महाराष्ट्र

Bhandara Politics : नानांचा गड भेदण्यासाठी महायुतीची व्यूहरचना

Nana Patole :  काँग्रेसविरूद्ध महायुती एकवटली

Congress : लोकसभा निवडणुकीतील विजयामुळे काँग्रेसचे मनोबल उंचावले. भंडारा-गोंदिया क्षेत्रातून काँग्रेसने दिलेला नवखा उमेदवार निवडून आणल्यामुळे नाना पटोले यांचे वजन वाढले आहे. राज्यात काँग्रेस मोठा भाऊ आहे. हे सांगत राज्यात सत्तेत येण्यासाठी धडपड सुरू आहे. परंतु, त्यांना कोंडीत पकडण्यासाठी महायुती सरसावली असून येणाऱ्या दिवसात रणनीती कशी ठरते, त्यावर समीकरणे अवलंबून राहणार आहेत. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा मतदार संघ साकोली विधानसभा आहे. नानांचा गड असलेल्या या मतदारसंघात विजय मिळविण्यासाठी महायुतीकडून व्यूहरचना आखली जात आहे.

साकोली मतदारसंघ राज्यात हायप्रोफाइल मतदार संघ झाला आहे. साकोलीत काँग्रेसचे नाना पटोले निवडून आले होते. त्यावेळी भाजपचे डॉ. परिणय फुके यांचा निसटता पराभव झाला होता. आता लोकसभा निवडणुकीच्या पराभवामुळे शिवसेना-भाजप-राष्ट्रवादी या महायुतीची साकोलीत कशी व्युहरचना आखते ते बघावे लागेल. भविष्यात राष्ट्रवादीचे अजित पवार गटाचे नेते खासदार प्रफुल पटेल यांची केंद्रात मंत्रिपदी वर्णी लागणार असल्याने दोन्ही जिल्ह्यातील समीकरणे बदलण्याची शक्यता आहे. त्यामुळे पटोलेंना शह देण्यासाठी महायुती सरसावली आहे.

लोकसभा निवडणुकीत साकोली विधानसभा क्षेत्रात काँग्रेसला 1 लाख 17 हजार 501 मते तर भाजपला 90 हजार 135 मते मिळाली असून काँग्रेसला 27 हजार 366 मते अधिक आहेत. ही मते आ. नाना पटोले यांच्यासाठी जमेची बाजू आहेत. या क्षेत्राचे प्रतिनिधीत्व नाना पटोले हे करीत असून त्यांच्याविरूद्ध महायुती या जागेवर कुणाला उमेदवारी देते त्यावर समीकरणे अवलंबून राहणार आहेत. महाआघाडी आणि महायुती रणनीती कशी आखतात, त्यावर पुढील चित्र अवलंबून राहण्याची शक्यता आहे.

महायुती किंवा महाआघाडीमध्ये फूट नाही..

दुसरीकडे केंद्रात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वात एनडीएचे सरकार स्थापन झाल्यामुळे महायुती किंवा महाआघाडीमध्ये फूट पडण्याची चिन्हे नाहीत. त्यामुळे विधानसभा निवडणुका जिंकणे हेच महाआघाडीपुढे लक्ष्य राहणार आहे. महायुतीत ही जागा भाजपच्या वाट्याला असल्यामुळे काँग्रेसचे नाना पटोले यांना आव्हान देण्यासाठी भाजपकडून विधानसभेत फिल्डिंग जोरदार राहणार आहे. भाजपकडून माजी पालकमंत्री डॉ. परिणय फुके हे दावेदार राहू शकतात. लोकसभा निवडणूक आपण लढवावी, असा आग्रह काँग्रेस कार्यकर्त्यांनी नाना पटोले यांना केला होता. परंतु, त्यांना विधानसभा निवडणूक लढवायची असल्यामुळे त्यांनी नम्रपणे नकार दिला. महाविकास आघाडीकडून तेच स्वतः उमेदवार राहणार आहेत.

NDA Meeting : नितीश कुमार पडले मोदींच्या ‘पायी’

तिकीट वाटपाची सुत्रे ज्यांच्याकडे आहे. त्यांच्याविरूद्ध दावेदारी करण्यासाठी कुणीही पुढे येणार नाही. या सर्व घडामोडीत लोकसभा निवडणुकीत सेवक वाघाये हे मत विभाजनात यशस्वी ठरले असते तर भाजपकडून त्यांचा विचार होण्याची शक्यता होती. परंतु, अत्यल्प मतांमुळे आता त्यांना कुणीही जवळ करण्याची शक्यता नाही. त्यामुळे भाजपचे लक्ष साकोली विधानसभा मतदारसंघावर असल्याचे जाणकार सांगताहेत.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!