महाराष्ट्र

Vijay Wadettiwar : मराठवाड्यातील शेतकरी आत्महत्येस महायुतीचे सरकार कारणीभूत

Take Action : दाभाडे यांच्या आत्महत्येला जबाबदार असणाऱ्यावर कठोर कारवाई करा

Chhatrapati Sambhaji Nagar : मराठवाड्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्या सुरूच आहेत. पिंपळखुंटा गावातील विठ्ठल दाभाडे या शेतकऱ्याने आत्महत्या केली. शेती गहाण ठेऊन काढलेल्या कर्जाचे पैसे बँक देत नाही. बँक मॅनेजरने कर्जाचे पैसे खात्यात जमा करायला टाळाटाळ केल्यामुळे या शेतकऱ्याने आत्महत्या केली. आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याच्या कुटुंबाचा हा गंभीर आरोप आहे. या आत्महत्येला जबाबदार असणाऱ्यांवर कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी करत महायुती सरकारच्या अपयशी कारभारामुळे आत्महत्या सुरू असल्याची टीका विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली. 

दाभाडे कुटुंबियांची भेट घेऊन या कुटुंबियांच्या पाठीशी आम्ही ठामपणे उभे असल्याचा विश्वास त्यांनी दिला. पिंपळखुंटा गावातील विठ्ठल नामदेव दाभाडे वय 52 यांनी शेतातील झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. एका खाजगी बँकेकडे चार महिन्या पूर्वी शेती तारण ठेवून कर्जाची मागणी केली होती. बँकेने शेती गहाण ठेवून चार पाच महिने झाले तरी बँकेचे शाखाधिकारी पैसे खात्यावर टाकण्यासाठी टाळाटाळ करत राहिले. त्यामुळे निराश होऊन दाभाडे यांनी आत्महत्या केली.

Lok Sabha Election : एकच चर्चा, विजयाचा गुलाल कोणाचा?

विठ्ठल दाभाडे यांनी आत्महत्या करताना चिठ्ठी लिहिली असून बँक मॅनेजर पैसे द्यायला टाळाटाळ करत असल्याचे म्हटले आहे. आता मी खचलो..मी माझ्या नशिबावर नाराज आहे. कर्ज मंजूर होऊन चार महिने झाले. परंतु कर्जाची रक्कम खात्यात टाकली नाही, असे या चिट्ठीत म्हटले आहे. बँक मॅनेजर आणि एजंट पैसे मागत असल्याची तक्रार दाभाडे कुटुंबीयांची आहे.

हे प्रकरण गंभीर असून महायुती सरकारचे हे अपयश आहे. सरकारने या कुटुंबाला न्याय दिला पाहिजे, आत्महत्या रोखण्यासाठी उपाययोजना E-mail पाहिजेत, असे वडेट्टीवार यांचे म्हणणे आहे.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!