Buldhana : ईव्हीएम मशीन खात्रीशीर आहे का? हा एक प्रश्न सध्या चर्चेत असून अपयशाचे खापर काही ठिकाणी ईव्हीएमवर देखील फोडले जात आहे. दरम्यान बुलढाणा विधानसभा निवडणुकीत शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांना काट्याची टक्कर देणाऱ्या महाविकास आघाडीच्या उमेदवार जयश्री शेळके यांचा निसटता पराभव झाल्याने त्यांनी 5 बुथच्या ईव्हीएम फेर पडताळणीची मागणी केली आहे. यासाठी शेळके यांनी निवडणूक विभागाकडे 2 लाख 36 हजार रुपये शुल्क भरले आहे. विशेष म्हणजे निवडणुकीनंतर 7 दिवसाच्या आत शेळके यांनी ही प्रक्रिया पूर्ण केली.
विधानसभा निवडणुकीचे निकाल लागल्यांनंतर ईव्हीएम मशीन वर विरोधीपक्षाचं नव्हे तर तर सोडाच महायुतीच्याही एका पराभूत उमेदवाराने फेर पडताळणीसाठी अर्ज केला आहे. बुलढाणा जिल्ह्यातील बुलढाणा विधानसभा मतदार संघात देखील आक्षेप दाखल करण्यात आले असून आता 45 दिवसानंतर मतदार संघातील 5 बुथवरील ईव्हीएम मशीनचीही फेरपडताळणी अपेक्षीत आहे. बुलढाणा विधानसभा मतदार संघातून शिवसेना महाविकास आघाडीच्या उमेदवार जयश्री सुनिल शेळके केवळ 841 मतांनी पराभूत झाल्या. हा निसटता पराभव त्यांच्यासाठी चटका देवून जाणारा ठरला. निवडणूक आयोगाच्या नियमानुसार एका बुथसाठी 47 हजार 200 याप्रमाणे पडताळणी शुल्क आहे. त्याप्रमाणे 5 बुथचे 2 लाख 36 हजार रुपये त्यांनी भरले आहेत.
पडताळणी मशीन बनवणाऱ्या कंपनीचे टेक्नीशीयन व उमेदवारांच्या प्रतिनिधींच्या हजेरीत होत असते. पडताळणीदरम्यान प्रथम मशीनची तांत्रिक तपासणी करण्यात येवून त्यानंतर सदर मशीनमध्ये नव्याने डमी मतदार घेवून ते उपस्थित प्रतिनिधींसमोर मोजण्यात येवून मशीनची ही पडताळणी पुर्ण केली जाणार असल्याचे समजते. व्हीव्हीपॅट चिठ्ठयांची तपासणी किंवा ईव्हीएमची फेरतपासणीचे अधिकार हे केवळ न्यायालयाला आहे. एखाद्या उमेदवाराने निकाल घोषीत झाल्यावर 45 दिवसांच्या आत न्यायालयात दाद मागितल्यास न्यायालयात सुनावणी होवून न्यायालय तशा प्रकारचा निर्णय देऊ शकते.
Rajura Constituency : फेर मतमोजणीसाठी उमेदवाराने भरले अडीच लाख
या सात बूथ ची होणार तांत्रिक तपासणी
बुथ नं.13, झेडपी हायस्कूल रुम नं. 2,
कोथळी, बुथ नं. 105, झेडपी हायस्कूल रुम नं. 1
कोथळी, बुथ नं. 116, झेडपी हायस्कूल शिरवा,
बुलढाणा बुथ नं. 214, आरास ले आऊट
तर बुथ नं. 220, भिलवाडा मिल्ट्री प्लॉट रामदास भोंडे नगर