महाराष्ट्र

Sindhudurg : राजकोटवर सत्ताधारी, विरोधक आमने-सामने 

Rajkot Fort : महाविकास आघाडी, महायुतीतील नेने भीडले

Shivaji Maharaj Statue : राज्यात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आले आहे. अशात सिंधुदुर्ग येथे राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला. 26 ऑगस्ट रोजी ही दुर्दैवी घटना घडली. पुतळा कोसळल्यानंतर यावरून राजकारण सुरू झाले. विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये सुरू असलेल्या आरोप – प्रत्यारोपांना वेग आला. या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीतील आणि महायुतीतील नेत्यांनी 28 ऑगस्ट रोजी राजकोट किल्ल्याला भेट दिली आहे. 

महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून राजकोट किल्ल्यावर काही क्षण ठिय्या आंदोलन करण्यात आले. यावेळी शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. महाविकास आघाडी आणि महायुतीतील कार्यकर्ते आमने-सामने आल्याने राजकोट किल्ल्यावर राजकोट किल्ल्यावर बराचवेळ ताणावाचे वातावरण निर्माण झाले होते. यानंतर पोलिसांनी ताबडतोब आपली भूमिका घेत दोन्ही बाजूच्या नेत्यांची आणि कार्यकर्त्यांची समजूत घातली.

राणे आक्रमक

छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याची दुर्दैवी घटना घडल्याने राज्यभरातून संताप व्यक्त करण्यात येत आहे. राजकोट किल्ल्यावर महाविकास आघाडीचे नेते पाहणीसाठी पोहोचले. त्याच वेळी भाजप नेते नारायण राणे आणि नितेश राणे देखील राजकोट किल्ल्यावर आले. परंतु पोलिसांनी नितेश राणे आणि नारायण राणे यांना किल्ल्यावर जाण्यापासून रोखले. यामुळे पोलिस आणि राणे यांच्या समर्थकांमध्ये चांगलाच वाद झाला. त्यानंतर नारायण राणे आणि नितेश राणे चांगलेच आक्रमक झालेत. यावेळी, ‘ते बाहेरुन येऊन अंगावर येणार का? त्यांना निघायला सांगा, अशी आक्रमक प्रतिक्रिया नितेश राणे यांनी दिली.

Vijay Wadettiwar : महाराष्ट्राचा स्वाभिमान कोसळला 

शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे (Aditya Thackeray), राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, माजी खासदार विनायक राऊत यांनी राजकोट किल्ल्याला भेट दिली. नेमके याचवेळी भारतीय जनता पार्टीचे नेते नारायण राणे आणि नितेश राणे देखील राजकोट किल्ल्यावर पोहोचले. त्यामुळे महाविकास आघाडीतील कार्यकर्ते आणि नारायण राणे यांचे समर्थक आमने-सामने आल्याने गडावर गोंधळ उडाला. तणाव निर्माण झाला. दोन्ही बाजुंनी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. पोलिसांनी तत्काळ दखल घेतली. महाविकास आघाडीचे नेते आणि कार्यकर्ते किल्ल्यावरून रवाना झाले.

पुतळ्यावरून राजकारण

सिंधुदुर्ग येथील मालवण राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याची घटना घडली. या घटनेनंतर राज्यभरात संतापाची लाट उसळली. सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये हमरीतुमरी सुरू आहे. पुतळा कोसळल्याने विरोधकांनी राज्य सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. मात्र किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या या पुतळ्याची उभारणी नौदलामार्फत करण्यात आल्याचं स्पष्टीकरण राज्य सरकारने दिलं. परंतु तरीही विरोधकांनी पुतळा कोसळण्याचा खापर राज्य सरकार आणि सार्वजनिक बांधकाम विभागावर फोडलं. सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण या घटनेस जबाबदार आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मंत्री रवींद्र चव्हाण यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणीही महाविकास आघाडीतील नेत्यांकडून करण्यात आली.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!