राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते, राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी महायुती सरकार पुढील तीनच महिने राहणार असल्याचे भाकीत केले आहे. राज्यात लवकरच महाविकास आघाडीचे सरकार येणार आहे, असाही दावाही त्यांनी केला. विधानसभेत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना एकत्रितपणे लढणार आहोत. यासाठी सर्व मित्रपक्ष सोबत आहोत. विधानसभेत 180 ते 185 जागा मिळवू, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
प्रशासन कधीकधी नियम बाजूला ठेवून शासनाच्या दबावाखाली काम करत असल्याचा आराप अनिल देशमुख यांनी केला. अनेक अधिकारी चांगले काम करत आहेत. परंतू दबावाखाली काम करणाऱ्या प्रत्येक जिल्ह्यातील सर्व अधिकाऱ्यांची लिस्ट आम्ही तयार करत आहोत, आमचे सरकार स्थापन झाल्यानंतर या अधिकाऱ्यांवर आम्ही कडक कारवाई करू, असा इशाराही त्यांनी दिला.
2014 ला भारतीय जनता पक्षाचे सरकार आल्यानंतर मंत्रिमंडळाच्या पहिल्या बैठकीमध्ये धनगर समाजाला आरक्षण देऊ, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले होते. परंतू आतापर्यंत समाजाला आरक्षण मिळाले नाही. भाजपा खोटे आश्वासन देऊन दिशाभूल करत असल्याचा आरोपही देशमुखांनी केला.
पुण्यात कोट्यवधीचे ड्रग्स जप्त करण्यात आल्याच्या प्रकरणावर अनिल देशमुखांनी सरकारवर निशाना साधला. असे घटनाक्रम महाराष्ट्रात कधीच समोर आले नाही किंवा घडले नाही. गुन्हेगारांना शासनाची आणि प्रशासनाची भीतीच राहिली नाही, असा आरोप त्यांनी केला. पुणे हे सांस्कृतिक शहर म्हणून जाणले जाते अशातच ही घटना धक्कादायक आहे. उघडपणे बार आणि रेस्टॉरंट मध्ये ड्रग्स विद्यार्थी घेतात, शासनाचे यावर लक्ष नाही. सरकारने लक्ष देऊन या गोष्टी थांबविल्या पाहिजे, असा सल्लाही त्यांनी दिला.
BJP Politics : काय सांगता..! माजी केंद्रीय मंत्री ग्रामपंचायत निवडणूक लढवणार
सरकारला जाब विचारू
नीट पेपर फुटी प्रकरणात त्यांनी आरोपी कुठल्याही असो त्याच्यावर सक्त कारवाई झाली पाहिजे, असे मत व्यक्त केले. अधिवेशनात सरकारला आम्ही शेतकरी, बेरोजगारी, महागाई, महाराष्ट्रातील उद्योग पळविणे या सर्व प्रश्नावर विधानसभेत सरकारला जाब विचारणार आहोत, असेही ते म्हणाले. काँग्रेसच्या नेत्यांनी महिलांना साडेआठ हजार रुपये देण्याच्या आश्वासनावर त्यांनी उत्तर देणे टाळले. काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी शेतकऱ्यांविषयी दिलेले आश्वासन पूर्ण केले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शिवसेना आणि काँग्रेस या पक्षांनी जे काही आश्वासन दिले होते ते आतापर्यंत पूर्ण करण्यात आले, असे सूचक विधान त्यांनी यावेळी केले.