूर्वी प्रत्यक्ष स्थळ पाहणीची साधी तसदीही घेतली नाही. याबाबत भ्रमणध्वनीवर आमदार राजू कारेमोरे यांनी मुख्याधिकारी वैद्य यांच्याशी संपर्क साधला. नियोजनाबाबत तुम्ही काय केले असा प्रश्न विचारण्यात आला. त्यात मुख्याधिकारी वैद्य यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. कॉल बंद केला. त्यानंतर त्यांनी आमदाराची परवानगी न घेता संभाषण रेकॉर्ड केले. त्या संवादाची क्लिप जाणीवपूर्वक प्रसार माध्यमांकडे पाठवली. त्यामुळे वाद अधिकच वाढला.

मुख्यमंत्री दरबारी हजेरी

विशेष म्हणजे यांची थेट तक्रार आमदार राजू कारेमोरे यांनी नगर रचना विभागाचे मंत्री तथा राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना केली. तुमसरच्या मुख्याधिकाऱ्याला मुंबई मुख्यमंत्री दरबारी बोलविल्याचे कळते आहे.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!