महाराष्ट्र

Devendra Fadnavis : खडसेंचा भाजपप्रवेश दिवाळी नंतर?

Eknath Khadse : खुद्द फडणविसांनीच दिली माहिती

Join BJP Party : भारतीय जनता पार्टीकडून राष्ट्रवादी शरद पवार गटात गेलेले माजी मंत्री एकनाथ खडसे पुन्हा स्वगृही परतणार आहे. गणेशोत्सवानंतर त्यांची घरवापसी होण्याचे संकेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. एकनाथ खडसे यांच्याबाबतचा निर्णय केंद्रीय नेतृत्वाने घेतला. तो सर्वांना मान्य आहे. केंद्रीय नेतृत्वासोबत गणेशोत्सवानंतर चर्चा केल्यानंतर पुढील पाऊल उचलू, असं फडणवीस यांनी स्पष्ट केलं. 

खडसेंची चर्चा पे चर्चा 

गेल्या काही महिन्यांपासून ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे चांगलेच चर्चेत आहेत. लोकसभा निवडणुकीपूर्वी एकनाथ खडसे यांनी भाजपमध्ये घरवापसी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यांनी पत्रकार परिषद घेत मी भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचं सांगितलं होतं. मात्र अनेक दिवसांपासून त्यांचा भाजप प्रवेश रखडला होता. अद्यापही भाजपमध्ये प्रवेश झालेला नाही. आमदार एकनाथ खडसे हे भाजपमध्ये आहेत की राष्ट्रवादीत हे अजून स्पष्ट झालेलं नाही. आधी भाजपमध्ये जाणार असल्याचं सांगणारे खडसे आता अचानक आपण शरद पवार गटातच आहोत असं सांगत आहेत. त्यामुळे संभ्रम अधिकच वाढला आहे.

या सर्व पार्श्वभूमीवर राज्याचे उपमुख्यमंत्री आणि भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी नुकताच एक मोठं विधान केलं आहे. एकनाथ खडसे यांच्याबाबतचा निर्णय दिवाळीनंतर घेण्यात येणार असल्याचं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. तर दिवाळीच्या उरलेल्या फटाक्यातून आम्ही नाथाभाऊंचं स्वागत करू, अशी खोचक आणि बोचरी टीका रविवारी भाजपचे नेते गिरीश महाजन यांनी जळगावात केली आहे.

..तर भाजपमध्ये येणार

एकनाथ खडसे यांचा दिवाळीनंतर भाजप पक्षप्रवेश होत असेल तर आम्ही फटाके फोडून त्यांचे स्वागत करू. दिवाळीच्या उरलेल्या फटाक्यातून एकनाथ खडसेंचे आम्ही स्वागत करू. देवेंद्र फडणवीस एकनाथ खडसेंच्या पक्षप्रवेशाबाबत सांगत आहे तर मग कोणाचा विरोध राहील? खडसे भाजपमध्ये येणार म्हटल्यावर थोडे जास्तीचे फटाके आम्ही घेऊन ठेवू. दिवाळीच्या उरलेल्या फटाक्यातून एकनाथ खडसेंचे आम्ही स्वागत करू, अशी मिष्किली गिरीश महाजन यांनी केली आहे.

Eknath Khadse : भाजपमध्ये प्रवेश झाला मात्र घोषणा अडवली, मी राष्ट्रवादीतच !

त्या मंत्र्यांचं नाव सांगू शकत नाही 

भारतीय जनता पार्टीत प्रवेश करावा, असं मला वाटत नव्हतं. पण, काही भारतीय जनता पार्टीमधील ज्येष्ठ पदाधिकारी, दिल्लीमधील अतिउच्चपदावरील मंत्र्यांनी मला फोन केला. तुम्ही राष्ट्रवादीत काय करत आहात. राष्ट्रवादी संपली आहे. शरद पवार साहेबांचे आता काहीच राहिले नाही. तुम्ही भाजपमध्ये या. अशी सूचना त्यांनी मला केली होती. त्यामुळे मी त्यावेळी त्यांच्या विनंतीला मान देऊन त्यांना सांगितले की, मला विचार करायला जरा संधी द्या. पण, नंतर त्यांच्यापेक्षा आणखी एका वरिष्ठ नेत्याचा मला फोन आला. त्यांनी म्हटलं की, तुम्ही का वाट पाहत आहात. भाजपमध्ये प्रवेश करा, असं खडसे म्हणाले आहेत. पण हे नेते कोण असे विचारले असता, ते मी सांगू शकत नाही, असंही ते म्हणाले आहेत.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!