महाराष्ट्र

Maratha Reservation : महाराष्ट्र पेटता ठेवण्याचे विरोधकांचे प्रयत्न !

OBC Reservation : बैठकीवर महिविकासचा बहिष्कार, त्यानंतर फडणवीसांची टीका.

Maharashtra : मराठा समाजाला ओबीसीअंतर्गत कुणबी दाखले मिळावे यासाठी ‘सगेसोयरे’ संदर्भात अंतिम अधिसूचना जारी करण्याची मागणी करण्यात आली आहे. असे असले तरी त्यासंदर्भात कायदेशीर मत घेतल्यावर आणि विरोधी पक्षांनी भूमिका मांडल्यावर राज्य सरकार अंतिम निर्णय घेणार आहे. या अधिसूचनेस ओबीसी नेत्यांनी विरोध केला आहे. 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा-ओबीसी आरक्षण वादाबाबत सर्वपक्षीय नेत्यांच्या आयोजित केलेल्या बैठकीवर विरोधकांनी बहिष्कार टाकला आहे. त्यामुळे महाराष्ट्र पेटता राहिला पाहिजे आणि त्यावर आपली राजकीय पोळी भाजता आली पाहिजे, अशी विरोधकांची भूमिका असल्याची टीका उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बैठकीनंतर केली.

मराठा आणि ओबीसी आरक्षणाच्या वादावर मार्ग काढण्यासाठी राज्य सरकारने 9 जुलै रोजी सायंकाळी  सर्वपक्षीय बैठक बोलावली होती. मुंबईतील सह्याद्री अतिथीगृह येथे ही बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीवर महाविकास आघाडीने बहिष्कार टाकला. विधानसभेत भर सभागृहातच आरक्षणाच्या मुद्द्यावर सर्वपक्षीय बैठक व्हावी, अशी मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली. पण राज्य सरकारने ती मागणी मान्य न केल्यामुळे काँग्रेसने या बैठकीवर बहिष्कार टाकला. 

महाविकास आघाडीतील इतर पक्षांनीदेखील या बैठकीवर बहिष्कार टाकल्याची माहिती समोर आली आहे. या बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह महायुतीचे अनेक नेते तथा ओबीसी नेते उपस्थित होते. 

Maharashtra Politics : लोकसभेच्या निकालानंतर राजकारणाची हवा बदलली !

बैठकीत ओबीसी नेत्यांनी सरकारकडे आपली रोखठोक भूमिका मांडल्याची माहिती आहे. विशेष म्हणजे, ही बैठक सुरु असतानाच आमदार बच्चू कडू सह्याद्री अतिथीगृहमधून बाहेर पडताना दिसले. यावेळी आपण एका वैयक्तिक कार्यक्रमासाठी निघत असल्याचे बच्चू कडू यांनी माध्यमांना प्रतिक्रिया देताना स्पष्ट केले.

ओबीसी नेत्यांच्या मोठ्या मागण्या..

बैठकीत ओबीसी नेत्यांनी सरकारकडे मोठ्या मागण्या केल्या आहेत. “मराठा समाजासाठी सगेसोयऱ्यांचा शासन निर्णय काढू नका. जर हा शासन निर्णय काढला तर ओबीसींचं फार मोठ नुकसान होईल”, अशी भूमिका ओबीसी नेत्यांनी मांडली. त्याचसोबत कुणबी प्रमाणपत्र देण्याचं कामही थांबावा, अशीदेखील मागणी काही ओबीसी नेत्यांनी बैठकीत केली. यावर मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्यासह सर्व मंत्र्यांनी त्यांचं ऐकून घेण्याची भूमिका घेतली.

देवेंद्र फडणवीस यांनी या बैठकीनंतर माध्यमांना प्रतिक्रिया दिली. “मराठा आरक्षणासारख्या अत्यंत महत्त्वाच्या मुद्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बैठक बोलावली होती. महाविकास आघाडीने ठरवून 6 वाजता बैठकीवर बहिष्कार टाकला. पण विरोधी पक्षनेते विजय वड्डेटीवार यांच्या घरी बसून बैठक करत आहेत. विरोधकांच्या मते त्यांच्यासाठी कोणताच समाज महत्वाचा नाही. त्यांना केवळ निवडणुका महत्वाच्या आहेत.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!